विनोबांची गीता प्रवचने

लेखांक नववा


राजविद्या राजगुह्य योग

विनोबा म्हणतात नववा अध्याय म्हणजे समर्पणयोग

एखाद्या नाटकाला, कादंबरीला जसे मध्यवर्ती सूत्र असते तसे गीतेलाही एक सूत्र आहे. गीतेचा सगळा भर कर्म, धर्म, कर्मफल  आणि स्वतःचं रूप (स्वरूप) ओळखणे यावर आहे.

दुसऱ्या, तिसऱ्या अध्यायात कर्माची चर्चा आहे. कर्म करावे पण त्याचे कर्तृत्व आपल्याकडे घेऊ नये. ‘कर्तृत्व माझे’ असा भाव आला की कर्मफळाचा भोक्तेपणाही आला. कर्म करण्याचा अभिमान आणि त्याच्या फळाचा उपभोग या दोन्ही गोष्टी म्हणजे स्वतःला बंधनात अडकवून घेणे आहे.

कर्तेपणा आणि कर्मफळाचा भोग या दोन्ही गोष्टी सोडल्या तर मनुष्य जन्म-मृत्यूच्या चक्रातून मोकळा होऊ शकतो कारण या दोन्ही गोष्टी सोडल्याने कर्माचे अकर्म होते. कर्म करून न केल्यासारखे होते मग बंधन कसले?

कर्माचा प्रधान हेतू चित्तशुद्धी असावा, त्याचा कर्म प्रयोजनाशी संबंध नाही. एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवितो तेव्हा ज्ञान देणे, विद्यार्थ्याला विचारप्रवृत्त करणे, कौशल्य शिकविणे हे सर्व म्हणजे त्याच्या अध्यापनाचे प्रयोजन. त्याची पूर्तता झालीच पाहिजे पण ही उद्दिष्टे साधत असताना शिक्षकाला समाधान वाटले, मनी संतोष झाला तर प्रयोजन आणि चित्तशुद्धी दोन्ही गोष्टी झाल्या.

पहिल्या काही अध्यायात या सर्व गोष्टींचा ऊहापोह केला असला तरी एक प्रश्न उरतोच. तो म्हणजे कर्मफळ सोडून दिले, फळाचा त्याग केला तर फळाचे काय करायचे? कर्माचे फळ तुम्हाला मिळणारच आहे मग सोडायला ती काय वस्तू आहे का? आपण विसर्जन करतो म्हणजे मूर्ती पाण्यात सोडतो, लाटलेली पुरी तेलात सोडतो. फळ सोडणे म्हणजे असे तर नव्हे, मग फळाचे करायचे काय?

गीतेचा नववा अध्याय या प्रश्नाचे उत्तर देतो. गीता म्हणते कर्मफळ देवाला, ईश्वराला अर्पण कर. येथे कर्मफळ सोडणे याचा अर्थ ते ईश्वराला समर्पित करणे. याने काय होईल? दान करण्याबाबतचा संभ्रम नाहीसा होईल. दान सत्पात्री करावे असे म्हणतात पण सत्पात्र शोधायचे कुठे आणि कसे? सर्वश्रेष्ठ ईश्वराला फळ अर्पण केले की पात्रतेचा प्रश्नच मिटला. फळ ईश्वरार्पण करणे यापेक्षा आणखी कोणती महान गोष्ट असू शकेल?

नवव्या अध्यायात केवळ कर्म फळाचाच विचार नाही तर कर्माबद्दलचा विचारही केला आहे.
कर्म ईश्वरार्पण वृत्तीने करावयाचे आहे. ईश्वराला फळ अर्पण करायचे आहे परंतु काम तर समाजासाठी करावयाचे आहे. सेवा व्यक्तीची करावयाची आहे. सेवेला मूर्त आलंबनाची आवश्यकता आहे. हे कोडं गीतेने सोडवले आहे. आपण सूर्य, नदी, पर्वत यांना महान मानतो. त्यांचा आदर करतो. सूर्याला अर्घ्य  देतो तर कोणी सूर्यनमस्कार घालतो. गंगेसारख्या नदीचं पाणी पवित्र मानतो. कोणी नर्मदेची प्रदक्षिणा करतो.

कन्या राशीत गुरु ग्रह गेला की कृष्णामाईचा उत्सव होतो. पण मग आपले भाऊबंद, नातेवाईक, मित्र यांच्याशी आपले वागणे कसे असते? त्यांच्या गुणांची आपण कदर करतो का? की त्यांचे अवगुण मोठे करून बघतो आणि त्यांच्या मागे निंदा करतो. यावरूनच ‘पिकतं तिथे विकत नाही’ ही म्हण पडली असावी का?

वस्तुतः तोच परमात्मा आपल्यात ‘जीवात्म’ स्वरूपात आहे. तो सर्वव्यापी, सर्वसाक्षी परमात्माच शरीरात राहून आपलं जीवन चालवीत आहे. माता, पिता, गुरु यांना आपण देवासमान मानतोच ना! महावाक्य सांगतं की ‘तत् त्वम असि! अहं ब्रम्हास्मि’. 

इतके सारे असताना मानव रूपातील ईश्वराला तू ओळखत कसा नाहीस? त्याची उपेक्षा, विटंबना का करतोस? नवव्या अध्यायातल्या अकराव्या श्लोकात हे स्पष्टपणे म्हटले आहे.

मज मानव-रुपात तुच्छत्वे मूढ देखती
नेणूनी थोरले रूप जे माझे विश्वचालक

तेव्हा मानव रूपातील ईश्वराची आपण उपेक्षा करतो ही खेदजनक गोष्ट आहे. हे घडते याचे कारण आपण देहाला महत्त्व देतो मानवाची किंमत आपण देह बुद्धीने करतो. समोरची व्यक्ती स्त्री आहे की पुरुष, त्याची जात, त्याचा धर्म, देश, त्याची उपाधी हेच निकष व्यक्तीची ‘किंमत’ किंवा  दर्जा ठरवितात. म्हणजे आपण प्रेम देवावर करत नाही, देहावर प्रेम करतो. ही देहबुद्धी जाईल तेव्हा आतील भावना जागी होईल. सगुण साकारात निराकार परमात्मा भरला आहे ही भावना, देहासक्ती नाहीशी होईल तेव्हांच जागृत होईल. या भावनेने व्यक्तीची किंमत ठरविण्यासाठी देह हा निकष राहणार नाही.

ईश्वर आणि विश्व
एखादा कार्यक्रम चोख पार पडला, त्या कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित असले, कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य झाले, सर्वांनी आपले काम चोख बजावले म्हणजे आपण हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला त्यांचे कौतुक करतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मग या विश्वाचा पसारा कोणी निर्माण केला, तो व्यवस्थित चालवणारा निर्माता आणि व्यवस्थापक कोण याचा विचार आपण कधी करतो कां? त्याच्या प्रति आपल्या भावना उचंबळून येणं तर दूरच परंतु असा विचारही आपल्याला शिवत नाही. यात आपला १०० टक्के दोष आहे असे नाही.

एक तर हा जगत् निर्माता आपल्याला दिसत नाही आणि दुसरं महत्त्वाचे कारण म्हणजे आपली ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिय या विश्वाच्या पसाऱ्यात मोहग्रस्त झाली आहेत. राधाकृष्णन् यांनी म्हणूनच म्हटले आहे की, we are spiritually blind. आपण आध्यात्मिक दृष्ट्या आंधळे आहोत. पुरावा आणि तर्क या दृष्टीने प्रत्येक गोष्ट सिद्ध झाली पाहिजे अशी आपली देहबुद्धी सांगते. विनोबा म्हणतात, तर्क तो देव जाणावा हीच अंधश्रद्धा. मग परमेश्वराला ओळखण्याची बुद्धी आपणास केव्हा होईल? हे ज्ञान केव्हा लाभेल? श्रद्धा असेल तर!

श्रद्धेची गोष्ट
श्रद्धेचा जन्म विश्वासातून होतो. आपण एखाद्या घराचा पत्ता शोधतो तेव्हा काय करतो. गुगल मॅप पाहतो. नाहीतर त्या भागात गेल्यावर एखाद्या व्यक्तीला तो पत्ता विचारतो आणि आपण इच्छित स्थळी पोहोचतो. वस्तुतः जिने आपल्याला पत्ता सांगितला ती व्यक्ती आपल्या ओळखीची नसते किंबहुना ती आपल्याला प्रथमच भेटते. गुगल मॅप असो की अनोळखी व्यक्ती असो आपण त्यावर विश्वास ठेवतोच ना.

आपण दुसरे उदाहरण घेऊ घरातले दिवे प्रकाश देत असतात, पंखे फिरत असतात पण अचानक दिवे गेले, पंखे थांबले की आपण म्हणतो ‘वीज गेली.’ ही वीज तुम्ही गेलेली पाहिली का हो? वीज कोणी पिशवीतून घेऊन आला असे घडले आहे का? आपण ‘वीज’ नावाची शक्ती, ऊर्जा आहे यावर विश्वास ठेवतो कारण विजेचा परिणाम आपण अनुभवत असतो. तसंच त्या अव्यक्ता पलीकडे असलेल्या अव्यक्ताचेही आहे. हा विश्वाचा पसारा त्यानेच उभा केला आहे. तोच निमित्त, कारण आहे.

प्रकृतीतून हे सारे निर्माण झाले आहे म्हणजे प्रकृती हे उपादन कारण आहे पण ईश्वर असा निर्माता आहे की त्यानेच प्रकृतीची निर्मिती केली त्यामुळे निर्माता ईश्वर, हे जग, जगाचे स्वरूप आणि त्यापासून ईश्वराची अलिप्तता हे सारच अगम्य आहे.

हे सारे कोणाला विचारायचे ? अहो कोणाला म्हणजे काय? संतांना, महापुरुषांना, ऋषींना. त्यांनी ग्रंथरूपाने हे ज्ञान आपल्यापर्यंत आणले आहे. रामदासांचा दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा हे सर्व कालचे – परवाचे नाही तरी लोक ते वाचतात. त्याचे  चिंतन करतात. या संतांवर आपण विश्वास ठेवला नाही तर आम्ही करंटेच ठरू. मग हरिपाठ, मनाचे श्लोक, रामरक्षा, विष्णुसहस्रनाम हे सगळे व्यर्थच म्हणायचे का?

म्हणूनच आपली सर्व कर्म ईश्वराला साक्षी ठेवून करू या. ईश्वरच आपल्याकडून हे करवून घेत आहे अशी श्रद्धा ठेवू या आणि त्या कर्माचे फळ त्यालाच अर्पण करू या.

आपल्या रोजच्या जीवनाकडे पहा ‘कर्म’ या शब्दाने घाबरून जाण्याचे कारण नाही. कर्म म्हणजे आपले रोजचे काम समजू या. आपण ज्या कुटुंबात रहातो ज्या घरात रहातो तेथील कामे आठवून पहा. स्वयंपाक करणे, केर काढणे, भांडी आणि कपडे धुणे, वस्तू जागेवर ठेवणे, भांडी जागेवर लावणे अशी कितीतरी लहान मोठी कामे आहेत. या सर्व कामांची जबाबदारी आपण घरातल्या कर्त्या बाईवर टाकतो जी कोणाची तरी आई असते. याशिवाय नात्यानुसार सासू, सून, नणंद, भावजय, जाऊ अशा उपाधीही तिला चिकटलेल्या असतात.

या माऊलीच्या कामात आपण मदत केली तर! कुटुंबातील जिव्हाळा, नात्यातला ओलावा यामुळे टिकून राहील. आपण करतो ती प्रत्येक गोष्ट ती त्या व्यक्तीसाठी करत नसून परमेश्वरासाठी करतो आहोत ही भावना ठेवली तर आपले रोजचे जीवन साधे दिसले तरी ते महान यज्ञकर्मच होईल. त्या कामात अनंत शक्ती येईल. जो नियम घरच्या कामाला तोच नियम घरच्या आणि कार्यालयीन कामालाही लावायचा. बघा त्यात अपार आनंद भरला जाईल.

[ विनोबांच्या गीता प्रवचनांवर हेमंत मोने यांनी लिहिलेले व ” बालविकास मंदिर ” या मासिकात प्रसिद्ध झालेले क्रमांक ९ चे प्रकरण साभार पुनःप्रसिद्ध ]

–  ©️ हेमंत मोने

hvmone@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

स्वागत फुलांनी – Rhododendron wallichi

तनुल करकरे, पुणे. 

फोटो उत्तराखंड रंथनटॉप.

प्रेषक डॉ. प्रियंवदा कोल्हटकर  

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

नवीन मुखपृष्ठ –  आयर्विन पूल, सांगली – मिलिंद महाबळ 

milind.mahabal65@gmail.com 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विचारशलाका 

(53) 

Climb the mountains and get their good tidings. Nature’s peace will flow into you as sunshine flows into trees. The winds will blow their own freshness into you and the storms their energy, while cares will drop away from you like the leaves of automn.

– John Muir 

(TOI Oct 22, 2025) 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आणखी एक (अज्ञात ) केशवसुत

– पृष्ठ ६१ –

– प्रेषक माधव मनोहर जोशी 

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

संपूर्ण वन्दे मातरम्

*राष्ट्रीय गीत :* वन्दे मातरम्
*रचना :* — बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
*जन्मस्थान :– कोलकाता जवळील नैहाटी कान्तालपाडा
*जन्मदिन : कार्तिक शुद्ध नवमी, शके १७९७ अर्थात् ७ नोव्हेंबर १८७५ (मध्यरात्र)
*प्रथम प्रकटन : बंकिमचंद्र यांनी लिहिलेल्या “आनंदमठ” कादंबरीत १८८२.
*प्रथम प्रकट गायन :– रवींद्रनाथ ठाकूर, १८९६ (कोलकाता येथे आयोजित राष्ट्रीय कॉंग्रेस सभेत)

वंदे मातरम्!

सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,
शस्यश्यामलाम्, मातरम्!
वंदे मातरम्! ll ध्रु ll

शुभ्रज्योत्सनाम् पुलकितयामिनीम्,
फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्,
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्,
सुखदाम् वरदाम्, मातरम्!
वंदे मातरम्, वंदे मातरम्॥१ll

कोटि कोटि कण्ठ कल कल निनाद कराले
द्विसप्त कोटि भुजैर्धृत खरकरवाले
के बोले मा तुमी अबले
बहुबल धारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम्॥
वंदे मातरम्! ll२ll

तुमि विद्या तुमि धर्म, तुमि ह्रदि तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारै प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे मातरम्॥
वंदे मातरम्!  ll३ll

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदल विहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलाम्
सुजलां सुफलां मातरम्॥
वंदे मातरम्!  ll४ll

श्यामलां सरलां सुस्मितां भूषिताम्
धरणीं भरणीं मातरम् ॥५ll

मराठी भावानुवाद —

हे भारतमाते, तुजला करितो मी वंदन l

पवित्र जल ते महानद्यांचे करी तुजला सुजल
फळा फुलांनी असशी तू समृद्ध अन् सुफल
मलयगिरीचा चंदनगंधित वारा करी तुजला शीतल
बहरलेल्या पिकांनी तुझा वर्ण दिसे श्यामल
हे भारतमाते, तुजला करितो मी वंदन ll ध्रु ll

तेजस्वी शुभ्र चांदणे,करी पुलकित ही यामिनी
बहरलेले पुष्प ताटवे,करती तुज सुशोभिनी
सुहास्यवदना असशी तू,असशी मधुरभाषिणी
सुखदायिनी तू माते, तू असशी वरदायिनी
हे भारतमाते, तुजला करितो मी वंदन ll१ ll

कोटी कोटी कंठातून होतो,तुझाच जयजयकार
कोटी कोटी करशस्त्रातून होई सामर्थ्याचा साक्षात्कार
नसशी तू अबला,तू तर असशी बहुबलधारिणी
रिपुदमन करशी, तू सकलांची तेजस्वी तारिणी
 हे भारतमाते, तुजला करितो मी वंदन ll२ ll

हे भारतमाते, तू तर असशी ज्ञानमयी
ज्ञानाची जननी , असशी ज्ञानदायिनी
तूच आमुचे हृदय, तूच असशी धर्म
या देहातील प्राण आणि आमुचे मर्म
तूच असशी आमुच्या, बाहूंमधली शक्ती
तूच असशी सकलांच्या हृदयातील भक्ती
मंदिरा मंदिरातूनी घडते तुझेच ते दर्शन
हे भारतमाते, तुजला करितो मी वंदन ll३ll

दश करात तुझिया करशी, दश शस्त्रे धारण
असशी तू दुर्गा, करशी तू शत्रूंचे निर्दालन
कमला तूच असशी, कमलपुष्पी तू विराजमान
वागीश्वरी सरस्वती तू, तूच देशी विद्यादान
हे ऐश्वर्यदायिनी कमला,तू अमला अन् अतुला
 सुजला, सुफला माते,वंदन करितो मी तुजला ll ४ll

बहरलेल्या पिकांनी तुझा, श्यामल दिसे वर्ण
सुचरिता तू, प्रसन्न हास्य असे तुझे भूषण
तूच करशी प्रेमे ,आम्हा सकलांना धारण
तूच करशी मायेने ,आमुचे पालन पोषण
हे भारतमाते, तुजला करितो मी वंदन ll५ ll

–  ©️  सौ. विनया माधव जोशी.

प्रेषक माधव मनोहर जोशी
madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता

कोहरा….!!

बिलकुल गुमसुमसी
हो गयी थी ….!
कल तक हाथ पकडकर मेरा
उछलती थी, कुदती थी
बच्चों की तरह, साथ मेरे,
आगे पीछे, भागती  थी….!

अचानक इसे ये क्या हुआ ?
चलते चलते पूछा,
चुप क्यों हो? क्या बात है?
चलना नहीं है क्या मेरे साथ?
क्यों खिंच रही हो मेरा हाथ?

डबडबाती आँखों से बोली,
क्यों जा रहे हो भागे भागे?
देखते नही, कोहरा है आगे,
उठा लो ना मुझे, अपनी बाहों में
नहीं तो खो जाऊँगी,
इस कोहरे में…!

उठा तो लिया  हूँ  उसे
अपनी बाँहों में,
लेकिन चल नहीं पा रहा हूँ  
एक कदम भी आगे
बस्स, तभी से रुका हुआ  हूँ,
इस जिंदगी के साथ
कोहरे की इस गहराइयों में..!

– ©️  प्रदीप अधिकारी 
adhikaripradeep14@gmail.com

**********************************

अवती भवती

भोवती आहेत सारे हासणारे
काहीही बोला मान डोलावणारे

करावी लागते पर्वा ज्यांची तुम्हाला
ते आहेत सारे पाय खेचणारे

वेचून घ्या हुंगून घ्या मोजकी फुले
सारीकडे आहेत काटे टोचणारे

गायचे ते गा सूर सांभाळूनी
आहेत ऐकणारे बेताल नाचणारे

पर्वा नको कुणाची साद ऐका मनाची
काम झाल्यावरी हे हलकेच पांगणारे

लागेल पळावे तुम्हा गाठण्या गाव अपुले
नसतील साथ कोणी सारेच रांगणारे

बहुसंख्य भोवतीची गर्दी लुबाडणारी
संस्कार नीती धर्म थोडेच पाळणारे

  • विजय पांढरीपांडे
    ७६५९०८४५५५
    –  ©️ प्रा. विजय पांढरीपांडे
    vijaympande@yahoo.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

ग्रेट भेट

व्यक्ती विशेष – ३ 

आमचा गाण्याचा क्लास संपल्यावर मेघना, माझी संगीत सखी तिच्या बाबांना म्हणजे चित्रकार श्री रामचंद्र देशमुख यांना भेटायला घेऊन गेली. तसे या आधी मी रामकाकांना त्यांच्या चित्रांतून भेटले होते. पण आज आमने सामने!

सुहास्य वदनाने रामकाकांच्या सहधर्मचारिणी म्हणजे मेघनाची आई यांनी आम्हा दोघींचे स्वागत केले. अपेक्षेप्रमाणे रामकाकांच्या टेबलावर एक सुंदर चित्र आकार घेत असताना दिसले.

अतिशय अनौपचारिक गप्पा मग सुरू झाल्या. मी चित्रांची वही हातात घेऊन एक एक चित्र पाहात होते. सुबक रेषा, अप्रतिम रंगसंगती व बोलक्या व्यक्तीरेखा ! प्रत्येक चित्र जणूकाही आपल्याशी संवाद करू पाहत होतं.

पहिल्याच चित्राबद्दल  त्यांना प्रश्न विचारले आणि अगदी सहज ओघवत्या भाषेत ते आपले विचार व्यक्त करताना दिसले.त्यांच्या प्रत्येक चित्रात निसर्ग आढळतो.डोळ्यात भरतील अशी नयनसुखावह रंगसंगती दिसून  येते.

हिंदू संस्कृतीनुसार पेहराव केलेल्या दोन सख्यांच्या चित्राने माझे लक्ष वेधून घेतले. अतिशय मिश्किलपणे रामकाका म्हणाले, ” त्या  दोघी जणी गुजगोष्टी हळू आवाजात करत आहेत.कोणाला ऐकू येऊ नयेत म्हणून! ” हे बोलत असताना लहान मुलाप्रमाणे निरागसता आणि  मिश्किलपणा  या दोन्ही छटा काकांच्या चेह-यावर उमटल्या होत्या.

ते उच्चशिक्षित आहेत. जे.जे  स्कूल ऑफ आर्ट मधून ए.एम, फाईन आर्ट आणि आर्किटेक्चर ह्या पदव्या घेतल्या.  थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ३८ वर्ष कुर्ल्याच्या होली क्रॉस शाळेत कला शिक्षक म्हणून सेवा केली.त्यानंतर १५ वर्ष महाराष्ट्र शासनाच्या कलासंचलानयाच्या ग्रेड परीक्षांचे प्रमुख म्हणून काम केले. असा दमदार प्रवास केला‌ आहे.

खरे तर त्यांना भारतीय  सेनेत सामील होऊन देशसेवा करायची होती. पण वडिलांनी परवानगी नाकारल्याने ते होऊ शकले नाही याची खंत मनाला अजून ही आहे असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.

कोविड काळात जीवनाला एक वेगळीच दिशा मिळाली. तेंव्हा जग कोविडमुळे थांबले होते, सगळे जण आपापल्या घरात बंदिस्त झाले होते.अशा वेळी रामकाकांनी चित्र काढायला सुरूवात केली. त्या वेळी सुरू झालेले हात आजपर्यंत काम करत आहेत.

कला कोणतीही असो, मनाला आनंद आणि समाधान देते. सकारात्मक ऊर्जा देते.  मनातून कागदावर उतरते.

या सगळ्या प्रवासात त्यांना त्यांच्या चित्राला पहिली दाद देणारी ही त्यांची अर्धांगिनी असते, हे ते खूप आनंदाने व अभिमानाने सांगतात. काकूंच्या हातचा आले घातलेला मस्त वाफाळलेला चहा घेतला.त्याही गप्पांमध्ये सामिल झाल्या.  रामकाकांना त्यांच्या तीनही मुलींबद्दल प्रचंड प्रेम आणि अभिमान आहे. त्या सुशिक्षित असून आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत, हे सांगताना काकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

अशी ही अनौपचारिक भेट मलाही खूप काही देऊन गेली.  कलाकाराचे शरीर थकले तरी मन थकत नाही.आज रामकाकांचे वय ८२ जरी असले तरी कला त्यांना नेहमीच मनाने उत्साही  ठेवेल यात शंका नाही.  कलेची सेवा अशीच त्यांच्या हातून घडत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!!

 

श्री रामचंद्र देशमुख

– ©️ सौ.शुभदा प्रवीण अघोर
२२/९/२५

shubhadaaghor@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

फुलपाखराची अळी



घरच्या हळदीच्या पानावर यथेच्छ ताव मारणारी ही फुलपाखराची अळी ( chocolate Demon ). अंड्यापासून हिचा प्रवास पाहिलाय मी. दोन मोठी मोठी पान हिने दोन दिवसात फस्त केलेयत. तशीही या अवस्थेत ती बकासुरच असते. नीट पाहिलं तर कुरतडून खाणारी पानं तिच्या पारदर्शक पोटात जाताना स्पष्ट दिसत आहेत. पारदर्शकच होती जन्मली तेव्हा. कोषात जायच्या आधीच्या टप्प्यात अगदी हिरवीगार गलेलठ्ठ झाली. सोबत हालचालीनेही बोजड. शेवटी तर एका पानाला तोंडातील धाग्याने एक टाका देऊन त्यात स्वतःला लपवून घेतलं. आणि शेपटीकडून कोष विणायला घेतला ..पण काय…! निसर्ग नियम आला पुढे. जीवो जीवस्य जीवनम्…! शिंपी दादा आला आणि आपल्या इवल्याशा चोचीतून गट्टम केल. माझं कोशातून बाहेर येणार फुलपाखरू बघायचं स्वप्न अधूरी एक कहाणीच राहील शेवटी ..!

– ©️ सविता कांबळे

savitak211@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

राशीस्वभावानुसार उखाणे

उखाणे, शायरी ,विडंबन काव्ये यांची मला लहानपणापासून फारच आवड होती. शाळेत असताना  “र” ला “ट” जोडून मी एक काव्य केले होते. एका वहीवर मी माझे असे नाव लिहिले होते…

“*क्रांती नामे वदती तियेला*
*वसंत नामे वदती पित्याला*
*आठवले हे तिचे कुलनाम आहे*
*ती या वहीची मालकीण आहे*.”

‘माझे वकिली व्यवसायातील अनुभव” या लेखमालेत (फेसबुक पोस्ट …दि. २७.०३.२०२५ ) मी, कल्याण कोर्टात आम्ही सुरु केलेल्या स्नेहसंमेलनाविषयी लिहिले आहे. एका वर्षी आम्ही एक एकांकिका सादर केली होती. त्याचे नाव आठवत नाही, पण विषय एका काल्पनिक खटल्याचा होता. त्यात मी गावाकडील एका स्त्रीचा रोल केला होता. तिच्या साक्षीच्या वेळी वकील तिला नाव विचारतात,

“नाव सांगा ?”

त्यावेळी मूळ संहितेत नसलेली चार वाक्ये आम्ही ठरवून वाढविली. त्यात मी एक स्वरचित उखाणा घेतला..

“*अंबाबाईच्या देवळात हळदी-कुकवाच्या राशी*
  *शिरीपतीचे नाव घेते साक्षीच्या दिशी*…”

त्यावर न्यायाधीश संतापतात आणि म्हणतात. “तुम्हांला उखाण्यात नाव विचारले आहे का ? नुसते तुमचे संपूर्ण नाव सांगा”

ह्या प्रसंगाला सर्वांची दाद मिळाली.
(स्मरणसौख्य -Nostalgia म्हणून त्यावेळेचा फोटो खाली दिला आहे)

*दहावी रास मकर*:

राशीतील दहावी रास ही मकर , व्यक्त करत नाहीत स्वतःचे मत,
स्वामी शनी, पृथ्वी तत्त्व, काळासावळा वर्ण, मध्यम बांधा.
वैराग्य प्रिय, दिर्घोद्योगी अन काटकसरी, लहरी आणि अबोल.
*अशी कष्टाळू व कामास प्राधान्य देणारी मकर*.”

 *या राशीत तीन नक्षत्रे येतात*. उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा.

*उत्तराषाढा* – याची आकृतीसुद्धा साधारण  मंचका / पलंगासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती  ढोबळ मानाने विचार करणारे, मोठी कामे चटकन करणारे पण किचकट कामे टाळणारे. नक्षत्र स्वामी : रवी.

*श्रवण* – याची आकृती तीन पाय असलेल्या लहान मुलासारखी दिसते. या  नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती, विश्वासू, दयाळू, कुणालाही न दुखावणा-या, नीटनेटके राहण्याची आवड. नक्षत्र स्वामी : चंद्र

*धनिष्ठा* – याची आकृती मृदंगासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती  महत्वाकांक्षी, आशावादी, वजनदार व्यक्तिमत्त्व. विविध पदार्थ खाण्याची विशेष आवड, खेळाडू असतात. नक्षत्र स्वामी : मंगळ.

राशी स्वामी शनी असल्याने यांचा स्वभाव थोडासा निराशावादी असतो. काही व्यक्तींमधे छोट्या दु:खाचा बाऊ करण्याची सवय असते. काही लोकांना आयुष्यात खुपदा तडजोड करावी लागते.

*मकर  राशीची स्त्री कशी उखाणा घेईल*:

1)लोकलचा प्रवास करते फर्स्टक्लास मधे बसून,
रवीची पडली भूल, आले प्रेमात फसून.

२) दिसते तसे नसते ,म्हणून जग फसते ,
अनिलचे अस्ताव्यस्त घर सगळ्याना नंदनवनासारखे भासते ! (स्वरचित)

*या राशीचा पुरुष  कसा उखाणा घेईल*:-

1) सागराला नाही मर्यादा, आकाशाला नाही अंत,
   रोहिणी आहे सोबत पण, मला आहे रोजचीच खंत. (स्वरचित)

२) लग्नाला झाली दोनच वर्ष एवढ्यातच बसले संसाराचे चटके,
    रुपालीच्या ब्युटी पार्लरच्या बिलाचे माझ्या खिशाला बसतात फटके.

*मकर  राशीचा एक किस्सा *…यामुळे या राशीचा स्वभाव समजायला मदत होईल …

१) नवरा आणि बायको ताजमहाल बघायला जातात. वृषभ राशीचा romantic नवरा म्हणतो, हे खरं प्रेमाचे प्रतिक. त्यावर मकर राशीची बायको म्हणते, हे कसले प्रेम. हा वेडेपणा आहे. मेलेल्या बायकोसाठी एवढा खर्च कशाला करायचा? तिला थोडेच कळणार आहे.

२) उमेशराव सेवा निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. उमेशरावांची पत्नी काय बोलणार या बद्दल लोकांना उत्सुकता होती. उमेशरावांची पत्नी मकर राशीची होती. ती म्हणाली सेवानिवृत्ती म्हणजे यांचे निवांत राहाणं, आळसावल्यामुळे वजन वाढणं. हे म्हणजे अर्ध्या पगारावर दुप्पट वजनाचा नवरा सांभाळण्यासारखे आहे

*माफी मागण्याची पद्धत.*

ह्या व्यक्ती नुसते “sorry” असं म्हणणार नाहीत तर असं का घडलं त्याची कारणं व स्पष्टीकरण देत बसण्याची यांना सवय असते.

*मकर राशीचा शेर  पाहू*.

“*ना कसूर आपका है, ना गलती मेरी*,
*वक्त ने आपको बदल दिया और आपने मुझे बदल दिया*”..

लेखमालेच्या पहिल्या भागात डोंबिवलीतील एका मंडळातील उखाणा स्पर्धेविषयी मी लिहिले आहे. तशीच एक स्पर्धा मोठ्या व्यासपीठावर झाली होती.

२५.०८.२०१५ रोजी श्रावण महिन्याच्या निमित्ताने, *कलर्स चॅनल व लोकमत सखी मंच* प्रस्तुत “श्रावण सोहळा, सोबत कॉमेडीचा मेळा” ह्या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते.

त्यात महिलांसाठी विविध वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एक विनोदी उखाणे स्पर्धा होती. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मला आमंत्रित करण्यात आले होते. सह्याद्री वाहिनीच्या सुप्रसिद्ध वृत्तनिवेदीका आणि विविध मनोरंजनात्मक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम सादर करणाऱ्या सौ. दीपाली केळकर यांनी माझे नाव सुचविले होते.

स्पर्धकांनी उत्तमोत्तम उखाणे सादर केले. काही उखाणे इतके छान होते की कुणा एकाची निवड करणे अवघड झाले होते. पण स्पर्धा म्हटली की एकच विजेता असतो…

हा माझ्यासाठी एक आगळावेगळा अनुभव होता.

*अकरावी रास कुंभ*:
राशितील अकरावी रास ही कुंभ. ही स्पष्टवक्ती असे फार,
स्वामी शनी, वायू तत्त्व, बांधा उंच आणि सडपातळ,
अबोल वाटणारी आणि गंभीर चेह-याची अशी विचारात घ्यावी ही रास.
कुशाग्र बुद्धीमत्ता, चिकाटी, उत्तम आकलन शक्ती,
सोशिक आणि संशोधक वृत्तीची,
परंतु संन्यस्त, रुक्ष, कठोर तर अशी हि प्रगल्भ बुद्धीची  कुंभ .

*ह्या राशीत तीन नक्षत्र येतात*. धनिष्ठा, शततारका, आणि पूर्वा भाद्रपदा.  

*धनिष्ठा* – याची आकृती मृदंगासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती  महत्वाकांक्षी, आशावादी,  विविध पदार्थ खाण्याची विशेष आवड, बौद्धिक खेळाची आवड  असते. नक्षत्र स्वामी : मंगळ.

*शततारका* – याची आकृती वर्तुळाकृती दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती  शांत पण स्वतःची ठाम मते असणा-या. भौतिक जगापेक्षा कल्पनेच्या विश्वात रमणारे. तत्त्वज्ञ, वायफळ गप्पा न आवडणारे. कायदा हा आवडीचा विषय. प्रामाणिक, स्पष्टवक्ते, कुटुंबावर प्रेम करणारे, मानसन्मान मिळतो. नक्षत्र स्वामी : राहू

*पूर्वा भाद्रपदा* – याची आकृती हस्तिदंताप्रमाणे दिसते. या नक्षत्रावर जन्मलेले उदार मताचे, ज्ञानशील पण चटकन संतापणारे, वृत्तीने लढवय्ये पण लवकर निराश होणारे व अस्वस्थ स्वभावाचे. नक्षत्र स्वामी : गुरु.

कुंभ राशीच्या व्यक्ती खोलवर विचार करणा-या आणि एखादी गोष्ट विस्तृत वर्णन करून सांगणा-या असतात. बुद्धीने प्रगल्भ, शिवाय नर्मविनोदी असतात.

*कुंभ  राशीची स्त्री कशी उखाणा घेईल*:

१)सागवानी पेटीला सोन्याची चूक,
आनंदच्या हातात असते कायद्याचे बुक.

२)लग्नात लागतात हार आणि तुरे ,
अमितचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे !

*या  राशीचा पुरुष  कसा उखाणा घेईल*:-

१)विज्ञानाने शोध लावला मानव गेला चंद्रावर ,
मनीषाचे नाव सदैव कोरले माझ्या मनावर.

२ ) लग्न झालं आमचं, बातमी वाऱ्यावर पसरली
सगळ विसरायची आहे सवय अमिताला
नशीब मला नाही विसरली.

*कुंभ  राशीचा एक किस्सा *…यामुळे या राशीचा स्वभाव समजायला मदत होईल …

ह्या राशीची माणसं सतत कसला तरी विचार करत असतात आणि आपल्याच तंद्रीत असतात.

१ ) कुंभ राशीचे वसंतराव वैज्ञानिक असतात. त्यांच्या घरी त्यांचा मित्र जेवायला येतो. त्याच्या लक्षात येतं   की वसंतराव त्यांच्या बायकोला डार्लिंग, हनी, प्रिये, सखे अश्या वेगवेगळ्या प्रेमळ नावांनी हाक  मारताहेत.

तो मित्र वसंतरावांना विचारतो, “तुमच्या बायकोवर तुमचे इतके प्रेम आहे. तुम्ही नेहमीच तिला अशीच लाडीकपणे हाक मारता”.

वसंतराव  हळूच म्हणतात, ‘तुला वाटते तसं नाहीये’.

‘मला बऱ्याचदा माझ्या बायकोचं नावच आठवत नाही’.

२ ) एक “वृषभ राशीचा” प्रियकर आपल्या “कुंभ राशीच्या” प्रेयसीला म्हणाला, तू माझ्या आयुष्याचा सूर्यप्रकाश आहेस. तुझ्याशिवाय माझं आयुष्य म्हणजे रखरखीत वाळवंट आहे. तू जणू सुखद पावसाळी हवा आहेस. हिवाळ्यातील थंड वा-याप्रमाणे तू माझ्या हृदयात आहेस.

कुंभ राशीची प्रेयसी म्हणते “तू माझ्यावर प्रेम व्यक्त करत आहेस का हवामानाचा अहवाल सांगतोयस.”

*माफी मागण्याची पद्धत*.

या राशीच्या व्यक्ती ढोंगी नसतात. स्वच्छ मनाच्या असतात. त्यांची चूक झाल्याचे त्यांना जाणवल्यावर त्या व्यक्ती माफी तर मागतीलच. पण त्यांच्या चुकांमुळे जे समोरच्या व्यक्तीचे नुकसान झालं असेल त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करतील.

कुंभ राशीची मंडळी तत्त्वज्ञानी, संशोधक असतात.

*एक शेर पाहूया* …

“*रूकता नही तमाशा, रहता है खेल जारी*,
*उसपर कमाल यह है, की दिखता नही मदारी*”.

*बारावी रास मीन*

वाचक हो हे राशीगुण वाचून आला का शीण.
तरी ऐका ही राशीतील बारावी  रास मीन,
स्वामी गुरु, जल तत्त्व, गौर वर्णी, सात्विक मोठे डोळे, मऊ केसं,
अशी विचारात घ्यावी ही रास.. नम्र, परोपकारी, मायाळू, नाजूक परंतु संथ,
सत्वगुणांचा काही वेळा अतिरेक, *अशी  देवभोळी व सेवाभावी मीन*.

*ह्या राशीत तीन नक्षत्र येतात*. पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती.

*पूर्वा भाद्रपदा* – याची आकृती हस्तिदंताप्रमाणे दिसते. या नक्षत्रावर जन्मलेले. उदार मताचे, ज्ञानशील, लवकर निराश होणारे व अस्वस्थ स्वभावाचे. नक्षत्र स्वामी : गुरु.

*उत्तरा भाद्रपदा* – याची आकृती जुळ्यांसारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेले कलाप्रेमी, विचारी, चिंतनशील  सरळमार्गी, सज्जन परंतु धीमे व संथ पद्धतीने काम करणारे. नक्षत्र स्वामी : शनी.

*रेवती* – याची आकृती मृदंगासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेले. शांत, मनमिळाऊ, कुटुंबात, आर्थिक चणचण नसते, उत्तम व सुसंस्कृत माणसांशी संबंध ठेवणारे. नक्षत्र स्वामी : बुध.

मीन  राशीच्या व्यक्ती नको त्या बाबीत चिंतनशील असतात.  गोष्ट थोडक्यात न सांगता रटाळपणे सांगतात. उगाचच नको त्या गोष्टीचा विचार करत असल्याने सांगताना विनाकारण गुंतागुंत निर्माण करतात..

*ह्या राशीची स्त्री कशी उखाणा घेईल*:

*काही जानपद उखाणे पाहू*…

“जानपद उखाणा” म्हणजे मोठेच्या मोठे, लांब, लांब उखाणे असतात. त्यास “जानपद उखाणे” असे म्हणतात. ते निघतात स्वयंपाकघरातून किंवा असेच कुठून तरी मग, सर्व गावभर वळसा घालून येतात तेव्हा, केव्हातरी नवऱ्याचे नाव येऊन जाते, हे कळतच नाही. पण, ऐकण्यास खूप मजा वाटते…

१ ) रुणूझुणु झुण्यात बसून आले मेण्यात, खण चोळी अंगात शेंदूर भरला भांगात,
लवंग वाटीत, वेलची मुठीत, सोन्याची किल्ली उघडली खोली.
खोलीत होते सात हंडे ,हंड्यावर होती परात, परातीत होता भात, भातावर तूप
सोन्यासारखे इकडचे रूप, शोभिवंत चिरेबंदी वाडा,
मिलिंद तुम्ही हातातील काम सोडा आणि मला माहेरला धाडा.

२ ) अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना
आनंदचे नाव घ्यायला शब्द काही जुळेना.

*ह्या राशीचा पुरुष  कसा उखाणा घेईल*:-

१ ) देशात देश भारत देश, भारत देशात राज्य फार,
राज्यात राज्य महाराष्ट्र, महाराष्ट्रात शहरे फार,
शहरात शहर डोंबिवली शहर , डोंबिवली शहरात आहे बाजी प्रभू चौक,
बाजी प्रभू चौकात आहे हनुमान मंदिर, हनुमानाच्या खांद्यावर आहे गदा
आणि शर्मिलावर मी झालो एकदम फिदा.

२ ) मनुष्याचे शरीर आणि हत्तीचे तोंड ,मोठ्या पोटावरती रुळते त्याची सोंड
कुणी म्हणतो गणपती ,कुणी म्हणतो गणेश ,सर्व देवांमध्ये त्याचा मान आहे विशेष ,
सोवळे लाल ,गंध फुलंही लाल लाल ,मंदा आरती करते तेव्हा मी धरतो ताल …

*ह्या राशीची माणसे सर्वसाधारणपणे वेंधळी असतात*. *कित्येकदा ते चांगले काम करायला जातात, पण घडते भलतेच*. *त्यांचा हेतू शुद्ध असतो,पण परिणाम विपरीत होतो*.

*मीन राशीचा किस्सा*……

१ ) रस्त्याने जाताना एका घराला आग लागलेली दिसते. मीन राशीचा हा माणूस परोपकाराच्या भावनेने त्या आग लागलेल्या घरात घुसतो आणि एका माणसाला बाहेर घेऊन येतो. तरीही पोलीस त्याला अटक करतात. कारण तो फायर ब्रिगेडच्या जवानालाच बाहेर घेऊन येतो.

२ ) मीन राशीचा निखील वीणाला म्हणतो, “तू सांगितले नाहीस तुझ्या अंगात देवी येते ते !”

वीणा किंचाळून म्हणाली, “काय ?”

निखील म्हणाला, “तुझा केसं विस्कटलेला डी.पी. बघीतला “,

वीणा रागाने उद्गारली, “मुर्खा, अंघोळ झाल्यावर काढलेला सेल्फी होता तो …”

*माफी मागण्याची पद्धत

ह्या व्यक्तीना मुळातच आपण चुकलो हेच कळत नाही.. समोरच्या व्यक्तीचा हा गैरसमज आहे असं त्यांचे ठाम मत असते. त्यामुळे मीन राशीच्या व्यक्ती सहसा कधीही माफी मागत नाहीत.

मीन राशींची माणसे परोपकारीही असतात, पण भाबडी असतात.

*एक शेर बघूया*: मीन राशीचा असफल प्रेमी म्हणतो,

“चलो  तुम्हारे प्यार में कुछ तो बन सका,
शोहर न बन सका, शायर तो बन गया..”

राशीनुसार स्वभाव जाणून घेताना लग्न रास, चंद्र रास, नक्षत्र, ग्रहांची /राशींची दृष्टि ,आदी अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात याबाबत माहिती घेतली. पण ढोबळमानाने एखाद्या राशीचा स्वभाव आणि त्या राशीची व्यक्ती कसा उखाणा घेईल हे पाहिले. तसेच राशींचे स्वभाव वर्णन करणारे किस्से आपण ऐकले.

शेवटी पुन्हा एकदा एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की ही लेखमाला फक्त मनोरंजनात्मक आहे. यातील गोष्टी कुणीही personally घेऊ नयेत.

या लेखमालेचा शेवट *स्वरचित उखाण्यानेच* करते,

“*आता मी पुरे करते, लिहित नाही अती*,
*चला, तुमची रजा घेते, अजितची क्रांती*”.

(*समाप्त*)
– © अ‍ॅड. क्रांती आठवले-पाटणकर
*डोंबिवली.*
*9969087559*
*०८.१०.२०२५*

*(सदर लेख माझ्या नावासह अग्रेषित करायला हरकत नाही.)*
*(ही लेखमाला माझ्या फेसबुक वॉलवर वाचता येईल)*

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

उत्तरे द्या आणि ज्ञानात भर घाला

प्रश्नसमूह  ५

.बुलेट ट्रेनबद्दल आपणास किती माहिती आहे ?  :-

१) बुलेट ट्रेन म्हणजे काय ?

२)  भारतातील बुलेट ट्रेनचा वेग किती असेल ?

३) भारतातील बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरांमध्ये धावणार आहे व किती किलोमीटर लांबीचा रेल पथ आहे ?

४)भारतातील बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणे अपेक्षित आहे ?

५)  बुलेट ट्रेनच्या  एका गाडीला किती डबे असतील ?

६) दिवसातून किती गाड्या सुटतील ?

७) कोण कोणत्या स्थानकांवर बुलेट ट्रेन ही गाडी थांबेल ?

८) रोज ३५ गाड्या सोडण्याकरिता किती डबे साखळ्या (रेक्स) कारखान्यात बनवण्यात येतील ?

९) बुलेट ट्रेन या गाडीचे भाडे काय असेल ?

१०) बुलेट ट्रेनच्या प्रवासाचा वेळ किती असेल आणि तिच्यामुळे प्रवासाचा किती वेळ वाचेल ?

११) भारतीय बुलेट ट्रेन कोणाच्या तांत्रिक  व आर्थिक सहकार्याने बनत आहे ?

१२) जगात अजून कोठे कोठे बुलेट ट्रेन धावतात ?

१३) इतर देशातील जलद गती आगगाड्यांचा म्हणजे बुलेट ट्रेनचा ताशी वेग काय आहे ?

१४) बुलेट ट्रेन इतका वेग कसा घेऊ शकते ?

१५) मॅगलेव्ह बुलेट ट्रेन म्हणजे काय ?

१६) मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन नंतर पुढे काय ?

वाचक मित्रांनी वरील प्रश्नांची उत्तरे लेखकाकडे न पाठवता संपादकांच्या ईमेल पत्त्यावर पाठवावी ही विनंती. 

उत्तरे पाठवणे शक्य नसल्यास आपली प्रतिक्रिया पाठवू शकता.    

– ©️ विलास सातपुते 

vilas.satput54@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

ढगपेरणी : कृत्रिम पर्जन्य

अभि क्रंद स्तनय गर्भं धा उदन्वता परिदिया रथेन
दृतिं सुकर्ष विषितं न्यंच समाः भवन्तूद्वतो निपादाः ।।
( भावार्थ – (हे पर्जन्यदेव) पृथ्वी सन्मुख होऊन गर्जना करा. औषधीत गर्भ(जल)ची स्थापना करा. जलयुक्त रथाच्या सर्व बाजुंनी प्रदक्षिणा करा. विशिष्ट प्रकारे बंदिस्त असलेल्या जलपात्राचे मुख खालच्या दिशेने करून जल मुक्त करा. )
ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलात पर्जन्यसुक्त ही प्रार्थना आहे. माणूस शेती करू लागला आणि मग पावसाची वाट पाहणे त्याच्या नशिबी आले. प्रार्थना हे त्या दिशेने पहिले पाऊल होते. ख्रिश्चन, मुस्लिमातही पावसासाठी प्रार्थना आहेत. पर्जन्ययाग, आदिम समूहांची पर्जन्यनृत्ये हाही अशा प्रयत्नांचाच एक आविष्कार. पावसासाठी प्रार्थनेपासून ते कृत्रीम पर्जन्यापर्यंतचा इतिहास रंजक तसाच उद्बोधक आहे.

मानवी प्रयत्नांनी ढगातून पाऊस पाडणे म्हणजे कृत्रिम पर्जन्य होय. पाऊस ढगातून पडतो. पण हजारो वर्षे ढगांपर्यंत पोहोचणे माणसाला शक्य नव्हते. तोफांचा शोध लागल्यावर उंच आकाशात काही फेकणे माणसाला शक्य होऊ लागले. पूर्वी युरोपात असा समज होता, की विजेच्या कडकडाटमुळे ढगातून पाऊस पडतो. युरोपातील सप्तवार्षिक युद्ध, नेपोलियनची युद्धे, अमेरिकेतील यादवी युद्धे यानंतर पाऊस पडल्याचा अनेक घटना सांगितल्या जात. यामुळे अनेक शहरात पावसासाठी तोफांचे बार केले जाऊ लागले. एकोणिसाव्या शतकात अमेरिकन सैन्यातील रॉबर्ट डायरेन्फोर्थ हे ‘रेन मेकर’ म्हणून ओळखले जात. वरील प्रकारे टेक्सासमध्ये पाऊस पाडण्यासाठी नऊ हजार डॉलर्सची स्फोटके विकत घेण्यात आली होती. पण डायरेन्फोर्थ यांच्या निगराणीखाली झालेले ते प्रयोग निष्कर्षहीन ठरले. १८९१ मध्ये जर्मन संशोधक लुई गाथमन यांनी असे सुचवले की पावसाच्या ढगात द्रवरूप कार्बन डाय ऑक्साईड फवारल्यास पाऊस पडेल. १९०३ मध्ये ल्युक हॉवर्ड यांचे ढगांचे वर्गीकरण प्रकाशित झाले व ढगांचे स्वरूप समजू लागले.

१९३० च्या दशकात बर्गेरॉन – फिंडसेन नावाची प्रक्रिया शोधली गेली. त्यानुसार ढगात अतिशीत पाण्याचे थेंब असतात. शून्य ते – ४० अंश से. पर्यंत द्रवरूपात असणारे पाणी म्हणजे ‘अतिशीत पाणी’ होय. शून्य अंशापेक्षा कमी तापमान असणाऱ्या ढगात अतिशीत पाणी असते. असे अतिशीत जलबिंदू गोठण केंद्राच्या संपर्कात आले, तर ढगात हिमस्फटिक व अतिशीत जलबिंदूचे मिश्रण तयार होते. ते जलबिंदू  हिमस्फटिकाभोवती साकळून पाण्याचे थेंब बनतात व ते पुरेसे मोठे व जड झाले की पाऊस पडतो. तात्पर्य ज्यात पुरेसे अतिशीत जलबिंदू आहेत, त्या ढगात गोठणकेंद्रके (Freezing nuclei) पोचली तर पाऊस पाडणे शक्य होते.

१९३६ मध्ये जपानी शास्त्रज्ञ युकिशिरो नकाया यांनी सर्वप्रथम कृत्रिम हिमवृष्टीचा पहिला प्रयोग केला होता. इरविंग लँगमुर हे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ. ते अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक कंपनीत असतांना व्हिन्सेंट शिफर हे त्यांचे संशोधक सहाय्यक होते. त्या दोघांनी बर्गेरॉन – फिंडसेन प्रक्रिया पडताळून पाहिली. त्याच काळात शिफर यांनी जुलै १९४६ मध्ये कृत्रिम पर्जन्य किंवा ढगपेरणीचे ( Cloud seeding) तंत्र शोधले, तोही एक किस्साच आहे. जनरल इलेक्ट्रिक’च्या प्रयोगशाळेत गोठण केंद्रक म्हणून मीठ, टाल्कम पावडर, माती इ. वापरून शिफर अतिशीत ढगात स्फटिक निर्मितीचे प्रयोग करीत होते. त्यासाठी डीप फ्रीजमध्ये अतिशीत ढग तयार करण्याचा प्रयत्न चालू होता. एक दिवस प्रयोग करतांना डीप फ्रीज पुरेसे थंडच होत नाही हे पाहून शिफर थोडे त्रस्त झाले. फ्रीज अधिक थंड करण्यासाठी त्यांनी त्यात थोडा कोरडा बर्फ (घनरूप कार्बन डाय ऑक्साईड) टाकला. आणि अचानक डीप फ्रीजमध्ये अतिशीत ढग व त्यात असंख्य हिमस्फटिक व जलबिंदू तरंगताना दिसू लागले. अनपेक्षितरीत्या त्यांना ‘ढगपेरणी’ म्हणजेच कृत्रिम पर्जन्याचे तंत्र सापडले होते. तो दिवस होता 14 जुलै 1946. महिन्याभरातच शिफरचा सहकारी बर्नार्ड व्होनेगट याने सिल्वर अयोडाईड वापरून ढगपेरणी करण्याची पद्धत शोधून काढली.

कृत्रिम पर्जन्याचा पहिला प्रयोग १३ नोव्हेंबर १९४६ रोजी अमेरिकेत करण्यात आला. एका ढगावर अडीच किलोग्राम शुष्क बर्फाची फवारणी करून शिफर यांनी माउंट ग्रेलॉक इथे हिमवृष्टी साध्य केली. पुढे जगभर विविध देशात ढगपेरणीद्वारे कृत्रीम पर्जन्याचे प्रयत्न करण्यात येऊ लागले. पर्जन्यास अनुकूल अशा ढगातूनच कृत्रिम पर्जन्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यात फवारण्याचे (पेरणीचे) रसायन ढगांच्या तापमानावर अवलंबून असते. शून्य अंश से. पेक्षा अधिक तापमान असणाऱ्या ढगात अमोनियम नायट्रेट व युरिया यांचे मिश्रण फावरण्यात येते. तर शून्य अंश से. पेक्षा कमी तापमान असणाऱ्या ढगात कोरडा बर्फ किंवा सिल्व्हर आयोडाईडची भुकटी फवारली जाते. कृत्रिम पर्जन्यासाठी कोरडा बर्फही पेरणी घटक म्हणून वापरतात. रसायनांची फवारणी सामान्यतः विमानातून केली जाते. जमिनीवरूनही जनरेटर्स नावाच्या तंत्राद्वारे उंच ढगात बीजारोपण केले जाते. पण त्या तंत्राचा वापर कमी केला जातो . कोणत्याही ढगात गोठण मिश्रण फवारल्याने पाऊस पडत नाही. त्यासाठी तिथे विशिष्ट प्रकारचे पर्जन्यमेघ असणे आवश्यक असते. आजकाल त्यासाठी रडारची मदत घेतली जाते. रसायने भरून विमाने तयार ठेवतात. रडारद्वारे आकाशाचा वेध घेऊन वैमानिकांना संदेश दिला जातो. मगच त्या विशिष्ट ठिकाणी जाऊन ढगात फवारणी केली जाते. अशा प्रयत्नातू दहा टक्क्यांपर्यंत पर्जन्य प्राप्त केल्याचे दावे करण्यात आले आहेत.

कृत्रिम पर्जन्याचा वापर एखाद्या प्रदेशातील पाणी पुरवठ्यात वाढ , पाणीटंचाई वर मात, जलसिंचन, विद्युत निर्मिती अथवा इतर कारणांसाठी केला जातो. उदा. अमेरिकी सैन्याने १९६७ ते १९७२ दरम्यान व्हिएतनाममध्ये कृत्रीम पर्जन्याद्वारे मान्सूनचा पाऊस महिनाभर अधिक मिळवण्यात यश मिळवले. १९८३, १९८४ ते ८७ व १९९३ – ९४ मध्ये तामिळनाडूत दुष्काळ पडला होता. त्या काळात तेथे कृत्रिम पर्जन्याचा वापर केला गेला. २००३ व २००४ मध्ये कर्नाटक व महाराष्ट्रात कृत्रिम सिंचनाचे प्रयोग केले गेले. भारतातील ‘सृष्टी एव्हीएशन’ ही कंपनी कृत्रीम पर्जन्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

पण कृत्रीम पर्जन्याच्या वापराबद्दल मतभिन्नता आहे. एक तर हे प्रयोग सर्वत्र सारखेच परिणामकारक व उपयोगी ठरलेले नाहीत. दुसरे, समजा कृत्रीम पर्जन्याचा वापर केला नसता, तर नंतर तिथे पाऊस पडला असता की नाही, हे कुणी सांगू शकत नाही. यावर रूटगर्स विद्यापीठातील प्रा. रोबॉक यांचे उत्तर असे.”आपल्या प्रयत्नामुळे एखादया ठिकाणच्या पावसात समजा फक्त दहा टक्के फरक पडला, तरी त्यासाठी केलेला खर्च परवडू शकेल.”

अजून कृत्रीम पर्जन्याच्या सहपरिणामांबद्दल (Side effects) पुरेसा अभ्यास झालेला नाही. उदा. ढगपेरणीतून वातावरणात मिसळणारी सिल्व्हर अयोडाईड सारखी संयुगे पर्यावररणास घातक ठरू शकतात. तसेच एखाद्या भागातील कृत्रीम पर्जन्यामुळे दुसऱ्या ठिकाणच्या पावसात घट होते का हे अजून निश्चित झालेले नाही. चीनमध्ये २००४ च्या बीजिंग ऑलिंपिकच्या वेळी पावसामुळे स्पर्धेवर पाणी फिरू नये यासाठी ढगपेरणीद्वारे पाऊस इतरत्र वळवण्याची फार मोठी व तयारी करण्यात आली होती. पण त्यातून इतर भागात अनावृष्टी व अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे त्यावर टीका झाली होती.

पर्जन्य असो, फळे पिकवणे किंवा खते – जे नैसर्गिक ते श्रेष्ठ, हे तर निर्विवादच आहे. पण अस्तित्वाचाच प्रश्न येतो किंवा जेव्हा अपरिहार्यच ठरते, तेंव्हा ही तुलना अनावश्यक होते. पर्यावरणाच्या संदर्भात अस्तित्वाचा प्रश्न केव्हां मानायचा किंवा अपरिहार्य केव्हा ठरते याचा योग्य निर्णय म्हणजेच भूगोल विवेक. मानवाचे शास्त्रीय नाव होमो सेपियन्स आहे. यातील सेपियन्स म्हणजे विवेकशील. मानवाचे पर्यावरणाच्या बाबतीतले वर्तन त्याच्या नावाला सार्थ करील अशी आशा करू या.

– एल.के. कुलकर्णी
lkkulkarni.nanded@gmail.com
सोबतचे चित्र : कृत्रीम पर्जन्य ( इंटरनेटवरून साभार )

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन

   

– ©️ रामचंद्र देशमुख

संपर्क : ९९३०२४६९८९

  प्रेषक मेघना घाटे 

meghanaghate25@gmail.com

@@@

  • ©️ मिलिंद महाबळ 

milind.mahabal65@gmail.com 

@@@

 –  युती प्रवीण अघोर  

प्रेषक शुभदा प्रवीण अघोर     

shubhadaaghor@gmail.com

@@@@@@@@@@@@@@@@@

महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. 

@@@@@@@@@@@

महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.

@@@@@@@@@@@@@@

भारतीय हिंदी चित्रपट संगीताची उत्क्रांती

 

स्वागत फुलांनी

     माणसाच्या कोणत्याही संवेदना, कल्पना घटनेला आकर्षक रीतीने लोकांसमोर आणण्याचे चित्रपट हे एक सशक्त सर्वात प्रभावी माध्यम आहे. माणसाच्या भावनांना अभिव्यक्त करून त्याला जिव्हाळ्याची आणि सकारात्मक दिशा देऊन त्याचे प्रभावी चित्रण म्हणजेच चित्रपट. १९५० ते १९७० हा काळ चित्रपट संगीताचा महत्त्वाचा असा सुवर्ण काळ होता. सुरुवातीला त्या काळात महिन्याला एक तरी चित्रपट प्रकाशित होत होता आणि प्रत्येक चित्रपटात आठ ते दहा गाणी तरी असत. या गाण्यामुळेच चित्रपटांची लोकप्रियता शिगेला पोचली होती.

    चित्रपटातील गाणी एखाद्या दृश्याचा भावनिक भाग वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे प्रेक्षकांवर त्याचा उचित परिणाम होत असतो. ही गाणी भावना स्पष्ट करण्यास देखील मदत करतात. बऱ्याचदा आपण एखाद्या पात्राला भावनिक गोंधळातून जात असताना पाहतो पण त्याला काय अनुभवावे लागले आहे हे पूर्णपणे समजत नाही. अशावेळी त्याचे एखादे गाणे असले तर त्या गाण्यातून त्याच्या भावना एकही शब्द न बोलता प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. उदाहरण द्यायचे असेल तर ‘वक्त ने किया, क्या हंसी सितम’ नायिकेची अगतिकता कुणाला समजत नाही. वेगळे होण्याचे  दुःख काळजातील तगमग  सगळे काही अगदी मोजक्या शब्दात कैफी आजमी यांनी आपल्या गीताय व्यक्त केल्या आहेत. ‘जायेंगे कहॉं सुझता नही’  किंवा ‘क्या तलाश है, कुछ पता नहीं’.या गाण्याला एसडींच संगीत अधिक उदास करणारे  बचैनी वाढवणारं असंच आहे. संगीतातून अपेक्षित परिणाम साधल्यामुळे चित्रपटांचं महत्त्व वाढतं चित्रपट संगीत हे दृश्यांच्या नाट्यात भर घालते. जुन्या काळातील अर्थपूर्ण चित्रपट गीते अतिशय सक्षम कवींनी लिहिलेली होती कारण सर्वच गीतकार एक शायर आणि उत्तम कवी होते. आणि त्या गीतांना एकाहून एक धुरंदर संगीत दिग्दर्शकांनी संगीतबद्ध केले होते. त्यामुळे त्या काळातील गीते आजही अतिशय लोकप्रिय आहेत.

         १९५० च्या दशकापूर्वी हिंदी चित्रपट बहुतेक ग्रामीण भारताच्या कथा सांगणारा होता. जमीनदार, शेतकरी यातले संघर्ष, गावचे चित्रण, गावकऱ्यांवर होणारा अत्याचार, अंधश्रद्धा हेच सामान्य विषय होते. हळूहळू काळ बदलत गेला. चित्रपटात देवानंद, राज कपूर यासारख्या अभिनेत्यांच्या आगमनानंतर निर्मात्यांचे लक्ष  शहराकडे वळले. त्याचवेळी खेड्यापाड्यातून लोक मोठ्या संख्येने शहराकडे येऊ लागले होते. विशेषतः युवा वर्ग नोकरीच्या शोधात शहराकडे वळू लागला होता. नोकरीच्या निमित्ताने मेट्रो शहराकडे वळणाऱ्या तरुण वर्गाचे चित्रण ‘बाजी’ (१९५१), आवारा (१९५१) श्री ४२० चित्रपटात पाहायला मिळते. या चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली. बाजी’ चित्रपटातील एसडींचे ‘तदबीर से  बिगडी हुई तकदीर बना दे’,’आज की रात पिया’ आवारातील शंकर जयकिशनचे ‘दम भर जो ईधर मुंह’, ‘आवारा हूं, ‘हम तुझसे मोहब्बत करके सनम’, ‘एक बेवफा से प्यार किया’; श्री ४२० चित्रपटातील शंकर जयकिशन यांचे ‘दिल का हाल सुने दिलवाला’, ‘इचक दाना बीचक दाना’, ‘मेरा जूता है जपानी’, ‘मुडमुड के ना देख मुड मुडके’, ‘ओ जानेवाले’ ‘रमय्या वस्तावय्या’ गाणी अतिशय लोकप्रिय झाली.

     त्याच काळात १९५१ मध्ये अलबेला चित्रपटात भारतीय शास्त्रीय संगीता सोबत जाझचे मिश्रण करून सी. रामचंद्र यांनी ‘शोला जो भडके, दिल मेरा धडके’; ओपी नय्यर यांनी ‘आरपार’ मध्ये ‘बाबूजी धीरे चलना’, ‘हावडा ब्रिज’मध्ये ‘मेरा नाम चीन चून चू’ गाणी रचून इंडोजाझ नावाच्या नवीन शैलीला जन्म दिला. शंकर जयकिशन यांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या त्यांच्या अफाट ज्ञानासोबतच पाश्चात्य संगीताची ओळख करून दिली. दोन्ही संगीताचा मेळ घालून एक नवीन प्रकार सादर केला- इंट्रोम्युझिक. :घर आया मेरा परदेसी’ भैरवी रागावर आधारित असलेल्या या गाण्यात बेंजोलीनचा अद्भुत वापरा बरोबर त्यांच्या जादुई वाद्यवृंदाने शंकर जय किशन यांनी बहार आणली. श्री ४२० मधील ‘मेरा जूता है जपानी’ गाण्यात अकॉर्डियनची जादू जाणवते. या सर्व संगीतकारांनी नवनव्या शैलीला जन्म दिल्यामुळे चित्रपट पाश्चात्य संगीताकडे वळू लागला. हळूहळू चित्रपट संगीतातला बदल जाणवू लागला.

   १९५० ते १९६० च्या सुवर्णकाळात नौशाद, एसडी बर्मन, शंकर जयकिशन, ओपी नय्यर, सारखे दिग्गज संगीतकार उदयास आले. या संगीतकारांनी कालातीत संगीत निर्माण केले जे पिढ्यानपिढ्या जपले जात आहे. लता मंगेशकर, गीता दत्त, शमशाद बेगम, आशा भोसले, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, तलत यासारखे पार्श्वगायक त्या काळात उदयास आले आणि बॉलीवूड संगीताचे प्रतिष्ठित आवाज बनले. संगीतकारांच्या भावपूर्ण सुरांनी हिंदी चित्रपट संगीताचे प्रणेते म्हणून त्यांनी आपले स्थान ठळक केले.

      १९५० ते १९६० च्या दशकापासून भारतीय चित्रपट संगीतात गिटार, ट्रंपेट, पियानो, सेक्सोफोन सारख्या पाश्चात्य वाद्यांचा उपयोग होऊ लागला होता. भारतीय आणि पाश्चात्य वाद्यांचे फ्युजन सुरू झाले होते आणि संगीतातील हा बदल चहात्यांनी उचलून धरला. त्या काळात उत्कृष्ट दर्जाचे शास्त्रीय संगीत असलेल्या चित्रपटांमध्ये विशेषतः बैजू बावरा (१९५२), वसंत बहार (१९५६), मुगले आजम चित्रपट खूप गाजले. नौशाद, अनिल विश्वास, सी.रामचंद्र यासारख्या संगीतकारांनी भारतीय शास्त्रीय संगीत, प्रादेशिक लोकगीते, पारंपारिक सुरांचे आणि आधुनिक वाद्यवृंदांचे सुरेख मिश्रण करून आपल्या रचनांमध्ये सांस्कृतिक समृद्धतेची भावना ओतली. सर्व प्रतिभान संगीतकार त्यांच्या सर्जनशीलतेच्या सर्वोत्तम पातळीवर होते. महान गीतकारांनी लिहिलेल्या शब्दांना संगीत देऊन शिखरावर असलेल्या गायक गायकांनी ती गाणी गायली होती. मदन मोहन, रोशन, एसडी बर्मन, शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, ओपी नय्यर, कल्याणजी आनंदजी यासारखे एकापेक्षा एक धुरंधर संगीतकार होते ज्यांनी संगीत रचनेत उल्लेखनीय बदल घडवून आणला आणि पाश्चात्य संगीताचा प्रभाव हळूहळू अधिक ठळक होत गेला. नवरंग, मुगल-ए -आजम चित्रपटांमध्ये बारकाईने कोरिओग्राफ केलेल्या गाण्यातून हा बदल स्पष्ट दिसून येतो.

      हिंदी चित्रपट सृष्टीत पाश्चात्य संगीताच्या उदयाचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्वतंत्रता प्राप्तीनंतर गोव्याहून मुंबईत स्थलांतरित झालेले संगीतकार पोर्तुगीज आणि युरोपियन संस्कृतीशी लवकर परिचित झाले होते. हे संगीतकार पाश्चात्य संगीतात पारंगत होते. त्यांनी शंकर जयकिशन, सी. रामचंद्र, ओपी नय्यर सारख्या संगीत दिग्दर्शकांना मदत केली आणि भारतीय संगीतामध्ये जाझ ध्वनी अपरिहार्यपणे मिसळले.

  नंतरच्या काळात १९६० ते १९७० च्या दशकात चित्रपटातील ध्वनी आणि गाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या. रेकॉर्डिंगची गुणवत्ता सुधारत गेली आणि मल्टी ट्रॅक रेकॉर्डनची सुरुवात झाली. तंत्रज्ञानातील सुधारणामुळे आर डी बर्मन, ओपी नय्यर आणि कल्याणजी आनंदजी यासारख्या संगीतकारांना नाविन्यपूर्ण साऊंड ट्रॅक तयार करण्याची संधी मिळाली. चित्रपट संगीतातील या संक्रमणाचा काळ ऑल इंडिया रेडिओ आणि नंतर दूरदर्शनच्या व्यापारीकरणाशी जुळला आणि चित्रपट संगीत अधिक जलदपणे आणि सोयीस्करपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचले.

       आरडीने १९६१ मध्ये संगीतकार म्हणून  पदार्पण केले पण तिसरी मंजिल (१९६६) चित्रपटाच्या गीतांनी त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यांनी एक आयकॉनिक साऊंड ट्रॅक तयार केला. रॉक, जाझ, लॅटिनो (स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषिक देशांमधील संगीत. लॅटिनो संगीतात सालसा बेंजो, कुंबिया, रेगेटन, वॅल्झ रॅप आणि हिप हॉप शैलीची संबंधित  अनेक प्रकारच्या शैलींचा समावेश आहे. या संगीतातील लय आणि ताल तीव्र आणि आकर्षक असतात. नृत्य संगीतासाठी हे लोकप्रिय आहे. त्यात पियानो ड्रम गिटार बास यासारख्या वाद्यांचा देखील उपयोग केला जातो. लॅटिनो संगीत हे विविधतेचे आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे.) आणि व्टिस्टचे मिश्रण करून एक नवीन कॅनव्हास तयार केला. तंत्रज्ञानाची उच्च प्रतीची  समज असल्यामुळे केवळ इलेक्ट्रॉनिक वाद्यांचाच नव्हे तर इतर उपलब्ध असलेल्या उपकरणांचा उपयोग करून त्यांनी समकालीनांपेक्षा उच्च दर्जाचे समृद्ध असे संगीत दिले.

     विज्ञान-तंत्रज्ञानामुळे सगळं जग जवळ येत असताना स्वाभाविकच त्याचा प्रभाव संगीतावर देखील पडला. ते सुद्धा ग्लोबल झाले. आरडींची वाद्य, वाद्य वाजवण्याची पद्धत सारच बदलले. आरडी पाश्चात्य, अरबी ओरिएंटल संगीताने प्रभावित होते. त्यांनी त्या त्या संगीतातील घटकांचा समावेश आपल्या संगीतात करून घेऊन संगीत अधिक समृद्ध बनवलं. ‘मेहबूबा मेहबूबा चे’ गाण्याचे सुरुवातीचे बीट्स बिअरच्या बाटल्यात पाणी भरून फुंकर घालून केलेले आहेत तर :यादों की बारात चित्रपटातील ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ गाण्यासाठी टिंगलिंग आवाज तयार करण्यासाठी कपबशीचा वापर केला आहे. ‘मेरे सामनेवाली खिडकी मे’ चित्रपट गीतात खडबडीत पृष्ठभागावर कंगवा घासून खडबडीत आवाज काढला आहे. आरडींची गाणी सुरू होताना लांबलचक आर्केस्ट्रा पीस असतो त्यानंतर गाण्याचे बोल येतात हे त्यांचे वैशिष्ट्य. बऱ्याच गाण्यात हा प्रयोग त्यांनी केला आहे. त्यांचा प्रभाव त्यांच्या समकालीनांवर राजेश रोशन बप्पी लहरीवरच नाही तर जतिन ललित विशाल भारद्वाज, शंकर- अहसान – लॉय या संगीत  दिग्दर्शकांच्या पुढच्या पिढीवर देखील दिसून येतो.

     १९६० ते १९७० चे युग बॉलीवूड संगीतातील प्रणय आणि सुरांचे युग होते. पार्श्वगायकांच्या संगीत प्रतिभा शिगेला पोहोचल्या होत्या. त्या काळातील कालातीत रचना अर्थपूर्ण गाणी त्यातील भावनिक खोली आणि त्यानुरूप संगीतकारांनी दिलेले संगीत सगळंच अद्भुत असंच होतं. या काळातील गाणी, त्यातले संगीत आजही रसिकांच्या हृदयात एक विशेष स्थान व्यापून आहे. त्या काळात भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात उत्तम युगांपैकी एक आहे.

      १९७० च्या दशकातील संगीताला त्याची ओळख शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला. या दशकात कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर डी बर्मन यांनी स्वतःच्या वेगळ्या शैली विकसित केल्या. आरडींनी हिंदी चित्रपट संगीतात एक नवीन ट्रेंड सुरू केला. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजाबरोबर इलेक्ट्रॉनिक वाद्यांनी चित्रपट संगीतात आमूलाग्र बदल घडवून आणला. शोले, पडोसन, तिसरी मंजिल, यादों की बारात, हरे राम हरे कृष्ण, आणि या संगीताच्या अगदी विरुद्ध असे संगीत परिचय, आंधी, अमरप्रेम, किनाराला देऊन त्यांनी आपली योग्यता सिद्ध केली. नवीन संगीतात आवाज हा वाद्य, ताल वगैरे बरोबर कसा मिसळतो आणि या हार्मोनीतून कसा प्रभाव निर्माण होतो यावर सिनेमांचे यश मोजले जाऊ लागले.

     १९७० चे दशक हिंदी चित्रपट संगीतासाठी सर्वात गतिमान दशक होते. या काळात डिस्को, कव्वाली, कॅब्रेला अधिक महत्त्व प्राप्त झाले. आजच्या अनेक चित्रपट संगीत प्रेमींसाठी हे दशक अव्दितीय असेच होते कारण त्यांच्याशी जोडण्यासाठी तो काळ खूप जुना नव्हता किंवा आधुनिक ही नव्हता. १९७० च्या दशकापर्यंत गायक, संगीतकार आणि वाद्य संगीत वादकांमध्ये सर्जनशीलता, प्रतिभा आणि संगीत कौशल्याचा शिखर अनुभवला. नंतर ट्रेंड सुरापासून जाझ आणि रॉक अँड रोल ते डिस्को बीट्सकडे वळले. सेक्सोफोन, गिटार, ट्रंपेट, हार्मोनिका यासारख्या वाद्य संगीताने स्टुडिओत प्रवेश केला. शंकर जयकिशन लक्ष्मीकांत प्यारेलाल सारख्या संगीतकारांनी अतिशय सुरेल रचना केल्या ज्या आजही अतिशय लोकप्रिय आहेत.

   १९७० च्या दशकापासून सिनेमा प्रामुख्याने तरुणांना प्राधान्य देत होता. स्वतंत्र भारतात जन्मलेली ही तरुणांची पहिली पिढी होती. या काळातील सिनेमा विशेषतः अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनच्या आगमनानंतर ॲक्शन आणि गुन्हेगारी कथांकडे वळलेला दिसतो. या प्रकारच्या चित्रपटात संगीताला फारसा वाव नव्हता. मग कुठेतरी नाच गाण्याच्या स्वरूपात गाणी येऊ लागली आणि गाण्याचा दर्जा घसरला. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे एकाच चित्रपटात एकापेक्षा जास्त नायक नायिका दिसू लागल्या. प्रत्येकाला महत्त्व देण्याची गरज भासू लागली, त्यामुळे चित्रपटात जास्त गाणी घेणे कठीण होऊन बसले आणि चित्रपट संगीताला घसरण लागली. या काळातील चित्रपटात गाण्याचे महत्त्व कथन म्हणून न होता गाण्यांचा साधन म्हणून उपयोग होऊ लागला. घटकांमुळे हळूहळू संगीताची गुणवत्ता कमी होऊ लागली. रोमांटिक चित्रपटा व्यतिरिक्त इतर चित्रपटात संगीताचे महत्त्व कमी कमी होत गेले.

     १९७४ ला ज्यूली’ चित्रपटातील गाण्यांना अफलातून संगीत देऊन राजेश रोशन ने आपले स्थान अधिक बळकट केले. ‘भूल गया सबकुछ याद नही अब कुछ’ हे किशोर कुमार आणि लतादीदींच्या गाण्याने रसिकांना भारावून टाकले. माय हार्ट इज बिटिंग’ ऐकून श्रोते प्रसन्न झाले. खेल चित्रपटातील इडली हू हे कॅबरे गीत आणि तेच गीत भजन स्वरूपात पेश करून त्यांनी संगीतात क्रांती घडवली. मुंगडा मुंगडा’ गाणे ऐकताना ऐकणाऱ्यांचे पाय नकळत ठेका देऊ लागतात. तबला, सारंगी, बासरी, दिलरुबा, बांगो ट्रंपेट, सेक्सोफोन वाद्यांचा उत्कृष्ट मेळ घालून त्यातून निर्माण होणारी उत्तम सुरावट आणि सहज ओठावर खेळतील अशा चाली हे त्यांचे वैशिष्ट्य.

   बडे गुलाम अली खाँ साहेबांच्या ठुमरी आये ना बालम, का करू सजनी’( स्वामी १९७७ )या गाण्याचे अमित खन्ना यांनी आकर्षक रूपांतर केले आणि राजेश रोशन यांनी तेवढेच उत्कटपणे संगीतबद्ध केले. हे गाणे कथानकाच्या पार्श्वभूमीवर भूमिका बजावत असले तरी आनंद आणि दुःखाचे भाव एकाच वेळ टिपणे संगीतकारासाठी अतिशय आव्हानात्मक होते. राजेश रोशन यांनी ते समर्थपणे पेलले. आनंद व्यक्त करण्यासाठी बासरी आणि मध्यंतरासाठी बासरी वापरली( पहिल्या ओळीत का करू) आणि दुसरे मध्यांतर तुकड्यांसाठी त्यांनी १२ ताराचे गिटार वापरले. सरोद आणि शहनाईचा वापर शबाना आजमींच्या उदास मुडशी संतुलन साधतो.  ‘मेरे पास आओ मेरे दोस्तों आनंद बक्षींचे  हे मुलांचे गाणे आहे. त्यासाठी त्यांनी केवळ अॅकोस्टिक गिटार बोंगो, पियानोचा वापर करून अद्भुत रचना सादर केली. जावेद अख्तरचे :पापा कहते है’ १९९६ मधील गीतात ‘आओ एक बात में कहू तुमसे चाहे फिर कोई ये कहे ना कहे, तुमको अपनी तलाश करनी है हम सफर कोई भी रहे ना रहे, पियानो सॉफ्ट स्ट्रिंग आणि सेक्सोफोनच्या तुकड्यासह तितकेच उत्कृष्टपणे रचलेले हे गाणे.( लय जरी चार बाय चार मीटर मध्ये असली तरीही ड्रम आणि कांगावर बाल्टझी शैलीत उत्कृष्टपणे वाजवली जाते). दुसऱ्या मध्यांतरात चक्क ढोलकवर भारतीय केहरवा  ठेकासाठी सेक्सोफोनचा एक छोटा तुकडा आणि नंतर पुन्हा लय सुरू होते. राजेश रोशनची ही एक उत्कृष्ट रचना आहे. अनेकदा त्यांनी गाण्यातील प्रत्येक अंतराला वेगळे संगीत देऊन नाविन्य पैदा केले आहे. पहिल्या अंतराचे संगीत दुसऱ्या अंतरात कधीच नसते. ‘कहो ना प्यार है: मधील क्यू चलती है बहार: मध्ये त्यांनी चार प्रकारचा ठेका वापरला आहे. एका ठेक्यातून दुसऱ्या ठेक्यात झेप घेतानाचे बदल जलद आहेत पण ते कानाला कुठेही खटकत नाहीत. त्यांच्या कोई मिल गया, क्रिश चित्रपटातील संगीताने तरुणाईची मने जिंकली. काळानुरूप परंतु अभिरुची पूर्ण, सातत्याने ताजे टवटवीत संगीत राजेश रोशन यांनी दिले. स्वतःच्या वेगळ्या संगीत शैलीने त्यांनी आपली ओळख निर्माण केली.

    १९७० च्या दशकाच्या सुरुवातीपासून ते १९८० दशकाच्या उत्तरार्धापर्यंतचा काळ त्याच्या नवीन अवताराशी सुरुवातीच्या हिंदी चित्रपटांना जोडणारा दुवा होता. भारतीय समाजावर एम टीव्ही इंटरनेट आणि पाश्चात्य (मुख्यत: अमेरिकन) प्रभावाचा परिणाम चित्रपटावर झाला. त्यामुळे चित्रपटातील गाण्यांमध्ये सर्वात लक्षणीय बदल झाला. हा बदल निश्चितच एका रात्रीत झालेला नाही.

      १९७० दशकाच्या उत्तरार्धात आणि १९८० च्या दशकाच्या सुरुवातीच्या डिस्को क्रेझचा बॉलिवूड संगीतावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला. बप्पी लहरी सारख्या संगीतकारांनी चित्रपट गाण्यात डिस्को बिट्स आणि लय समाविष्ट केल्या ज्यामुळे संगीत अधिक उत्साही बनले. लक्ष्मीकांत प्यारेलालने ओम शांती ओम’ आणि आरडींनी प्यार  करनेवाले प्यार करते है शान से’ गाण्यात सिंथेसाईझरचा वापर केला. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला बॉलीवूड निर्मात्यांनी डिस्को आणि सायकेडेलियामधील (या संगीतात इलेक्ट्रिक गिटार, सितार, तबला आणि विविध ध्वनी प्रभाव यांचा वापर केला जातो) मध्य मार्ग शोधला. या काळात बॉलिवूड संगीताची बदलत्या ट्रेंडशी जुळवून घेण्याची क्षमता दिसून येते.

       चित्रपटाच्या गाण्यांमध्ये संगीताच्या शैली अनेक वेळा बदलल्या. रचनांमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आली आणि अनेक प्रतिभावान संगीतकार उदयाला आले. सुरुवातीच्या काळात चित्रपटात ठुमरी, गझल, दादरा लोकांच्या आवडीचे होते. त्या काळातील बहुतेक गायक हे शास्त्रीय संगीतात विशारद असेच होते. त्याचबरोबर भजन, भक्ती गीते चित्रपटात लोकप्रिय ठरली होती.  १९८० नंतरच्या काळात मात्र हिंदी चित्रपट संगीत मोठ्या बदलातून जात होते. चित्रपटातील गाणी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर येऊ लागली होती. एक काळ असा होता जेव्हा चित्रपट संगीत कथात्मक साधनांसह कथा पुढे घेऊन जाण्यास मदत करणारे होते.

       १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला नदीम श्रवण यांच्या आशिकी’ चित्रपटाच्या यशामुळे फिल्मी गझल शैलीला पुनरुज्जीवन मिळाले आणि बॉलीवूड संगीतावर त्याचा मोठा परिणाम झाला. गझल प्रकाराचे रोमांटिक संगीत आले ज्यामध्ये दिल, साजन, दिवाना, फुल और कांटे सारख्या साऊंड ट्रॅक्टरचा समावेश होता. नदीम श्रवण या जोडीने गाण्यात वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटचे फार सुंदर समायोजन केले. सडक, दिल है की मानता नही, बेखुदी, संग्राम, अंदाज, फुटपाथ, बरसात, अशा चित्रपटांतून त्यांनी संगीत दिले. त्यांच्या संगीतात एक मधुरता होती. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा त्यावर प्रभाव होता. बासरी, सितार आणि शहनाई सारख्या शास्त्रीय वाद्यांचा आधुनिक पद्धतीने प्रयोग करून त्यांनी संगीतात नावीन्य आणले.

       १९९० च्या दशकातील गाणी संगीतकारांच्या उत्साही आणि उच्च दर्जाच्या रचनांचे वैशिष्ट्य होते. सिंथेसाईझर, ड्रम आणि इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर केल्याने संगीताला आधुनिक स्पर्श मिळाला. संगीत नृत्यानुकूल बनले. या काळातील अनेक बॉलीवूड चित्रपट नृत्याभोवती केंद्रित होते आणि त्यात विस्तृत नृऊ दृश्ये होती. या नृत्य केंद्रित चित्रपटांना यशस्वी करण्यात संगीताने महत्त्वाची भूमिका निभावली. आधुनिक गाणी ही आयटम सॉंग्स आहेत. ती चित्रपटाचा अविभाज्य भाग म्हणून समोर येत नाहीत. पार्श्वभूमीवर घडणाऱ्या नाट्यकृतींचा तो एक भागही नाही, ज्याच्या त्याच्याभोवती उलगडणाऱ्या कथेशी फारसा संबंध नसतो. आधुनिक बॉलीवूड गाणी त्वरित लोकप्रिय होण्यासाठी पुनरावृत्ती होणाऱ्या ट्रॅक आणि वाक्यांशावर अवलंबून असतात. कोकाकोला तू’, ‘काला चश्मा’ ,’नाच मेरी रानी’ सारखे ट्रॅक फार थोड्या काळासाठी गाजतात, आकर्षक वाटतात पण बहुतेक वेळा या गाण्यात भावनिक खोलीचा अभाव जाणवतो. गीताचा प्रवास आत्म्यापासून स्क्रोल कडे वळला आहे, ज्याकडे निश्चित लक्ष वेधले जाते पण ते हृदयापर्यंत पोहोचत नाही. गेल्या दोन दशकात प्रदर्शित झालेली गाणी ही काही काळ लोकप्रिय झाली परंतु संगीत प्रेमींच्या हृदयात आणि मनात मानाचे स्थान मिळवण्यात यशस्वी झाली नाहीत. चार-पाच दशकापूर्वीचे संगीत आता रॉक संगीत, रॅप, हिप हॉप, जाझ अशा संगीतात बदलले आहे. मनोरंजनासाठी ही गाणी ऐकायला थोडा वेळ बरे वाटते पण संगीत हे माणसाचे मन आणि मेंदू शांत आणि निरोगी ठेवतो. हे काम आधुनिक संगीत करू शकत नाही तो आनंद जुन्या संगीतातच मिळतो.

      हिंदी चित्रपट गाण्याच्या दर्जात घसरण होण्याचे एक आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे सध्याच्या चित्रपट निर्माते आणि गीतकारांचे संदर्भ बिंदू बदलले आहेत. त्यांचे स्त्रोत आणि प्रेरणा ही या मातीत रुजलेली नसून सात समुद्रा पार पाश्चात्य देशांच्या पॉप संगीत आणि पॉप संस्कृतीत आहे.

   चित्रपटात कव्वाली हा प्रकार सुरुवातीपासून अतिशय लोकप्रिय होता. ‘परदा है परदा’,: झूम बराबर झूम शराबी’, :राज की बात कह दूं तो’, ‘हम किसीसे कम नही’,’ ये इश्क इश्क है’ अशा असंख्य कव्वाली खूप गाजल्या. आधुनिक संगीतात फिल्म कव्वालीच्या उपप्रकारात आधुनिक आणि पाश्चात्य वाद्यांसह सामान्यतः टेक्नो बीटसह कव्वालीचा एक प्रकार अस्तित्वात आला ज्याला टेक्नो कव्वाली म्हणतात.- कजरारे कजरारे तेरे काले काले नैना’  शंकर- अहसान- लॉय यांनी रचलेले हे गाणे क्लब कव्वाली म्हणून ओळखले गेले. ए आर रहमान आणि नुसरत फतेह अली खान यांनी पारंपारिक कव्वालीच्या शैलीत फिल्मी कव्वाली तयार केल्या ‘तेरे बिना नही जीना’, ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’, ‘भर दो झोली मेरी’.

हळूहळू सिनेमाच्या दृकश्राव्य स्वरूपात नवीन तंत्रज्ञानामुळे सुधारणा होत गेली आणि सिनेमातील पटकथा, कॅमेरा वगैरेकडे अधिक लक्ष वळले. या सगळ्याचा परिणाम सिने संगीतावर होऊन संगीताच्या गुणवत्तेत सामान्य घट झाली तरी लोकप्रियतेत मात्र अजिबात घट झाली नाही. 1990 दशकाच्या सुरुवातीला ए आर रहमानने १९९२ मध्ये ‘रोजा’ चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्याच्या पहिल्या चित्रपटाला उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. लहान वयातच रहमानचे यशाची चव चाखली. ए आर रहमान यांचे ताल चित्रपटातील एक अतिशय सुंदर गाणे :यारा यारा यारा हो करिये ना करिये कोई वादा किसी से’ या गाण्यात डग्गा वाजवताना दाखविला आहे पण प्रत्यक्षात मात्र तो साऊंड इफेक्ट मिळवण्यासाठी चामड्याचा मोठा ढोल वाजवण्यात आला होता आणि तो अशाप्रकारे वाजला की डग्ग्याच्या आवाजाशी मेष खाईल. पद्मश्री, दोन ग्रॅमी, ऑस्कर पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कार विजेते ए आर रहमान यांनी बॉम्बे, रंगीला, ताल, लगान, जोधा अकबर, अशा चित्रपटांमध्ये विविधता दाखवली. त्यांच्या विविध रचना साऊंड ट्रॅक ठरल्या.त्यांच्या राग आधारित सुरांचे संश्लेषित ताल ताजेतवाने स्वर सौंदर्य आणि अपरंपारिक मांडणीचे कुशल मिश्रण यांनी रसिकांचे मन जिंकून घेतले. स्लॅमडॉग मिलेनियर ने त्यांना दोन ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब मिळवून दिला. शास्त्रीय संगीत, सुफी संगीत कर्नाटक संगीत आणि कव्वालीवर त्यांचे पूर्ण प्रभुत्व त्यांच्या संगीतातून दिसून येते. या काळातील सर्वात यशस्वी संगीतकार म्हणून त्यांची ख्याती आहे.

    त्यानंतर शंकर यांचे त्रिकूट आले. मिशन कश्मीर, दिल चाहता है, माय नेम इज खान, कभी अलविदा ना कहना, तारे जमीन पर या चित्रपटांमधून त्यांनी अत्यंत मधुर संगीत देऊन रसिकांची मने जिंकली. याच काळात विशाल भारद्वाजने संगीत क्षेत्रात प्रवेश केला. गुलजार निर्मित ‘माचिस’ मधून प्रवेश करून राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’, कमल हसनच्या चाची ४२०, गॉड फादर चित्रपटांना संगीत देऊन आपली मौलिकता त्यांनी सिद्ध केली. त्यांनी पारंपारिक आणि आधुनिक संगीत शैलीचा अनोखा वापर केला. त्यांच्या संगीतात लोकसंगीत,गझल, वेस्टर्न संगीताचा प्रभाव जाणवतो. काही वर्षानंतर त्यांनी आपल्या मित्राबरोबर काम करणे सुरू केले आणि विशाल- शेखरची जोडी त्यांच्या संगीतामुळे चर्चेत आली. बॉलीवूड संगीतात जलद गतीने होणाऱ्या ओघात आनंद मिलिंद आणि नदीम श्रवणची जोडी टिकू शकली नाही. विशाल शेखर यांनी जुन्या हिंदी चित्रपट संगीतातील सर्वोत्तम संगीत आणि समकालीन ध्वनी एकत्र करून दोन युगांना जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सूर आणि गीतांवर मजबूत आणि प्रायोगिक ऊर्जाने भरलेले झंकार बीट्स: चित्रपटात विशाल शेखरची संवेदनशीलता दिसून येते. दस,,’,’ ओम शांती ओम’ सारखे उत्कृष्ट साऊंड ट्रॅक तयार करून ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले.

      डोर’, चक दे इंडिया’,’ फॅशन, ‘रबने बना दी जोडी’, हिट चित्रपटातुन संगीत देऊन सलीम सुलेमान या जोडीने आपली योग्यता सिद्ध केली. आज गाण्यांना नवी दिशा मिळाली आहे. ‘तेरे मस्त मस्त दो नैन, (वाजीद अली साजिद अली,); शीला की जवानी (विशाल शेखर);’ काला चष्मा’ (शंकर-एहसान-लॉय); मुन्नी बदनाम हुई’( ललित पंडित)’ लुंगी डान्स ‘(यो यो हनी सिंग); ‘आपका क्या होगा’ (शंकर अहसान लॉय)’बँड बाजा बारात’ (सलीम सुलेमान );,पिंगा ग बाई पिंगा’( संजय लीला भन्साली) ‘तेरे नैना’( शंकर- अहसान लॉय) ‘ये जवानी है दिवानी’( प्रीतम चक्रवर्ती) यांनी भन्नाट गाणी बनवली. तरुणांना अशा गाण्यावर नाचायला डोलायला आवडते. बदलत्या काळाबरोबर संगीत बदलले आणि लोकांच्या आवडीनिवडी देखील बदलल्या असल्या तरीही आधुनिक बहुतांश गाणी चिरस्थायी आनंद देत नाही हे सगळ्यांनाच पटते. खरे संगीत तेच जे मनाला आनंद देते.

      २००० नंतरच्या चित्रपटातून नृत्याचे महत्व देखील कमी झाले. अनुराग कश्यप, मधुर भांडारकर, नीरज पांडे, दिवाकर बॅनर्जी, अनुराग बसू, राकेश ओमप्रकाश मेहरा, आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिराणी, यासारख्या चित्रपट निर्मात्यांनी कथेत नृत्याला बगल दिली. ओय लकी ओय, देवडी, गॅंग्स ऑफ वासेपुर, सेक्शन ३७५, सारख्या चित्रपटातून आलेल्या गाण्यांनी केवळ प्रमोशनची भूमिका वठवली.

        आज आधुनिक संगीतात कम्प्युटर आणि डिजिटल उपकरणांचा उपयोग करून नवनवीन सूर तयार केले जात आहेत. संगीताला गतिशील बनवण्याच्या प्रयत्न सुरू आहे पण असे करताना त्यातील आत्मा, संगीतातील मधुरता नष्ट होत चालली आहे. २००० नंतरच्या चित्रपटांमध्ये तंत्रज्ञान, कला आणि कथा यांच्यात खूप बदल झाला. कथा आणि शैलीमध्ये विविधता आली. चित्रपट कथेला कोणताही विषय अनभिज्ञ राहिला नाही. जीवनातील सर्व पैलू लक्षात घेऊन चित्रपट तयार करण्यात आले. तंत्रज्ञान आणि जागतिक प्रभावामुळे नवीन शैली वापरात आली. माहितीपट, कथा पट आणि अवांत गार्डे (प्रायोगिक किंवा नवीन प्रकारच्या कलाकृती जे पारंपरिक पद्धतीने विचार न करता नवीन दृष्टिकोन आणि कल्पना मांडतात. पारंपारिक रूढ विचारसरणीला आव्हान देऊन पारंपारिक मर्यादा ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करून नवीन गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात.) सारख्या विविध शैलीमध्ये चित्रपट बनवले गेले. चक दे इंडिया’,’ थ्री इडियट्स’, मुन्नाभाई एमबीबीएस’, १०२ नॉट आउट’, ‘हिचकी’, मंटो’,’आर्टिकल १५’, ‘पीके’, ‘भाग मिल्खा भाग’, अशी अनेक उदाहरणे देता येतील.

      कुमार सानू म्हणतात- युट्युब आणि spotify सारख्या प्लॅटफॉर्मच्या वर्चस्वामुळे दृश्य जलद पोहोचणारी /लोकप्रिय होणारी गाणी देण्याचा दबाव वाढला आहे. तुम्ही फक्त संगीत द्या. अन्यथा ते हिट होणार नाही. आज कोणीही मेलडी आणि भावपूर्ण संगीतावर काम करू इच्छित नाही कारण प्रत्येकाला केवळ लवकर लोकप्रियता हवी असते. पूर्वीचे संगीतकार अमाप  कष्ट करून चित्रपटाच्या आवश्यकतेनुसार संगीत देत होते. आजकाल अनेकदा गरज नसताना कुठेही गाणी जबरदस्तीने नृत्य किंवा पार्टीचे सीन दाखवून घातलेले दिसतात. ती गाणीही अर्थहीन असतात.’

.      गेल्या काही वर्षात संगीताचे सार बदलले आहे. काही संगीतकार चांगले काम करत आहेत. जुन्या गाण्यांना नवीन संगीत देण्यात येत आहे. जुनी गाणी जशी आहेत तशी रिमिक्स केली आहेत. आजच्या पिढीला जुनी गाणी पुन्हा नवीन आधुनिक संगीतासह ऐकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बदलत्या तंत्रज्ञानाशी आणि जागतिक प्रभावांशी जुळवून घेत बॉलीवूड संगीत विकसित होत आहे.

    गेल्या दोन दशकातील सलीम सुलेमानचे- छायी हे तनहाई, जी ले जरा जी ले जरा कहता है दिल जी ले जरा -भरत हंस, सौरभ मल्होत्रा,;तेरे लिये हम है जिये होठों को सिये,- मदनमोहन ( वीर झारा); तुम ही हो-  नदीम श्रवण; आसान नही है यहाँ आशिक हो जाना पलकों पे काटों को सजाना-नदीम श्रवण; घूमर घूमर घूमे -संजय लीला भन्साली; नैनो वाली ने छेडा मनका प्याला-नीति मोहन; एक दिल है एक जान है दोनो तुझपे कुरबान है- संजय लीला भन्साली; सून रहा है ना तू रो रहा हू मै-अंकित तिवारी; अगर तुम साथ हो पल भर ठहर जाओ ये दिल संभल जाये-ए आर रहमान; मोहे रंग दो लाल नंद के लाल-संजय लीला भन्साली; अलबेला सजन आयो री- इस्माईल दरबार; गजानना गजानना- संजय लीला भन्साली अशा अनेक उभरत्या संगीतकारांनी मधुर संगीत दिले आहे. पण तरीही ते कालातीत असेल असे नाही. संगीत हे मनोरंजनाचे एक साधन आहे, जीवनाचा तो एक अविभाज्य घटक आहे. बॉलिवूड संगीताची बहुमुखी प्रतिभा त्याच्या सर्जनशील विकासासाठी अमर्याद वाव देते. खरं तर भारतीय चित्रपट सृष्टीतील संगीतकारात पुरेशा प्रमाणात नवीन प्रतिभा आहेत पण अनेक जण अमेरिकेच्या पॉप संस्कृतीची एकरूप झाल्यामुळे भारतीय संस्कृतीचा संदर्भ बिंदू विसरली आहेत.

       बॉलीवूड संगीतातील आधुनिक युग हे बहुमुखी प्रतिभा, प्रयोगशीलता आणि समकालीन ट्रेंडशी जुळवून घेण्याची क्षमता या वैशिष्ट्यांनी भरलेले आहे. विविध संगीत शैली, नाविन्यपूर्ण रचना आणि तांत्रिक प्रगती यांचे मिश्रण यामुळे बॉलीवूड संगीत जागतिक बनले आहे. जागतिक स्तरावर भारतीय संस्कृती आणि सर्जनशीलतेची एक शक्तिशाली अभिव्यक्ती झाले आहे. सर्जनशीलतेच्या या नैसर्गिक प्रगतीवर विश्वास ठेवायलाच हवा. आजच्या संगीतात ध्वनी तयार करण्याच्या उत्कृष्ट कलात्मकतेचे कौतुक करायलाच हवे. वर्तमानातील सर्जनशील ऊर्जेचा स्वीकार करायलाच हवा कारण चांगले संगीत हे कोणत्याही एका दशकाचे नसून ते कालांतराने प्रतिध्वनीत होत असते.

    भारतीय चित्रपट सृष्टीत नवीन प्रतिभा आहे. त्यातील काही जण तरी हिंदी चित्रपट सृष्टीत एक दिवस पुन्हा नवीन दिवस आणतील आणि संगीताला पुन्हा त्याचा आत्मा प्राप्त होईल असा विश्वास बाळगायला हवा आणि वो सुबह कभी तो आयेगी म्हणत त्या सुंदर सकाळची वाट पाहायला हवी.

– ©️डॉ नीता पांढरीपांडे

709, SMR vinay technopolis
Adjacent to google Kondapur
Hyderabad 5000084

E mail  neetavijay28@gmail.com
Mobile no.7659064555

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

स्वागत फुलांनी

– गुलाबाच्या जातीचे एक फुल – पियुष करकरे, अमेरिका ( फोटो इटलीतील ) 

प्रेषक डॉ. प्रियंवदा कोल्हटकर  

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विचारशलाका 

(52) 

My fake plants died because I did not prertend to water them.

Mitch Hedberg 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आणखी एक (अज्ञात ) केशवसुत

 – पृष्ठ ६० –


– प्रेषक माधव मनोहर जोशी 

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

संस्कृत सुभाषितांचा मराठी भावानुवाद 

[ ६७ ] 

 

– ©️ माधव मनोहर जोशी.

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता

Sometimes….!!

Sometimes,
I touch the sky, though I know,
I am unable to fly !

Sometimes,
I smell the earth, though I know,
it is not that worth !

Sometimes,
on a lonely beach, I profusely cry,
though I know, this sea will always remain dry !

Sometimes,
I ask myself, “You are alive, why”?
Though I know, I am not ready to die !

Sometimes,
In the dark, like a child I fear,    
“HE” then suddenly says from somewhere,
“Come, come dear, I am here, I am here..!”

– ©️   Pradeep Adhikari
adhikaripradeep14@gmail.com

***************************

सत्य हा नाकारतो..

तो असा का वागतो
मी तुम्हाला सांगतो
धावता येते तरीही
मूर्ख तो का रांगतो

सर्व काही लाभुनी
का निराशा खंत ही
हातचे सोडून हा
भोवताली पाहतो

योग्यता नव्हती तरी
ओंजळी भरल्या किती
सांडते हातातूनी
सौख्य हा नाकारतो

मैत्र नाती पांगली
खंत ना याची तरी
स्वार्थ याचा केव्हढा
मी,मला गोंजारतो

एकट्याने काहीही
होत नाही या जगी
शून्य स्थानी कोणत्या
सत्य हा नाकारतो!

–  ©️ प्रा. विजय पांढरीपांडे
vijaympande@yahoo.com

७६५९०८४५५५. 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

माणसं जोडणारी सेवाव्रती

व्यक्ती विशेष

श्रीमती शैलाताई लिमये हे एक अजब रसायन आहे. कोणत्याही कार्यक्रमात त्यांची लगबग पाहून त्यांनी सत्तरी पार केली आहे असे अजिबातच वाटणार नाही .कोणत्याही कामात असलेला   त्यांचा  सळसळता उत्साह वाखाणण्यासारखा असतो .विजय शिक्षण संस्थेत गेली तीसहून अधिक वर्ष शैलाताई कर्णबधिर मुलांची आणि संस्थेची सेवा करत आहेत .कृतज्ञ असणे हे कोणी त्यांच्याकडून शिकावे .प्रगती विद्यालयाचा विषय निघाला कि  त्या न चुकता कैलासवासी मैनाताई गोखले यांचा उल्लेख आवर्जून करतात .जीवनातील कठीण प्रसंगात मैनाताईंनी त्यांना कशी अनमोल मदत केली हे त्या आवर्जून सांगतात. अंदाजे बारा तेरा वर्ष त्या प्रगती विद्यालयात शिक्षक सहाय्यक म्हणून येत होत्या .पुढे संस्थेची ऋणानुबंध जुळले  ते कायमचेच ! काही  वैयक्तिक कारणांनी यात खंड पडला पण पुन्हा त्या शाळेत येऊ लागल्या .मैनाताई नेहमी म्हणायच्या की  ‘शैला, आता तुला शाळा सोडणार नाही “हे त्या नेहमी सांगतात.

शैलाताईच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू मला अनुभवायला मिळाले. फक्त प्रगती विद्यालयच नव्हे तर अनेक सामाजिक संस्थांशी त्या जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या प्रेमळ बोलण्याने अनेक माणसे जोडली आहेत. मग ते महिला मंडळ असो, अभिवाचनाचा ग्रुप असो ,भजनी मंडळ असो, अनाथाश्रम असो, कविता वाचन असो ,लेखन असो ! अशी बहुआयामी व्यक्तिमत्व असलेली ही व्यक्ती! त्यांना कौतुक करायला फार आवडतं. स्वतःच्या हाताने बनवलेल्या उदबत्त्या ,साबण अत्तर ,फोटो फ्रेम कोलाज अशा भेटवस्तू त्या त्यांच्या  प्रियजनांना आठवणीने देतात.त्यांनी कलेची आवड जोपासली आहे. ज्ञानदानाचे ही कार्य अखंडितपणे सुरू आहे.व्यवसायपूर्व शिक्षणासाठी अनेक शाळेत त्यांनी साबण, उदबत्त्या आणि अत्तर करायला शिकवले आहे.

नातेवाईकांमध्येही त्या प्रिय आहेत. घरगुती सणासमारंभाला आवर्जून उपस्थित राहून स्वतः हाताने बनवलेले काही पदार्थ घेऊन जातात. त्यांच्या अंगी ठायी ठायी दातृत्व भरलेले आहे असे नेहमी जाणवते. मग ते वस्तूचे असू देत किंवा ज्ञानाचे असू देत. त्यांच्या या लाघवी स्वभावामुळे अनेक माणसं ,अनेक संस्था त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत. समाजातील एक जबाबदार समाजभान जपणारी व्यक्ती ,ईशा शोणची आजी, उमेशची आई , मानसीच्या सासुबाई या  भूमिका त्यांनी उत्तम बजावलेल्या आहेत .

दिव्यांगधारा प्रतिष्ठान तर्फे १ फेब्रुवारीला शैलाताई लिमये यांचा सेवाव्रती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यांच्या या सेवेची योग्य दखल घेण्यात आली असे नक्कीच वाटते. यापुढेही त्या आपले सेवा कार्य अखंडितपणे सुरू ठेवतील यात काही शंकाच नाही. ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य देवो हीच प्रार्थना! मला तुमचा खूप अभिमान वाटतो.

शैलाताई तुमचे मनापासून अभिनंदन !!



–  सौ.शुभदा प्रविण अघोर
विशेष शिक्षक व समुपदेशक
प्रगति विद्यालय कर्णबधिरांसाठी, दादर
shubhadaaghor@gmail.com

 श्रीमती शैलजा लिमये 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

राशीस्वभावानुसार उखाणे

*भाग ५/६*

*पुन्हा एकदा आठवण करून देते, ही लेखमाला ज्योतिषाच्या अभ्यासक्रमाचा भाग नाहीये, तर केवळ मनोरंजनात्मक आहे*.

आतापर्यंतच्या सहा राशींचे गुणविशेष पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते की रास एकच असली तरी नक्षत्रानुसार स्वभावात फरक असतो. तसेच आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे एका राशीत ३ नक्षत्र. तीन नक्षत्रांचे प्रत्येकी चार असे  एकूण १२ चरण असतात. पण प्रत्येक राशीत तर नऊच चरण असतात. याचाच अर्थ काही वेळा एका नक्षत्राचे काही चरण एका राशीत तर काही चरण दुस-या राशीत अशी विभागणी होते. त्यामुळे देखील स्वभावात थोडा फरक पडतो.

उदा.
पहिली रास मेष — राशीचा स्वामी मंगळ आहे…. या राशीत तीन नक्षत्रे येतात. पैकी तिसरे नक्षत्र हे कृत्तिका आहे. कृत्तिकेचा पहिला चरण या राशीत येतो. आता या मेष राशीचा  स्वामी मंगळ आणि कृत्तिका नक्षत्राचा स्वामी रवी हा एकत्र येत असल्यामुळे या राशीत कर्तृत्वाचा अहंकार दिसून येतो.

तर पुढील रास वृषभ — तिचा स्वामी शुक्र आहे. कृत्तिका नक्षत्राचे पुढील  तीन चरण या राशीत येतात. आता या वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि नक्षत्राचा स्वामी रवी हा एकत्र येत असल्यामुळे या राशीत सौंदर्याचा अहंकार दिसून येतो.

*सातवी रास तूळ*:

“राशीचक्रातील सातवी रास हि तूळ. ही समतोल विचारसरणीची फार,
स्वामी शुक्र, वायू तत्त्व, सावळा परंतु मोहक वर्ण, उंच उभट चेहरा,
स्वर असे लहान, अशी विचारात घ्यावी हि रास.
सत्धर्मी, सत्वर्तनी, भावनाप्रधान परंतु न्यायप्रिय आणि न्याय निष्ठुर.
अशी  ही प्रेमळ, सुंदर, पण गंभीर वृत्तीची कलासक्त रास तूळ.”

शनीचे विश्रांती स्थान. शुक्राच्या या मोहक राशीत शनी उच्चीचा होतो. त्यामुळे शनीच्या साडेसातीत या व्यक्तींना फारसा त्रास होत नाही. राशी चक्राचा मध्य असलेली हि रास. तूळ राशीचा जावई घरात आला की मुलगा बनून जातो व सून घरात आली कि जणू मुलगीच बनते. लहान थोर सगळ्यांच्यात प्रिय व्यक्ती. उत्तम अधिकारी, उत्तम न्यायाधीश होतात.

तूळ राशींच्या व्यक्तींचा भांडणे टाळण्याकडे कल असतो. त्या नेहेमी सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करतात.

 *या राशीत तीन नक्षत्र येतात*. — चित्रा, स्वाती, आणि विशाखा.

 चित्रा – याची आकृती मोत्यासारखी ठळक दिसते. या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती कार्यकुशल दानी, भाग्यवान शांत, सुस्वभावी, विचारी. काळजीपूर्वक आणि बुद्धीचातुर्याचा वापर करून बोलणारी. नक्षत्र स्वामी : मंगळ.

स्वाती  – याची आकृती प्रवाळासारखी (पोवळे) दिसते. या  नक्षत्रावर जन्मलेले कर्तव्य पाळणारे. शांत संयमी आणि विचारी. नक्षत्र स्वामी : राहू.

विशाखा – याची आकृती तोरणासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना उच्च दर्जाचे आयुष्य जगायला आवडते. रसिक, कलाप्रिय, हरहुन्नरी व आनंदी व्यक्ती. नक्षत्र स्वामी : गुरु.

*तूळ राशीची स्त्री उखाणा कसा घेईल* —

1)कितीही चुका झाल्या तरी सासूबाई म्हणतात माझंच खरं ( सासू सिंह राशीची असणार),
मी संदीपरावांना म्हणते, रोज भांडण्यापेक्षा आपण वेगळ राहिलेलं बरं.

2)आपल्या मोठेपणासाठी दुसऱ्याला देणार नाही दुषण,
  पंकजचे नाव घेऊन सांगते, सासर – माहेर दोन्हीचे मी होईन भूषण.

या राशीचा पुरुष उखाणा कसा घेईल –

१)सहकार्याचे हे दिवस, श्रमाची करीन वाटणी,
सविता करेल इडली, तेव्हा मी करीन चटणी.

2) बंगलोर, म्हैसूर,उटी ,म्हणशील तिथे जाऊ ,
   मी घास भरवतो ,पण मीना तू कोणाचं डोकं नको खाऊ.

 *तूळ  राशीचा एक किस्सा*…

१ ) एक संभ्रमित माणूस तूळ राशीच्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जातो व त्यांना विचारतो. डॉक्टर, माझा फार गोंधळ उडतो. बसमधून उतरल्यावर मी जेव्हां रस्त्यावर उभा राहतो तेव्हा माझ्या लक्षातच येत नाही कि मी घरून ऑफिसला चाललोय कि ऑफिस मधून घरी निघालोय. काही तरी उपाय सांगा.

तूळ राशीचा डॉक्टर म्हणतो बाकी उपचार नंतर सुरु करू. सर्वप्रथम एक काम करा. जेव्हां तुमचा असा गोंधळ उडेल तेव्हा तुमच्या बॅगेतला टिफिन बॉक्स उघडून बघा. जर तो भरलेला असेत तर तुम्ही घरून ऑफिसला जाताय. जर तो रिकामा असेल तर तुम्ही ऑफिसमधून घरी जाताय असे समजा.

२ ) शिक्षक विचारतात , “हिंदी महासागराच्या पलीकडल्या बाजूला कोणते देश आहेत?”

तूळ राशीचा विद्यार्थी म्हणतो, “ते आपण हिंदी महासागराच्या कोणत्या बाजूला उभे आहोत, त्याच्यावर अवलंबून आहे”.

माफी मागण्याची पद्धत:

या राशीच्या व्यक्तींना स्वतःची चूक उमगली कि त्या माफी मागण्यासाठी जराही उशीर लावणार नाहीत. स्वतःहून पुढाकार घेऊन माफी मागतील.

एकंदरीत तूळ राशीच्या व्यक्ती सर्वांना हव्या हव्याशा वाटतात. त्यांच्याबद्दल इतर लोकं काय म्हणतात ते पाहू*  

“महेफील मे आके,रंग जमाकर गये.
तमन्ना प्यासी रही, आप तुफान उठाके गये.”

*आठवी रास वृश्चिक*

“राशीतील आठवी रास ही वृश्चिक. हि दीर्घ द्वेषी असे फार,
 स्वामी मंगळ जलतत्त्व, सुडौल बांधा, आखूड कुरळे केसं,
 आकर्षक व्यक्तिमत्त्व, अशी ही विचारात घ्यावी रास.
धाडसी, चपळ, निश्चयी व हट्टी नवनिर्माण करण्याचे सामर्थ्य.

अशी ही तिखट जिभेची वृश्चिक रास”.

ह्या राशीत ३ नक्षत्रे येतात — विशाखा, अनुराधा आणि जेष्ठा.

विशाखा – याची आकृती तोरणासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीला उच्च दर्जाचे आयुष्य जगायला आवडते. रसिक, कलाप्रिय, हरहुन्नरी व आनंदी व्यक्ती. नक्षत्र स्वामी : गुरु.

अनुराधा – याची आकृती भाताच्या राशीसारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती क्रियाशील, गमत्या स्वभाव,  मौजमजा, चेष्टा, मस्करीची आवड असणाऱ्या असतात. व्यक्तीमत्व आकर्षक व छाप पाडणारे, मित्र – मैत्रिणी भरपूर, नातेसंबंध जपणारे, पण बऱ्याचदा आईशी पटत नाही. नक्षत्र स्वामी : शनी.

ज्येष्ठा – याची आकृती कानातील कुंडलांप्रमाणे दिसते. या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती पराक्रमी आणि सहसा कुणाला वश न होणारी. तर्कशुद्ध विचार सरणी, कठोर वस्तुनिष्ठ, अहंपणा आणि स्वमग्न. नक्षत्र स्वामी : बुध.

फटकळपणा किंवा स्पष्टवक्तेपणा याला वेगवेगळे आयाम आहेत. मेष राशीच्या व्यक्तीही फटकळ असतात पण त्यामागे विचार असतो. सिंह राशीच्या व्यक्ती देखील कुणाचा मुलाहिजा ठेवत नाहीत. पण त्यामागे अहंकार असतो.

आणि  वृश्चिक राशीच्या व्यक्ती तिखट जिभेच्या, आणि विचार न करता फटकन बोलणाऱ्या असतात. स्थळ, काळाचा विचार न करता जे सुचेल ते बोलून टाकतात.  ह्या राशीच्या व्यक्ती दीर्घद्वेषी असतात. एखादी गोष्ट कायमची लक्षात ठेवून संधी मिळेल तेव्हा बोलून घेतात.

*वृश्चिक राशीची स्त्री कशी उखाणा घेईल*:

लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशी एक वृश्चिक राशीची बाई उखाणा घेते…

१)आपलं ठेवावे झाकून दुसऱ्याचे पाहावे वाकून,
विजयचे नाव घेते पहिले भांडण राखून.

३) घरातून बाहेर पडले नजर गेली आकाशात

सोसायटीत कुणी ओळखत नाही, पण सुमेधला वाटतं

त्याचे नाव आहे जगाच्या नकाशात.

*या राशीचा  पुरुष कसा  उखाणा घेईल *:-

१ )  फेसबुकवर झाली ओळख, WhatsApp वर प्रेम बहरले,
     नीता आहे आळशी हे लग्न झाल्यावर कळले.

२ ) नाव आहे उर्मिला, ती स्वतःला समजते हेलन,
    पण प्रत्यक्षात ती आहे रॉकेलचे गॅलन. (स्वरचित)

*वृश्चिक राशीचा एक किस्सा*

१) एका मानसोपचार तज्ज्ञाकडे अशोक आपल्या वृश्चिक राशीच्या बायकोची समस्या घेऊन जातो. तो सांगतो, “ डॉक्टर, माझ्या लग्नाला चाळीस वर्षे झाली आहेत. पण एवढ्या वर्षा नंतर आपसातल्या भांडणाची सवय व्हायला हवी. पण असं होतं की आजही जरा भांडण झालं की माझी बायको एकदम *हिस्टोरिकल* होते.

डॉक्टर म्हणतात, तुम्ही चुकून *हिस्टोरिकल* म्हणालात. तुम्हाला *हिस्टेरिकल* म्हणायचंय का? हिस्टेरिकल म्हणजे अनियंत्रितपणे प्रक्षुब्ध आणि हिस्टोरिकल म्हणजे ऐतिहासिक.

यावर अशोक म्हणतो.. हिस्टेरिकल नाही हिस्टोरिकलच म्हणायचं आहे. कारण भांडण झालं रे झालं की माझी बायको आमच्या लग्नाच्या पहिल्या वर्षापासूनच्या आजपर्यन्तच्या चुकांचे दाखले देत बसते.

२) कॉलेज मधल्या एका प्राचार्यांची बदली झाली. निरोप समारंभ झाल्यावर वृश्चिक राशीची एक महिला प्राध्यापक औपचारिकपणे त्यांना म्हणाली. “तुम्ही आता इथून जाणार याचं वाईट वाटतय”.

  त्यावर ते प्राध्यापक समजुतीच्या स्वरात म्हणाले, “तुम्ही काळजी करू नका, माझ्या नंतर येणारे प्राध्यापक   माझ्यापेक्षा चांगले असतील”.

ती प्राध्यापिका सहज म्हणते, “तुमच्या पूर्वीच्या प्राध्यापकांची बदली झाली तेव्हा ते असेच म्हणाले होते  पण तसं घडलं नाही”.

*माफी मागण्याची पद्धत* :

ह्या राशीच्या व्यक्तींना माफी मागणं हा केवळ औपचारिकपणा आहे असा समज असतो. शक्यतो माफी मागतच नाहीत पण तरीही माफी मागितलीच तर, प्रत्यक्ष माफी मागण्यापेक्षा मेसेज पाठवून/पत्र पाठवून माफी मागण्यांकडे त्यांचा कल असतो.

*या  राशीचा एक शेर पाहू*.

“आना हो, तो ठिकाने बहोत है,
 न आना हो, तो बहाने बहोत है”

नववी रास धनु.
राशीचक्रातील नववी रास ही धनु, स्वामी गुरु, अग्नी तत्त्व,
सशक्त गौर वर्ण, तेजस्वी अन सात्विक, अशी विचारात घ्यावी ही रास,
सत्शील, सज्जन, परोपकारी, समाजप्रिय उदार,
परंतु थोडी हट्टी, व स्वतःचं म्हणणं खरं करणारी,
अशी ही अंतर्यामी सुशील व सज्जन धनु रास.

 *या राशीत ३ नक्षत्र येतात*…. मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा.

मूळ – याची आकृती सिंहाच्या शेपटीसारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती  कलासक्त असतात पण  धाडस कमी असतं. नक्षत्र स्वामी : केतू.

पूर्वाषाढा – याची आकृती हस्तिदंताप्रमाणे दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती  विनयशील पण एकंदरीत भित्रे, गुणांचे कौतुक करणार, शिक्षणात गोडी कमी, लोकांच्या नजरेत भरेल अशा कपड्यांची आवड असणारी. नक्षत्र स्वामी : शुक्र.

उत्तराषाढा – याची आकृती मंचका / पलंगासारखी दिसते. या  नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती  ढोबळ मानाने विचार करणारे, मोठी कामे चटकन करणारे पण किचकट कामे टाळणारे. उदार वृत्ती पण स्वतःला तोशीश लागू न देता एखाद्याला मदत करतील म्हणजे एखाद्याला पैशाची गरज असेल, तर स्वतः पैसे न देता एखाद्या ट्रस्ट मार्फत मदत मिळवून देतील. नक्षत्र स्वामी : रवी.

या राशीचा मुळ स्वभाव छोट्याशा गोष्टीचेही कौतुक करणे, उदार मनोवृत्ती, समाजप्रिय, परोपकारी असा असतो.

धनु  राशीची स्त्री कशी उखाणा घेईल:

१ )मला लाभू दे सीतेचे चारित्र्य आणि सावित्रीचे धैर्य,
रवींद्रच्या सहाय्याने करीन समाजकार्य.

२ ) सत्य, ज्ञान आणि नीती हीच राष्ट्राची शक्ती,
 सुमितची त्यावरच सारी भक्ती.

या राशीचा पुरुष  कसा उखाणा घेईल:-

1)जीवनाचे उकलले कोडे, आयुष्याचा कळला अर्थ,
प्रीतीच्या सान्निध्यात जीवन व्हावे सार्थ.

2)मानवता हाच खरा धर्म, जशास तसे कर्म,
  रागिणी बरोबरच्या संसारात जाणून घेतले सुखी जीवनाचे मर्म.

*धनु राशीचा एक किस्सा*……

१)छोट्या धनु राशीच्या बंडूला त्याची आत्या विचारते, अरे बंडू , समजा मी तुला दोन लाडू दिले. त्यात एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. तर तू यापैकी कुठचा लाडू आपल्या भावाला देशील?

बंडू विचारतो: कुठच्या भावाला, मोठ्या का छोट्या?

२ )  एक बाई नवऱ्याला विचारते,
     “कालच्या पार्टीत तुम्ही हिरवा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घालून, का आला होतात…?”
    धनु राशीचा नवरा : का..? कोण काही बोलले का…?
     बायको : हो, माझ्या मैत्रिणी विचारत होत्या, हे पालक पनीर  कोणाचं फिरतंय…!

*माफी मागण्याची पद्धत*:

माफी वगैरे मागायची असते, अशा किरकोळ गोष्टींवर या राशीच्या व्यक्तींचा विश्वास नसतो. मनुष्य आहे चुका होणारच; त्यामुळे माफी मागणे निरर्थक आहे असे यांचे मत असते. पण त्याचप्रमाणे इतरांनी सुद्धा त्यांच्या चुकांबद्दल माफी मागावी, अशीही यांची अपेक्षा नसते.

उदार पण स्वत:ला तोशीस लागू न देणाऱ्या धनू राशीचा शेर  पाहू.

“खुद की खातीर ना जमानेके लिये जिंदा हुं,
कर्ज मिट्टीका चुकाने के लिये जिंदा हुं.”

(*क्रमश:*)

–  © अ‍ॅड. क्रांती आठवले पाटणकर
*डोंबिवली.*
*9969087559*
*०७.१०.२०२५*.
*(सदर लेख माझ्या नावासह अग्रेषित करायला हरकत नाही.)*

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

उत्तरे द्या आणि ज्ञानात भर घाला

प्रश्नसमूह  ४

उत्तरे :-

१६) – चीनमध्ये गूगलऐवजी ‘बैडु”. यू ट्यूब ऐवजी “ बिल्बिल” वा “ युकू” आणि व्हॉट्सॅप ऐवजी “ वुइचॅट” वापरतात. ही  सर्व त्यांनी स्वतः शोधलेली आहेत.

१७) – सर्वात जास्ती काळ थिएटरमध्ये प्रदर्शित राहिलेले हिंदी चित्रपट १) दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे १९९५ मधील – ३० वर्षे. अजून चालू आहे. 

२)  शोले १९७५ मधील  – ५ वर्षे 

३) किस्मत १९४३ मधील  – ३.५ वर्षे  

४) मुगल ए आज़म १९६० मधील – ३ वर्षे 

५)  बरसात १९४९ मधील – २ वर्षे

१८) – उत्तर प्रदेशातील ‘काला नमक’, मध्य प्रदेशातील ‘जवाफूल’, बंगालमधील ‘राधुनी पगोल’, थायलंडचा ‘जस्मिन’ आणि मावळातील ‘आंबेमोहोर’ हे काही सुवासिक तांदूळ आहेत. यात आंबेमोहोर, जोहा आणि जस्मिन हे सर्वात जास्ती वासाचे आहेत. तांदुळातील हा आवडता वास त्यातील २अ‍ॅसिटाइल १ पायरोलाइन या द्रव्यामुळे येतो. हे द्रव्य सूक्ष्म प्रमाणात असते.

१९)  १ लिटर आकारमांच्या पदार्थांची वजने सुमारे खालीलप्रमणे :-
     पाणी = १ किलो
     खाद्य तेल = ०.९२  किलो
     पेट्रोल = ०.७५ किलो
     वितळलेले द्रव लोखंड = ७.५ किलो
     हवा = 0.0013 किलो म्हणजे 1.3 ग्रॅम वा १३०० मिलिग्रॅम
     हायड्रोजन वायू = 0.000089 किलो म्हणजे ८९ मिलिग्रॅम

२०) – जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे हे मिष्कील विधान आहे.
मूळ इंग्रजीमधील उक्ती ही आहे “ Patriotism is your conviction that this country is superior to all others because you were born in it.”  मार्क ट्वेन, जॉर्ज बर्नार्ड शॉ, ऑस्कर वाइल्ड हे काही लेखक अशा उक्तींबद्दल प्रसिद्ध होते.  

[ वरील प्रश्नांची उत्तरे पाठवणा-यांची नावे  अभिप्रायाच्या चौकटीत दाखल केली आहेत याची कृपया नोंद घ्यावी. उत्तरे पाठवणा-या सर्व वाचक मित्रांचे अभिनंदन आणि आभार ] 

 – ©️ विलास सातपुते 

vilas.satput54@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन

 

– ©️ रामचंद्र देशमुख

संपर्क : ९९३०२४६९८९

  प्रेषक मेघना घाटे 

meghanaghate25@gmail.com

@@@

– मिलिंद महाबळ 

milind.mahabal65@gmail.com 

@@@

 –  युती प्रवीण अघोर  

प्रेषक शुभदा प्रवीण अघोर     

shubhadaaghor@gmail.com

@@@@@@@@@@@@@@@@@

महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. 

@@@@@@@@@@@

महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.

@@@@@@@@@@@@@@

बंडातून नवनिर्माण – पिटकेर्न आयलंड

स्वागत फुलांनी 

‘म्युटिनी ऑन द बाऊंटी’ (१९३४) हे एक गाजलेलं पुस्तक आहे. लेखक चार्ल्स नॉरडॉफ आणि जेम्स हॉल. १७८९ साली ‘बाऊंटी’ नांवाच्या इंग्लंडच्या एका व्यापारी जहाजावर घडलेल्या बंडाची सत्य कहाणी या पुस्तकात दिलीय. बाऊंटी या जहाजाचा कप्तान विल्यम ब्लाय याच्याविरुद्ध त्याचा लाडका तरुण सहाय्यक फ्लेचर ख्रिश्चन याने भर समुद्रात हे बंड केलं होतं. पुस्तक प्रकाशित झाल्यावर हा विषय एवढा गाजला, की हॉलिवूडमध्ये त्यावर अनेक चित्रपट निघाले आणि अजून निघत आहेत. उदा. ‘म्युटिनी ऑन द बाऊंटी’ (१९३५, क्लार्क गेबल आणि चार्ल्स लॉटन), ‘म्युटिनी ऑन द बाऊंटी’ (१९६२, मार्लन ब्रँडो, ट्रेवर हॉवर्ड), ‘द बाऊंटी’ (१९८४, मेल गिब्सन आणि अँथनी हॉपकिन्स) इत्यादी. आयुष्यात एकदा तरी खलनायक समजला गेलेला कॅप्टन ब्लाय किंवा नायकपदावर आरूढ झालेला फ्लेचर ख्रिश्चन यांची भूमिका करायला मिळावी अशी हॉलिवुडच्या प्रत्येक नटाची मनीषा असते.

माझा उद्देश मात्र बंडाची कहाणी सांगण्यापेक्षा बंड यशस्वी झाल्यानंतर पुढे काय घडलं हे सांगण्याचा आहे. कारण पुढली हकीगत मला अत्यंत रोमहर्षक आणि प्रेरणादायी वाटली. चित्रपट काढण्याच्या दृष्टीने ती अधिक आव्हानात्मकही आहे. पण त्यावर चित्रपट निघालेले मला तरी माहीत नाहीत. या कहाणीचा नायक फ्लेचर ख्रिश्चन नसून एक सामान्य, गावंढळ खलाशी आहे. त्याचं नांव जॉन ॲडम्स. कॅप्टन ब्लाय किंवा फ्लेचर ख्रिश्चन यांनासुद्धा न मिळालेलं इतिहासातील महत्त्वाचं स्थान या ॲडम्सने प्राप्त केलं. मात्र बंड यशस्वी होईपर्यंत त्याचा साधा उल्लेखही कुठे येत नाही. त्याच्या कर्तृत्वाला वाव मिळाला तो त्यानंतर. पण ती हकीगत सांगण्याआधी बंडाची पूर्वपीठिका सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे ती थोडक्यात सांगतो.

बंडाची पूर्वपीठिका

. कॅप्टन ब्लाय (जॉन वेबर याने काढलेलं चित्र, १७७५) 

कॅप्टन विल्यम ब्लाय हा ३३ वर्षांचा एक अनुभवी आणि करारी नौदल अधिकारी होता. कॅप्टन कुक या साहसी पर्यटकाबरोबर समुद्रातील सफरींमध्ये त्याने भाग घेतला होता. त्याचा हा अनुभव बघून त्याला एच. एम. एस. बाऊंटी या नव्याने विकत घेतलेल्या जहाजावर लेफ्टनंट कमांडर या पदावर सर्वाधिकारी म्हणून नेमण्यात आलं. कॅप्टन ब्लाय याने आपल्या हाताखालचा अधिकारी म्हणून फ्लेचर ख्रिश्चन या तरुण, तरतरीत नौसैनिकाची निवड केली. फ्लेचर ख्रिश्चन याने यापूर्वीच्या एका मोहिमेत ब्लाय याच्या हाताखाली एक दुय्यम अधिकारी म्हणून काम केलं होतं आणि तेव्हापासून त्याच्यावर ब्लाय याची मर्जी बसली होती.

२. फ्लेचर ख्रिश्चन 

२३ डिसेंबर १७८७ रोजी बाऊंटी जहाज इंग्लंडच्या स्पीटहेड बंदरावरून निघालं. जहाजावर कॅप्टनसकट एकूण ४६ माणसं होती. त्यात दोन माळी सोडले तर बाकीचे सर्व नैसैनिक, खलाशी आणि अधिकारी होते. न्यूझीलंडजवळील मध्य पॅसिफिक समुद्रात असणाऱ्या ताहिती बेटावर जाऊन तिथून रानफणसाची (Breadfruit) आणि केळीची रोपे घेणे आणि ती ब्रिटिश वेस्ट इंडिज बेटांमध्ये पोहोचवणे ही कामगिरी कॅप्टन ब्लायवर सोपविण्यात आली होती. त्या बेटांवर काम करणाऱ्या गुलामांसाठी स्वस्तातलं स्वस्त खाद्य म्हणून या रोपांची लागवड तिथे करण्यात येणार होती. ब्लाय याला या कामाचा पूर्वानुभव होता.

सुंदर तरुणींची भूल
बाऊंटी जहाज ‘केप ऑफ गुड होप’ला वळसा घालून आणि हिंदी महासागर ओलांडून १० महिन्यांनी ताहिती बेटाच्या किनाऱ्यापाशी पोहोचलं. त्या दिवशी तारीख होती २६ ऑक्टोबर १७८८. कॅप्टन ब्लाय त्या बेटाच्या राजाला भेटला आणि इंग्लंडच्या राजातर्फे कित्येक भेटवस्तू देऊन त्याने त्याला खूष केलं. त्यामुळे बेटावर या लोकांचं चांगलं आदरातिथ्य करण्यात आलं. त्यानंतर जहाजावरील बहुतेक मंडळी ५ महिने त्या बेटावरच मुक्काम करून राहिली. रानफणसाच्या रोपांची काळजी घेण्यासाठी त्यांना झोपड्या बांधून तिथे राहण्याची परवानगी ब्लायने दिली होती. खुद्द ब्लाय मात्र जहाजावरच रहात असे. या कालावधीत रानफणसाची १०१५ रोपं आणि बरीचशी केळीची रोपं त्यांनी जमा केली. अखेर मुक्काम हलवण्याचा दिवस आला. पण बेटावर राहिलेली मंडळी पुन्हा जहाजावर यायला तयार होईनात. त्यांना तिथल्या निसर्गाने आणि सुंदर, मनमोकळ्या स्त्रियांनी भूल घातली होती. ताहितींच्या अनोख्या जीवनशैलीची त्यांना ओढ निर्माण झाली होती. तिथल्या रितीप्रमाणे अनेकांनी आपल्या अंगावर गोंदून घेतलं होतं आणि ताहिती लोकांप्रमाणेच ते वेशभूषा करत होते. बहुतेक नौसैनिकांचं सूत स्थानिक तरुणींशी जुळलं होतं. त्यांच्याबरोबर ते जोडप्याने रहात होते. फ्लेचर ख्रिश्चन याने तर मैमती नांवाच्या तरुणीशी विवाहसुद्धा उरकला होता. त्यामुळे ‘आम्ही परत येत नाही’ असा निरोप त्यांनी जहाजावर पाठवला.

बंडाचा दिवस
पुन्हा पुन्हा निरोप पाठवूनही आपली माणसे येत नाहीत हे बघून कॅप्टन ब्लाय चिडला. त्याच्या शिस्तीत हे बसत नव्हतं. आपले निष्ठावान सशस्त्र अनुयायी घेऊन तो बेटावर आला. राजाची संमती मिळवून त्याने आपल्या माणसांना सणसणीत दम भरल्यावर बरेचसे नौसैनिक आणि खलाशी जहाजावर येण्यास तयार झाले. जे आले नाहीत त्यांना ब्लायने माणसं पाठवून पकडून आणलं. या सर्वांना त्याने भयंकर कडक शिक्षा ठोठावल्या. बांधून ठेवणे, उपाशी ठेवणे, चाबकाने मारणे या गोष्टींचा त्यात समावेश होता. त्यामुळे ब्लायविरुद्ध जहाजावर रोष पसरला. ४ एप्रिल १७८९ रोजी सर्वांना घेऊन जहाज वेस्ट इंडिजकडे निघालं तेव्हा बेटावरील तरुणींचा विरह सहन न होऊन सर्वजण हलक्या आवाजात बंडाची भाषा बोलू लागले. फ्लेचर ख्रिश्चन हा सर्वांचा आवडता असल्यामुळे तोच त्यांची बाजू कॅप्टन ब्लायकडे मांडत असे. त्याला स्वतःला शिक्षा भोगावी लागली नसली तरी ब्लायकडून त्याची रोज निर्भर्त्सना चालू होती. त्यामुळे तोही दुखावला गेला होता. पर्यायाने या बंडाचं नेतृत्वही त्याच्याच गळ्यात पडलं. आपल्या बाजूला ४३ पैकी पंचवीसएक नौसैनिक आहेत याची खात्री पटल्यावर फ्लेचर ख्रिश्चनने बंडाची योजना तयार केली. (एकूण ४६ नौसैनिकांपैकी प्रवासात १ माणूस मेला होता तर २ नाहीसे झाले होते त्यामुळे आता ४३ उरले होते.) आणि मग ताहितीहून निघाल्यापासून २४ दिवसांनी, म्हणजे २८ एप्रिल १७८९ रोजी पहाटे पहाटेच फ्लेचर ख्रिश्चन याने बंड पुकारलं. त्याच्या माणसांनी प्रथम शस्त्रे ताब्यात घेतली. मग झोपेत असलेल्या कॅप्टन ब्लाय आणि त्याच्या निष्ठावान माणसांना पकडून त्यांचे हात बांधण्यात आले. या सर्वांना ठार मारावं असं काही जणांचं मत होतं. पण फ्लेचर ख्रिश्चन हा माणुसकी असलेला नेता होता. शिवाय कॅप्टन ब्लायविषयी त्याला आदरही होता. त्यामुळे त्याने तो सल्ला धुडकावून लावला. त्याने कॅप्टन ब्लाय आणि त्याच्या १७ निष्ठावान नौसैनिकांचे हात मोकळे करून त्यांना एका होडक्यात बसवलं. त्यांना काही दिवस पुरेल एवढं पाणी आणि अन्न याचा साठा दिला. एवढंच नव्हे, तर समुद्रातून जाताना अडचण भासू नये म्हणून ब्लाय याला एक होकायंत्रही दिलं आणि मग त्यांना निरोप दिला.

. बंडानंतर कॅप्टन ब्लायची होडीतून रवानगी (रॉबर्ट डोड याचं कल्पनाचित्र, १७९०)

ताहितीकडे परत
कॅप्टन ब्लाय याचं होडकं दिसेनासं झाल्यावर फ्लेचर ख्रिश्चन याने जहाज वळवून ते पुन्हा ताहितीच्या दिशेने हाकारलं. त्यापूर्वी रानफणसाची आणि केळीची सर्व रोपे बंडकऱ्यांनी समुद्रात फेकून दिली. वाटेत तुबुई (Tubuai) नामक एका बेटावर राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण स्थानिकांनी विरोध केल्यामुळे दोन महिन्यांनी त्यांना तिथून निघावं लागलं. अखेर २२ सप्टेंबर १७८९ रोजी सकाळी ते ताहिती बेटावर पोहोचले. तिथे त्यांनी आपण का परतलो याची वेगळीच कहाणी बनवून सांगितली. कित्येकांना ती खरी वाटली नाही, पण तरीही त्यांचं स्वागत करण्यात आलं. मात्र फ्लेचर ख्रिश्चन मनोमन अस्वस्थ झाला होता. यदाकदाचित कॅप्टन ब्लाय इंग्लंडला पोहोचण्यात यशस्वी झालाच, तर आपल्याला पकडण्यासाठी तिकडून एखादं लष्करी जहाज पाठवण्यात येईल आणि तसं झालं तर इंग्लंडमधील न्यायालयात मृत्यूदंडाशिवाय दुसरी शिक्षा मिळणार नाही हे तो ओळखून होता. त्यामुळे फार वेळ न गमावता त्याच दिवशी संध्याकाळी तो दुसऱ्या एखाद्या सुरक्षित बेटाच्या शोधात निघाला. त्याच्याबरोबर ९ बंडकरी, १४ ताहिती स्त्रिया आणि ६ ताहिती पुरुष होते. या ९ बंडकऱ्यांत लेखाच्या सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला तो गावंढळ खलाशी जॉन ॲडम्स हाही होताच. बाकीचे बंडकरी स्वेच्छेने ताहिती बेटावरच राहिले.

नौदलाची कारवाई
फ्लेचर ख्रिश्चन याची भीती पुढे खरी ठरली. आपल्या अनुभवाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अनेक संकटांना तोंड देत कॅप्टन ब्लाय कित्येक महिन्यांचा प्रवास करून तिमोर बेटाच्या कुपांग बंदरात पोहोचला. तिथे ब्रिटिशांचंच प्रशासन असल्यामुळे दुसऱ्या जहाजाने इंग्लंडला पोहोचायला त्याला अडचण पडली नाही. मग इंग्लंडमधील नौदल अधिकाऱ्यांकडे त्याने बंडाविषयी रीतसर तक्रार नोंदवली. तेव्हा बंडकऱ्यांना पकडून आणण्यासाठी एच. एम. एस. पॅन्डोरा हे लष्करी जहाज रवाना करण्यात आलं. २३ मार्च १७९१ रोजी ते ताहितीला पोहोचलं आणि तिथे स्थायिक झालेल्या सर्व १४ बंडकऱ्यांना कैद करून ते परत फिरलं. या सर्वांना जहाजाच्या तळात एका बंदिस्त जागेत ठेवण्यात आलं होतं. ती जागा पुढे ‘पॅन्डोरा बॉक्स’ या नांवाने इतिहासात गाजली. वाटेत जहाज बुडून यातील ४ कैदी मरण पावले. जहाज बुडत असताना होड्या पाण्यात सोडून पॅन्डोरा बोटीचा कॅप्टन, त्याचे नैसैनिक आणि कैदी हे कॅप्टन ब्लायप्रमाणेच प्रवास करून कुपांग बंदरात पोहोचले. दुसऱ्या जहाजाने ते इंग्लंडला पोहोचल्यावर उर्वरित १० कैद्यांवर खटला चालवण्यात आला. त्यापैकी ४ जणांना फाशी झाली, तर ६ जणांची सुटका करण्यात आली.

पिटकेर्न आयलंड
इकडे ताहिती बेटावरून निघाल्यावर फ्लेचर ख्रिश्चनने अशा एका बेटाचा शोध घ्यायचा ठरवला, की ज्याकडे तोपर्यंत कुठल्याच देशाचं लक्ष गेलं नव्हतं. दक्षिण पॅसिफिक समुद्रातील त्या बेटाचं नांव ‘पिटकेर्न आयलंड’ (Pitcairn Island) असं होतं. हे बेट ताहितीच्या अतिपूर्वेला कुठेतरी आहे एवढंच फ्लेचर ख्रिश्चनला ऐकून माहिती होतं. या बेटावर इंग्लंड किंवा न्यूझीलंडचं अधिपत्य नसल्यामुळे ख्रिश्चन याला ते बेट सुरक्षित वाटलं आणि त्या दिशेने त्याने जहाज हाकारलं. अखेर १५ जानेवारी १७९० रोजी ते बेट शोधून काढण्यात तो यशस्वी झाला. हे बेट साडेतीन किलोमीटर लांब आणि दोन किलोमीटर रुंद होतं. बेटावर मानवी वस्ती नव्हती. गोडं पाणी मुबलक होतं. जागोजागी फळझाडे होती. बेटाची जमीन सुपीक असल्यामुळे लागवडही शक्य होती. या अनुकूलतेमुळे ते बेट सर्वांना स्वर्गासमान भासलं.

सुरुवातीचा काळ  
बेटावर राहण्याची जागा निश्चित करून साफसूफ करण्यात आली. मग जहाजावरील सर्व सामान आणून रचण्यात आलं. जहाजाची डोलकाठी, शिडे आणि काढता येतील तितकी लाकडे काढून घरे बांधण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला. मग फ्लेचर ख्रिश्चनच्या आदेशावरून मॅथ्यू क्विंटॉल या बंडकऱ्याने जहाज पेटवून दिलं. ती तारीख होती २३ जानेवारी १७९०. अशाप्रकारे इथे एखादं जहाज आल्याचा पुरावा नष्ट करण्यात आला. त्याचबरोबर आलेल्या मंडळींना बेटावरून सुटका करून घेण्याचा मार्गही बंद झाला. लवकरच प्रत्येकाने आपापली घरे बांधून पूर्ण केली आणि जोडप्यांचा संसार सुरु झाला. फ्लेचर ख्रिश्चनला १४ ऑक्टोबर १७९० रोजी मैमतीपासून मुलगा झाला. त्याचं नांव ‘थर्सडे ऑक्टोबर ख्रिश्चन’ असं ठेवण्यात आलं. बेटावर जन्मलेलं हे पहिलं मूल. नंतर इतरांनाही मुलंबाळं झाली.

फ्लेचर ख्रिश्चनचा मुलगा थर्सडे ऑक्टोबर ख्रिश्चन  

बेटावरील हिंसा
साधारण वर्षभराचा काळ ठीक गेला. मग हळुहळू कटकटींना सुरुवात झाली. प्रत्येकाला इंग्लंडमधील आपले आईवडील, बायकामुलं आठवून मनस्ताप होऊ लागला. त्यांची मनःस्थिती ढासळू लागली. यात मन स्थिर ठेऊन होते ते बंडकऱ्यांपैकी नेड यंग आणि वर उल्लेखिलेला जॉन ॲडम्स हे दोघेच. त्याच सुमारास स्कॉटिश नौसैनिक विल्यम मॅकॉय याने एका विशिष्ट झाडाच्या मुळांपासून ब्रँडी हे मद्य तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला. एकदा तो प्रयोग यशस्वी झाल्यावर त्याने तिथे एक ऊर्धपातन यंत्रणाच (Distillery) उभारली. त्यामुळे दिवसभर अनेकजण झिंगलेल्या अवस्थेतच असत. फ्लेचर ख्रिश्चनही गप्प गप्प राहू लागला. त्याला एकप्रकारच्या नैराश्याने ग्रासलं. त्यामुळे त्याचा वचक राहीनासा झाला. बंडकऱ्यांपैकी काहीजण ताहिती पुरुषांना गुलामांसारखं वागवू लागले. त्यातच एक सोय म्हणून ठराविक दिवसांनी स्त्रियांचा जोडीदार बदलण्यात येत होता. त्यातून भांडणे, मारामाऱ्या सुरु झाल्या. अखेर सप्टेंबर १७९३ मध्ये एके दिवशी मोठी मारामारी झाली आणि त्यात ताहिती पुरुषांकडून फ्लेचर ख्रिश्चनसकट ५ बंडकरी मृत्यू पावले. त्यामुळे मॅकॉय, क्विंटॉल, यंग आणि ॲडम्स हे चारच बंडकरी उरले. १७९४ हे वर्ष उजाडता उजाडता सर्व ६ ताहिती पुरुष मारले गेले. त्यांना बहुधा मृत बंडकऱ्यांच्या विधवा पत्नींनी सूड म्हणून मारलं असावं किंवा आपापसात लढून ते मेले असावेत. याविषयी उलटसुलट कहाण्या नंतर सांगण्यात आल्यामुळे वस्तुस्थिती कळणं कठीण आहे.

सुव्यवस्थेची प्रस्थापना
आता बेटावर ४ बंडकरी, १४ ताहिती स्त्रिया आणि काही मुले एवढी प्रजा शिल्लक राहिली होती. या सर्वांचं नेतृत्व शरीराने बळकट आणि स्वभावाने शांत असलेल्या नेड यंग आणि जॉन ॲडम्स या दोघा बंडकऱ्यांकडे आलं. उरलेले दोन बंडकरी मॅकॉय आणि क्विंटॉल हे दिवसभर झाडांच्या सावलीत काही बायकांसह झिंगून पडून असत. यापैकी मॅकॉय याने १७९८ साली दारूच्या नशेत आत्महत्या केली. त्यानंतर मॅथ्यू क्विंटॉल हा अधिकच हिंसक बनत चालला. तशातच त्याने फ्लेचर ख्रिश्चनच्या विधवा पत्नीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. ते न केल्यास तिच्या मुलांचा खून करण्याची धमकी तो वारंवार देऊ लागला. अखेर यंग आणि ॲडम्स यांनी त्याला एका झोपडीत नेऊन त्याच्यावर कुऱ्हाडीचे वार करून त्याला ठार मारून टाकलं. त्यानंतर तिथे शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली. ॲडम्स हा पूर्णपणे अशिक्षित होता. पण नेड यंगच्या मागे लागून तो लिहायवाचायला शिकला. जवळच एक चर्च उभारण्यात आलं. त्यांच्याकडे जहाजावरची बायबलची एक प्रत होती. तिचा उपयोग करून सकाळ संध्याकाळ सामुदायिक प्रार्थना करण्याचा रिवाज सुरू झाला. १८०० साली नेड यंग दम्याच्या विकारामुळे मरण पावला तेव्हा बेटावर जॉन ॲडम्स हा एकमेव पुरुष उरला. शिवाय ९ स्त्रिया आणि १९ मुलं एवढी प्रजा होती. ॲडम्स त्यांचा कर्ता पुरुष झाला. बायबलचा उपयोग करून त्याने मुलांना लिहिण्यावाचण्याचं शिक्षण दिलं. त्याला शक्य होतं तेवढं धार्मिक शिक्षणही दिलं. प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिल्या. नेमनियम, कायदेकानू ठरवले. वयात आलेल्या मुलामुलींची लग्ने लावून दिली.  

पिटकेर्न बेटावरील जॉन ॲडम्स याचं लाकडी घर 

बाहेरच्या जगाशी संपर्क
अशातच १८०८ साली अगदी अपघातानेच अमेरिकन व्यापारी जहाज ‘टोपाझ’ हे पिटकेर्न बेटाच्या किनाऱ्याला लागलं. बेटावरील रहिवाशांना इंग्रजी येत असल्यामुळे अमेरिकन प्रवाशांना सर्व हकीगत समजली आणि ते अचंबित झाले. त्यांच्याकडून ती हकीगत इंग्लंडला पोहोचायला १८१० साल उजाडलं. पण त्यावेळी फ्रान्सशी युद्ध चालू असल्यामुळे इंग्लिश नौदलाला सवड नव्हती. पुढे १८१४ साली इंग्लंडहून खास एच. एम. एस. ब्रिटन हे जहाज पिटकेर्न बेटाकडे पाठवण्यात आलं. एव्हाना बेटावरच्या प्रजेची संख्या ४६ एवढी झाली होती. तिथे जॉन ॲडम्स, फ्लेचर ख्रिश्चनचा मुलगा थर्सडे ऑक्टोबर ख्रिश्चन आणि अन्य बायकामुले यांच्याशी नौदल अधिकाऱ्यांची मोठी सौहार्दपूर्ण भेट झाली. फ्लेचर ख्रिश्चनचा मुलगा हुबेहूब त्याच्यासारखाच दिसत असल्याचा अभिप्राय जहाजाचा कॅप्टन सर थॉमस स्टेन्स आणि आणखी एकदोन नौदल अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ॲडम्स याला बंडाच्या अपराधाबद्दल माफी जाहीर करण्यात आली. इंग्लंडमध्ये ही वार्ता पसरल्यानंतर एक सामुदायिक औत्सुक्य निर्माण झालं. मग जहाजामागून जहाजं पिटकेर्न बेटाकडे येऊ लागली. बेटाला धक्का वगैरे काही नव्हता. त्यामुळे बोट समुद्रात काही अंतरावर उभी रहायची. म्हणून तिथे एक लाकडी जेट्टी बांधण्यात आला. अनेकांनी जॉन ॲडम्स याच्या मुलाखती घेऊन त्या इंग्लंडच्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केल्या. त्यामुळे ॲडम्स आणि पिटकेर्न बेटाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर पर्यटन आणि बोटींवर लावली जाणारी जकात हाच बेटाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला. १८२० साली जॉन बुफे, जॉन इव्हान्स आणि जॉर्ज नॉब्ज हे तीन ब्रिटिश साहसवीर मुद्दाम इंग्लंडहून येऊन बेटावर स्थायिक झाले. त्यांनी बंडकऱ्यांच्या मुलींशी विवाह केले. यापैकी नॉब्ज याची ॲडम्स याने आपला उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली. त्याचप्रमाणे फ्लेचर ख्रिश्चनचा मुलगा थर्सडे ऑक्टोबर ख्रिश्चन आणि जॉन बुफे यांच्याकडेही त्याने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या.

 

‘फादर ऑफ द नेशन’ जॉन ॲडम्स 

विकासाचे पर्व
ॲडम्सच्या मृत्यूनंतर जॉर्ज नॉब्ज, बुफे आदींच्या प्रयत्नांमुळे इंग्लंडने या बेटाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. १८३२ साली एका मिशनरी सोसायटीच्या धर्मप्रचारकाला बेटावर पाठवण्यात आलं. त्याने तिथे एका शाळेची स्थापना केली. त्याचप्रमाणे ‘होली थर्सडे सोसायटी’, सामुदायिक मासिक प्रार्थना, व्यसननिर्मूलन आदी उपक्रम सुरु केले. पुढल्या काळात तिथे डॉक्टर, शाळामास्तर, पास्टर यांच्या नेमणुका झाल्या. कालांतराने  बाउंटी जहाजाचे अवशेष समुद्रातून शोधून काढण्यात आले आणि एक स्वतंत्र वस्तुसंग्रहालय उभारून ते तिथे ठेवण्यात आले. प्रवाशांनी बंडकऱ्यांची आणि त्यांच्या घरांची काढलेली रेखाचित्रे, फोटो आणि बायबलची प्रत वगैरे वापरातल्या वस्तूसुद्धा त्यात ठेवण्यात आल्या. १८३८ साली या बेटाला ‘ब्रिटिश कॉलनी’ चा दर्जा देण्यात आला. मतदान करून मॅजिस्ट्रेट आणि महापौर निवडण्याची पद्धत बेटावर रूढ झाली. स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार देण्यात आला हे विशेष. 

उजवीकडून- मॅथ्यू क्विंटॉलचा मुलगा आर्थर, जॉन ॲडम्सचा मुलगा जॉर्ज, आर्थर क्विंटॉलचा मुलगा जॉन आणि जॉर्ज ॲडम्सचा मुलगा जॉन (ग्रुप फोटो, १८६२)

पुढे या बेटाचा आधी फिजी बेटाच्या राज्यपालाच्या अधिकारकक्षेत आणि नंतर न्यूझीलंडच्या अधिकारकक्षेत समावेश करण्यात आला. १९४०-४१ मध्ये ब्रिटिश सरकारने हेन्री इव्हान्स आणि त्याची पत्नी या अनुभवी जोडप्याला पाठवून बेटावर नगरपरिषदेची स्थापना करून दिली. त्याचप्रमाणे या जोडप्याने पोस्ट ऑफिस आणि पोस्टल स्टॅम्पही सुरु करून दिले. १८६३ साली बेटावरील लोकसंख्या १६३ होती ती १९३७ सालापर्यंत २३३ झाली. ती कमी करण्यासाठी मुलांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंड किंवा न्यूझीलंडला पाठवण्यात येऊ लागलं. २०२१ मध्ये बेटावरील कायमच्या रहिवाशांची संख्या ५० च्या घरात होती आणि गर्दी टाळण्यासाठी ती तेवढीच ठेवली जाणार आहे. मात्र आजही या बेटावरचे महापौर हे सहसा ख्रिश्चन, यंग, मॅकॉय किंवा ॲडम्स या बंडकऱ्यांच्या वंशात जन्मलेले स्त्रीपुरुष असतात.

पोस्टाच्या तिकिटावर व्हिक्टोरिया राणीसह जॉन ॲडम्स आणि बेटावरील बायबलची प्रत     

‘फादर ऑफ द नेशन’ जॉन ॲडम्स
५ मार्च १८२९ या दिवशी जॉन ॲडम्स मरण पावला तेव्हा त्याचं वय ६१ वर्षांचं होतं. त्याची तिथे समाधी उभारण्यात आली. कुठलाही पूर्वानुभव नसताना त्याने जवळपास तीसबत्तीस वर्षं एकहाती कारभार केला आणि बेटावरील प्रजेच्या आयुष्याची उत्तम घडी बसवली. बाहेरच्या जगातले प्रवासी तिथे आले तेव्हा बेटावरील रहिवाशी सुखी, आनंदी आणि संपन्न आयुष्य जगत असलेले त्यांना दिसले. याचं श्रेय निर्विवादपणे जॉन ॲडम्सकडे जातं. एखाद्या प्रजाहितदक्ष राजाप्रमाणे त्याची वर्तणूक राहिली. म्हणूनच पुढल्या काळात पिटकेर्न बेटाचा विकास झाल्यानंतर तिथली मुख्य वसाहत ही त्या बेटाची राजधानी बनली आणि तिला ‘ॲडम्स टाऊन’ हे नांव देण्यात आलं. ‘फादर ऑफ द नेशन’ म्हणून ॲडम्सचा पुतळाही उभारण्यात आला. तेथील पोस्टाच्या पहिल्या तिकिटावरही ॲडम्स याचंच चित्र छापलेलं आहे. अशाप्रकारे जॉन ॲडम्ससारख्या एका यःकश्चित अडाणी खलाशाला इतिहासाच्या पानांमध्ये एक महत्त्वाचं स्थान प्राप्त करून देण्याचा चमत्कार नियतीने करून दाखवला !
यापेक्षा प्रेरणादायी आणि रोमहर्षक असं जगात काय असू शकतं ?

– ©️ हर्षद सरपोतदार

 hsarpotdar1@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

स्वागत फुलांनी – अ‍ॅडेनियम ओबेसम( डेजर्ट रोज

अ‍ॅडेनियम ओबेसम, ज्याला डेजर्ट रोज म्हणूनही ओळखले जाते, ही आफ्रिका आणि अरेबिया येथील एक रसाळ वनस्पती आहे. त्याच्या आकर्षक देखावासाठी ओळखले जाणारे, हे एक लोकप्रिय सजावटीचे फूल आहे कारण ते बोनसाईसारखे दिसते. हे कमी देखभालीचे आहे आणि बहुतेकदा कंटेनरमध्ये वाढवले जाते.वनस्पती ३ मीटर उंच वाढते आणि त्याचा जाड, पाणी साठवणारा खोड असतो.
त्याचे आकर्षक गुलाबी किंवा लाल फुले उन्हाळ्यात उमलतात, परागण कर्त्यांना आकर्षित करतात.
ते चांगले निचरा होणारी माती आणि पूर्ण सूर्य पसंत करते. योग्य काळजी घेतल्यास, डेजर्ट रोज दशकांपर्यंत जगू शकते.  

अनघा फर्नांडिस 

प्रकाशचित्र – सायना फर्नांडिस 

प्रेषक डॉ. प्रियंवदा कोल्हटकर  

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विचारशलाका 

(51)

How little do we discover in comparison of those things which now are and forever will be hidden from our sight? The whole of which I am fully persuaded no-one will ever be able to dive into, and to explain their causes and effects 

– Antonie van Leeuwenboek

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आणखी एक (अज्ञात ) केशवसुत

– पृष्ठ ५९ –

 

प्रेषक माधव मनोहर जोशी 

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

संस्कृत सुभाषितांचा मराठी भावानुवाद 

[ ६६ ] 

अभिज्ञान शाकुंतलम् मधील एक श्लोक—

राजन् सर्शपमात्राणि परछिद्राणि पश्यति।
आत्मनः बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति॥

मराठी भावानुवाद—

ध्यानी ठेव एक l गोष्ट तू राजन l
मनुजाचे मन l नच कळे ll१ll
मोहरीच्या दाण्या l इतुके लहान l
दुजातील न्यून l दिसतसे ll२ll
पण स्वतःतील l बेलफळा सम l
दोष महत्तम l नच दिसे ll३ll

– ©️ माधव मनोहर जोशी.

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

Rainbow Magic …!!

Sun shines in the rain
O’Sunshine in the rain,
N’ yeah..!
A colorful rainbow,
appears again,
calling  us out,
to dance in the rain….!!

I hold my granpa’s hand
N’ pull him out
in the shiny rain…!
with lots of giggle
N’ lots of  wiggle , granpa
starts dancing in the rain…!!

Don’t go away, don’t go away,
O’ rain, Please  don’t go away
Look at the Sun,
it is shining again …!
N look at the rainbow,
it is bright again
N’ here is my  granpa
dancing in the rain.…!!

Laughing n clapping,
tumbling n stumbling
holding my hands
again and again… !
N’ my dear granpa
dancing in the rain…!!

Magic of the rainbow
N’ magic of the rain….!
N’ O’ look at my granpa
he is a child again…!!

– ©️   Pradeep Adhikari

adhikaripradeep14@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

जनमानसवेधी जाहिरातधर्मी : पीयूष  पांडे

घाईघाईने निर्माण केलेले  साहित्य अशी पत्रकारितेची व्याख्या केली जाते. त्याला जवळ जाणारा आणखी एक व्यवसाय आहे आणि तो म्हणजे जाहिरातीचा.  अतिशय कमी वेळात, आकर्षक चपखल मजकूर, त्याला योग्य अशी दृश्याची जोड, शोभेशी रंगसंगती अशी मागणी करणारे हे क्षेत्र. ’वॉन्टेड यस्टरडे’ असाच खाक्या इथेही आहे. ‘कालच पाहिजे होते पण आज चालेल’ असे म्हणणारा हा व्यवसाय. या व्यवसायात ४० वर्षांहून अधिक काम केलेले आपल्या प्रतिभाशाली आविष्काराने भारतीय जाहिरातविश्वाचा चेहेरा मोहरा बदलून टाकणारे पीयूष पांडे  (वय -७०) परवाच्या शुक्रवारी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांची ही आकस्मिक एक्झिट  अवघ्या जाहिरातविश्वाला चुटपुट लावून गेली. जाहिरात या संकल्पनेकडे भारतीय मानस केवळ एक विक्रीचे साधन म्हणून पाहत होते. त्या काळात म्हणजे  ८० च्या दशकात भारतीय जाहिरात जगतात दबदबा निर्माण करणारे  मोजके रथी महारथी निर्माण झाले त्यापैकी पांडे हे एक महत्वाचे नाव.

 अर्थात जाहिरातींना मानवी चेहरा देण्याचा प्रथम मान लिंटास या जाहिरात संस्थेचे सर्वेसर्वा ऍलेक पदमसी यांच्याकडे जातो. सतत १४ वर्षे लिंटास मध्ये राहून त्यांनी खऱ्या अर्थाने जाहिरात विश्वाला चैतन्य दिले.ग्राहकांची अभिरुची घडवली.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून  नागरिकांच्या जगण्याशी जाहिरात कथांना एकरुप करत ,आपल्या सर्जनशीलतेमधून  शब्द-चित्र रंगरेषा ध्वनी यांच्या सहायाने या क्षेत्राला एक नवा आयाम देणारे  पीयूष पांडे यांनी एक अस्सल भारतीय वाण या जाहिरातक्षेत्राला बहाल केला. पीयूष पांडे यांची  कारकीर्द अकाउंट (क्लाएंट ) एक्झेक्युटिव्ह म्हणून ओगिलव्ही या जगविख्यात जाहिरात संस्थेत १९८२ साली  सुरु झाली .८० च्या दशकाच्या सुरवातीचा हा काळ मी अगदी  जवळून पाहिला आहे.  हा काळ जाहिरात क्षेत्रासाठी संक्रमणाचा होता.

याच जाहिरात क्षेत्रात  अकाउंट एक्झेक्युटिव्ह,कॉपी रायटर म्हणून काही वर्षे काम केल्यामुळे मी खात्रीने सांगू शकतो की खूप आव्हानात्मक असे ते दशक होते. ग्राहकाला आपण देत असलेल्या पैशाचे पुरेपूर मोल हवे असायचे. मग जाहिरातींसाठी आरक्षित केलेली जागा इंच इंच वापरण्यासाठी ते  आग्रह धरायचे.वस्तू / सेवा कोणतीही असली तरी भडक रंग,ढोबळ चित्र वापरण्याचा अट्टहास करणाऱ्या वातावरणात पीयूष पांडे यांनी ग्राहकांचे प्रबोधन करुन जाहिरात क्षेत्राचे व्याकरण बदलले. त्यांच्या कल्पना शक्तीची भरारी आणि लेखनातील चमक लक्षात आल्यावर जाहिरात संस्थेने त्यांना आपल्या सर्जनशीलतेची मागणी करणाऱ्या विभागात सामावून घेतले.भारतीय जाहिरात विश्वाला अतिशय देखण्या  ,भाषा ,भाव-भावना यांचा सन्मान करणाऱ्या जाहिराती पाहण्याची सवय पांडे यांनी लावली असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरु नये. अनेक ठिकाणी फिरुन ,लोकांमध्ये मिसळून जनमानस जाणून घेण्यात त्यांना कमालीचा रस होता.त्यामुळे अस्सल भारतीय विचारधारा,संस्कृती त्यांच्या जाहिरात आशयातून झिरपत असे. त्यांच्या सातत्यपूर्ण निरीक्षणाचा  आणि अनुभव समृद्ध जीवनशैलीचा सकारात्मक परिणाम त्यांच्या जाहिरातींवर झाला. लोकांना काय हवे याची त्यांना उत्तम जाण होती.चांगली जाहिरात लिहिणे हे जनतेच्या गरजा आणि अपेक्षा यांचे नेमके भान असले तरच शक्य होते हे पीयूष पांडे यांनी सप्रमाण सिद्ध केले.

लुना हे वाहन हे मध्यमवर्गीय ,कनिष्ट मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी हे लक्षात घेऊन ‘चल मेरी लुना’ ही जाहिरात मालिका त्यांनी बनवली.यात एका पानावरून दुसऱ्या पानावर पळणारी ही मोपेड दाखवून इंधन बचतीचे तिचे वैशिष्ट्य अधोरेखित करत त्यांनी ग्राहकांना आकर्षित केले .‘मिले सूर मेरा तुम्हारा’ सारख्या  जाहिरातपटामधून  एकात्मकतेचे दर्शन घडवणारी कलाकृती ही यांच्याच कल्पनेतून साकार झाली. १५ ऑगस्ट , १९८८ या दिवशी ती देशभर दूरदर्शनच्या माध्यमातून प्रसारित झाली.

कोणतेही देशप्रेमाचे डोस न पाजता काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांनी एकत्र येण्याच्या सहज साध्या कृतीचा तो एक काव्यात्मक अविष्कार ठरला. पाय जमिनीवर ठेवून घेतलेली ही शब्दाची आणि कल्पनेची भरारी आपल्या जाहिरात विश्वाला एक अनोखा आयाम देऊन गेली.

मिल्क चॉकलेट हा बच्चे मंडळीमध्ये प्रिय असलेला, सहज गम्मत म्हणून चघळण्याचा खाद्य पदार्थ. मुळात चॉकलेट हा पाश्चिमात्य प्रकार भारतीय नागरिकांमध्ये रुजवणे  हे नक्कीच आव्हानात्मक होते. पण यांनी ‘चॉकलेट  नही चाकलेट’ ही भारतीय बोलीभाषा त्याला बहाल करुन आपल्या मिठाईच्या साम्राज्यात ते वाजत गाजत आणले.  ‘द रिअल टेस्ट ऑफ लाईफ’ या टीव्ही जाहिरातीत आनंदित होऊन खेळाडूला आलिंगन देण्यासाठी  क्रिकेटच्या मैदानावर भावनाट्य सजवणारी तरुणी भारतीयांच्या आशा आकांक्षांचे प्रतीक बनली.

फेव्हीकॉलच्या सहज स्मित निर्माण करणाऱ्या जाहिराती आठवतात का ? एका ट्रक मध्ये दाटीवाटीने बसलेली मंडळी .ट्रक डुलत चालला आहे अगदी  कुणीही,कधीही  पडतील असे आपल्या प्रेक्षक म्हणून वाटत राहते.पण तसे काही घडत  नाही कारण अर्थात फेव्हीकॉल.गुजरात पर्यटनची ‘ कछ  नही देखा  तो कुछ नही देखा’ ही अमिताभ बच्चनला घेऊन केलेली जाहिरात मालिकाही एक देखणा ऐवज ठरली.

पोलिओ निर्मुलन मोहिमेतही यांनी जाहिरातींच्या माध्यमांतून अतिशय भरीव योगदान दिले.‘दो बुंद जिंदगीकी’ ही जाहिरात मालिका अमिताभ बच्चन यांना घेऊन त्यांनी केली. जाहिरात ही सहसा अनुनय करणारी असते. पण या जाहिरातीत त्यांनी अमिताभला अँग्री ओल्ड मॅन म्हणून सादर केले. बेपर्वाई आणि आळस  करणाऱ्या पालकांना खडे बोल सुनावत त्यांना पोलिओ बूथ पाशी खेचून आणले.२००० सालच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठीच्या धूम्रपान  विरोधी जाहिरातीत त्यांनी धूम्रपान करणाऱ्यांशी थोड्या ममतेने वागा असे कॅन्सर रोगाला सांगताना त्यांच्याकडे अगदी थोडे आयुष्य उरले आहे असा उल्लेख करुन धूम्रपानाच्या सवयीच्या घातक परिणामांविषयी  एक प्रभावी संदेश दिला.

 व्होडाफोनची  ‘जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे आमचे नेटवर्क सोबत येईल’ ही पग या श्वानासोबत बागडत जाणारी जाहिरात, एशियन पेंट्सची ‘हर घर कुछ कहता है’ ही प्रत्येक घराचे  वेगळेपण जपणाऱ्या रंगाची जाहिरात या सगळ्या   पीयूष पांडे यांच्या कल्पनाशक्तीचा अविष्कार आहे. राजकीय जाहिरातींचा काहीच अनुभव गाठीशी नसताना भारतीय जनता पक्षाच्या जाहिरात मोहिमेची सूत्रे पांडे यांनी हाती घेतली. ‘अब की बार मोदी सरकार’, फिर एक बार मोदी सरकार ही अनुक्रमे २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी यांनी तयार केलेली घोषणा काय चमत्कार करुन गेली ते आपण सर्वांनी पाहिलेच आहे.

थोडक्यात काय चॉकलेट  असो वा रंग , राजकारण असो वा रोग निर्मुलन, जनतेची नाडी नीट ठाऊक असली आणि त्यांच्या भाषेत संवाद साधण्याचे कसब असले की जाहिरात ही जाहिरात न राहता एक विश्वासार्ह आणि हवीहवीशी वाटणारी सत्यकथा बनून जाते. हा कानमंत्र पियुष पांडे यांनी जाता जाता आपल्याला  दिला त्याबद्दल आपण त्यांचे सदैव ऋणी राहायला हवे.

पियुष पांडे 

डॉ. केशव साठये
keshavsathaye@gmail.com
(लेखक टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारिता, संज्ञापन आणि डिजिटल आर्ट विभागाचे प्रमुख आहेत) 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

नाव नसलेली नाती.. खरी श्रीमंती!

रक्ताच्या नात्यापेक्षा ही नाव नसलेल्या नात्यांनी माझे आयुष्य समृद्ध केले आहे. त्या नात्याविषयी कृतदन्यता व्यक्त करणे, त्यांचे स्मरण करणे ही कर्तव्य भावना या लेखना मागे आहे. अशा व्यक्तींचे माझ्या आयुष्यातील स्थान खरे तर शब्दांत व्यक्त न होणारे असे आहे. जवळच्या नातेवाईकांची माया, मदत, त्यांचे प्रोत्साहन हे कुणालाच नाकारता येत नाही. पण आपल्या आयुष्यात अशाही व्यक्ती अचानक, अनपेक्षित रीत्या प्रवेश करून जातात. अन् रंगमंचावरील सहकलाकाराप्रमाणे तुमच्या आयुष्याच्या नाटकाला रंगत आणतात. नाटकात कुणी एक पात्र रंग भरत नाही. तो एक सामूहिक प्रयोग असतो. अगदी पडद्या मागील कलाकारांचा देखील नाटकाला मिळणाऱ्या हशा, टाळ्यावर तितकाच अधिकार असतो.

मी शाळेत असताना ज्या वाड्यात राहत असू त्यांचे मालक डांगे पती पत्नी हे वृद्ध होते. देव भक्त होते. त्यांच्याकडे पूजा अर्चा, सोवळे ओवळे अतिशय कडक होते. परीक्षेच्या आधी नियमित त्यांच्या घरी जायचे, त्यांच्या घरच्या देवाला, त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे हा माझा अलिखित नियम होता. ते हातावर तीर्थ द्यायचे. काकू परीक्षेच्या वेळी हातावर दही साखर ठेवायच्या. त्या दोघांच्याही आशीर्वादाचे पाठबळ माझ्यासाठी त्यावेळी मोलाचे होते. मी मॅट्रिकमध्ये मेरिट मध्ये आल्यावर त्यांनी माझ्या हातावर ठेवलेले चांदीचे पाच रुपयांचे नाणे लाख मोलाचे होते माझ्यासाठी. मी शेवटचे त्यांना भेटलो ते आय आय टी ला शिक्षणासाठी गेलो तेव्हा. तिथे खरगपूरला असताना कळले की काका काकू एका यात्रा कंपनी बरोबर चार धाम करायला गेले अन् तिकडेच त्यांचे निधन झाले. वाईट वाटले. त्यांच्या आशीर्वादावर माझी श्रद्धा होती. श्रद्धेवर विश्वास होता. या बळावरच मी पुढचे आयुष्य जगलो. या श्रद्धेने,विश्वास भावनेने मला पुढे पावलोपावली बळ दिले.

माझी पहिली नोकरी मुंबई टी आय एफ आर ची. तिथे जायचे तर राहायचे कुठे हा प्रश्न होता. माझ्या एका आत्याने पत्र दिले. कल्याण येथे राहणारे डॉ वैद्य पती पत्नी तिच्या चांगल्या परिचयाचे होते. मी तिचे पत्र घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यांनी जुजबी चौकशी केली. अन् ताबडतोब राहायला यायला सांगितले. तेव्हा डॉ  वैद्य काका अंथरुणावर आजारीच होते. त्यांची एक मुलगी जवळच राहायची. दुसरी डॉक्टर होती. ती माटुंग्याला असायची. मी सामान घेऊन त्यांच्या घरी गेलो एन त्या घरचाच झालो. सकाळी आठ ते रात्री आठ मी बाहेरच असे. जेवून यायला उशीर व्हायचा. पण रविवारी सुटीच्या दिवशी मी त्यांच्याकडेच जेवावे हा त्यांचा आग्रह असे. त्यांनी माझ्याकडून भाडे वगैरे कधीच घेतले नाही. डॉ काकांना मृत्युपत्र करायचे होते. ते सगळे काम, म्हणजे टायपिंग करणे, वकिलाकडे जाणे, नोटरी करणे हे त्यांनी विश्वासाने माझ्याकडूनच करवून घेतले. मी गेल्यावर दोनच महिन्यांनी डॉ काकांचे निधन झाले. आयुष्यात मी जवळून पाहिलेला अनुभवलेला तो पहिलाच मृत्यू.

काका गेल्यानंतर तर काकूंना माझी फार गरज भासू लागली. मी असल्याने त्यांच्या लेकीही निश्चिंत झाल्या. पुढे थोडे स्थिरावल्या नंतर माझ्या बरोबर त्या नाटक सिनेमाला देखील यायला लागल्या. काकूंना वाचनाची आवड होती. जाण होती. आम्ही नव्या जुन्या कुठल्याही विषयावर मोकळे पणाने चर्चा करायचो. माझ्या पहिल्या कादंबरीच्या प्रती कल्याणला च आल्या पोस्टाने. या पुस्तकावर कल्याणच्या घरचाच पत्ता आहे. माझ्या दुसऱ्या गाजलेल्या पत्रांजली या कादंबरीचे फायनल लेखन डॉ वैद्याच्या घरातच झाले. काकूंना याचा अभिमान वाटायचा. पुढे पी एच डी करायची म्हणून, मी लेक्चरर शिप मिळाल्याने पुन्हा आय आय टी खरगपूरला परत गेलो. तेव्हा काकूंना त्यांच्या मुलींना खूप वाईट वाटले. पण संयोग वियोग हा आयुष्याचा नियम आहे. पुढे काकू वारल्या. तरी या कुटुंबाशी संबंध टिकून राहिलेत. आजही त्यांच्या वयाने पार थकलेल्या डॉक्टर मुलीशी अधून मधुन बोलणे होते. व्हॉट्स ॲप कॉल आहेतच. कल्याणच्या नातसूनेशी देखील संबंध टिकून आहेत..कुठले ऋणानुबंध असतात हे कुणास ठाऊक?

खरगपूरला माझे दोन गुरू हे माझ्यासाठी पितृतुल्य होते. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. डॉ बी एन दास हे माझ्या एम टेक तसेच पी एच डी प्रबंधाचे मार्गदर्शक. त्यांना दोन मुले होती. मी तिसरा असे म्हणायला हरकत नाही. कारण स्वतःच्या मुलाइतकेच कडक धोरण त्यांनी माझ्याशी वागताना ठेवले. जितके कठोर तितकेच प्रेमळ देखील. डॉ सन्याल हे त्यांचे गुरू. माझेही. शिवाय आम्हा दोघांचेही बॉस. विभाग प्रमुख या नात्याने.मी दोघांबद्दल ही यापूर्वी बरेच लिहिले आहे. मी आज जो काही आहे,जे काही कमावले आहे ती या दोघांची देणगी. त्यांनी खूप काही शिकवले. शिकवायचे कसे( खरे तर कसे शिकवायचे नाही हे!),संशोधन कसे शिस्तबद्ध असायला हवे, पेपर, प्रबंध नेमके कसे लिहायचे. प्रोजेक्ट प्रपोजल कसे तयार करायचे. मुद्देसूद रिपोर्ट कसे लिहायचे हे सारे महत्वाचे या दोघांकडून शिकायला मिळाले. त्या दोघांनी जे दिले ते शब्दातीत. त्याची परतफेड केवळ अशक्य.त्या ऋणा चे ओझे वाहण्यातच आनंद!

खरगपूरच्या दहा वर्षे वास्तव्यानंतर आम्ही हैदराबाद येथे उस्मानिया विद्यापीठात स्थलांतर केले. इथे शहर नवे, माणसे नवी, भाषा वेगळी..शिवाय परिचयाचे असे कुणीच नाही. त्यावेळी प्रा मक्तल यांची खूप मदत झाली. ते एम टेक करायला खरगपूरला आले होते. त्यावेळचा जुजबी परिचय. पण इथे स्थिर स्थावर व्हायला त्यांची, त्यांच्या पत्नीची खूप मदत झाली. ते शांत सौम्य स्वभावाचे होते. वहिनीनी माझी पुस्तके वाचली होती. त्या माझ्या फॅन होत्या म्हणायला हरकत नाही. शिवाय आमची त्यांची मुलं आसपासच्या वयाची. स्नेह वाढायला जगवायला हे सारे पुरेसे होते. आमच्या इथल्या घरची प्रत्येक महागडी नवी वस्तू त्यांच्याच सल्ल्याने घेतलेली आहे. आज तीस वर्षानंतरही हा स्नेह टिकून आहे. सुख दुःखात आम्ही एकत्र होतो. अगदी घेण्यासारखे. किंबहुना जरा जास्त जवळचे. डॉ मक्तल, वाहिनी दोघेही आमच्यापेक्षा वयाने मोठे. कॉलेज मध्ये मी वरच्या पदावर. पण हे लहान मोठेपण मैत्री आड आले नाही कधी. आज डॉ मक्तल नाहीत. वहिनी पुण्याला स्थायिक झाल्या. मुली परदेशी स्थिरावल्या. पण येणेजणे आहे. फोनने विचारपूस आहे. लांबलचक वार्तालाप आहे! या कुटुंबाने आम्हाला भरभरून प्रेम दिले.

चीमोटे काका काकू यांचे छत्र आशिर्वादासारखे होते. काकू आमच्या नागपूरच्या.जिव्हाळ्याचे तेही एक कारण. काका दत्त भक्त. दरवर्षी त्यांच्या कडे दत्त जयंतीला जाणे व्हायचेच.शिवाय अडीअडचणी ला त्यांचा सल्ला ही आमची भावनिक गरज होती.ते पत्रिका बघायचे.सल्ला द्यायचे.विशेष म्हणजे मुलही त्यांचा सल्ला मानायची.खरे तर त्यांना देखील स्वतःचे असे दुःख होतेच.या अशा समस्या कुणालाच चुकल्या नाहीत.पण त्यांनीही सगळे आहे ते आहे तसे स्वीकारले.सकारात्मक दृष्टीकोनापेक्षा स्वीकारात्मक दृष्टिकोन त्यांना महत्वाचा वाटे.रडगाणे गात बसू नका.पदरी पडले ते पवित्र मानून पुढे चला. एकाच ठिकाणी रेंगाळत रडत बसू नका ही त्याच्याकडून मिळालेली मोलाची शिकवण.आधी काकू गेल्या कॅन्सर ने.मग पाठोपाठ काका ही गेले.आम्हाला डोक्यावरचे छत उडाल्या सारखे वाटले!

आमच्याच कॉलनीत राहणारे भुसारी काका म्हणजे एक जिंदादील माणूस.आम्ही हैदराबाद ला आल्यावर दहा वर्षांनी त्यांची ओळख झाली.तेही त्यांच्या कॉलनीत गेल्यावर.पण म्हणता म्हणता या नात्याने सर्व भिंती पार केल्या.वयाने काका काकू आमच्या पेक्षा किती तरी मोठे.पण मैत्रीत वय आड आले नाही. काका चे वाचन प्रचंड.गाठीशी भरपूर माहितीचा खजिना.त्यामुळे गप्पा छान रंगायच्या.त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत.आधी जोश होता तेव्हा ते देश परदेश खूप भटकले.आयुष्य सर्वार्थाने एन्जॉय केले.बँकेतून रिटायर झाल्यावर ते कार चालवायला शिकले.अन् कार विकत घेतल्यावर बायकोला गाडीत गोव्याला घेऊन गेले.सगळ्या गोष्टीची दोघांनाही हौस. वहिनी जरा मृदू स्वभावाच्या. युवर्स फेथफुली या सदरात मोडणाऱ्या.पण स्वभावाने गोड.शांत.त्यांनी मुलांचे तिकडे स्थिरावणे,आपले इकडे एकटे राहणे आनंदाने स्वीकारले.आमच्या प्रत्येक आनंद सोहळ्यात ते जातीने हजर राहिले.आम्हाला आधार देत राहिले.मुलांच्या लग्न खरेदीत उत्साहाने सहभागी झालेत. जणू त्यांना कसली तरी उणीव भरून काढायची होती आमच्या स्वरूपात! काकांचे दोनदा ऑपरेशन झाले हृदयाचे.पेस मेकर लागला हृदयात..त्याची बॅटरी बदलून झाली इतक्यात! तरीही हे जिंदादील मस्त.काहीही झाले नाही या थाटात जगताहेत.लाईफ मस्त एन्जॉय करताहेत.त्यांच्या कडून खूप शिकण्यासारखे.त्यांनी एकेक करून आपल्या गावातील मुलं शहरात आणली.त्यांना काही ना काही शिकवले.आता तेच त्याच्या मदतीला आहेत शेवटच्या दिवसात.या मुलांची लग्नं झालीत.त्यांच्या मुलाची शिक्षण देखील यांनीच केले.कुणी इंजिनिअर झाले,कुणी एम बी ए.त्यांना नोकरीला लावण्याचे कामही यांनीच केले अती उत्साहाने.यांच्या ओळखी पालखी भरपूर.अन् काका ना नाही म्हणायची कुणाचीच हिंमत नाही.एवढे उपकारां चे ओझे त्यांनी इतरांच्या डोक्यावर लादून ठेवलेले!काही महिन्यापूर्वी वाहिनी गेल्या तेव्हा परदेशातली मुले येई पर्यंत सगळे या गावच्या मुलांनी,त्यांच्या बायका मुलांनीच केले.सांभाळले.काकानी या मुलांच्या संसारात काही कमी पडू दिले नाही.संबंध कसे जपावेत,माणसे कशी जोडावीत हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो.पंचवीस वर्षाच्या वास्तव्या नंतर आम्ही ती जुनी कॉलनी सोडली तेव्हा सर्वात जास्त दुःख भुसारी काका काकूंना झाले.निरोप देताना ते गहिवरले. मग काकूही गेल्या तसे ते अगदीच एकटे पडले.आताही दर दिवसाआड फोनवर बोलणे होतेच..आता ते एकटे पडले.खूप थकले.ते दोघे म्हणजे आमचे हैदराबाद चे आईवडील!आम्हाला जन्म न देता आमचे पितृत्व घेतलेले!!

ते चक्क माझ्या एका कादंबरीचे पात्र झालेत.काही कथांतून डोकावले.त्याची त्यांना गंमत वाटत असे. मी तुमच्या पुस्तकातून अमर राहीन असे म्हणायचे विनोदाने.

हैदराबादला विद्यापीठातही अनेक तेलगू प्रोफेसरानी खूप सहकार्य केले.अगदी आल्या आल्या मुलांच्या प्रवेशापासून तर स्थिरावण्या पर्यंत.आम्हाला कधीही आपण आउट साईडर आहोत असे वाटले नाही.मला तर नको तितका मान सन्मान दिला या विद्यापीठाने.इथल्या विद्यार्थ्यांनी मला शिक्षक म्हणून घडवले. डझनभर कुलगुरूंच्या बरोबर मी काम केले..निवृत्ती नंतरही गेल्या वर्षी पर्यंत माझे ऑफिस, नावाची पाटी कायम होती आमच्या विभागात. मुलानी लाखो रुपये देणगी देऊन एक प्रयोग शाळा बांधली.त्याला माझे नाव दिले.कोण करते एवढे सारे कुणासाठी? तेही पर प्रांतातील माणसासाठी?

औरंगाबाद ( आता छ संभाजीनगर) येथील कुलगुरू पदाच्या वास्तव्यात देखील अनेक प्रेम करणारी,जीव लावणारी माणसे भेटली.नवी नाव नसलेली नाती निर्माण झाली.मराठवाड्यातील हे प्रेम, हा जिव्हाळा न विसरणे सारखा. त्यातही न्या चपळगावकर पती पत्नी आमचे तिथले लोकल पालक झाले. दर आठवड्याला घरी येणार अन् जेवून च जाणार.त्यांच्या बरोबर साहित्यिक गप्पा मारणे,विविध विषयावर चर्चा करणे ही बौद्धिक मेजवानी होती.नुकतेच त्यांचे निधन झाले तेव्हा पोरके झाल्यासारखे वाटले!एकूणच या विद्यापीठाच्या कॅम्पस मधील सहकाऱ्यांनी जे प्रेम दिले,जीव लावला त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण.आता दहा वर्षे झालीत तिथून निवृत्त होऊन.पण तिथल्या नात्याची नाळ काही तुटली नाही.अनेकांचे फोन येतात.लग्नाची आग्रहाची निमंत्रणे येतात.मी आयुष्यात फारसा पैसा कमावला नसेल.पण या नाव नसलेल्या नात्यांनी दिलेली श्रीमंती कधीच कमी न होणारी.उलट चक्र वाढीने वाढत जाणारी!

माझे नाते गोते नसलेले अनेक विद्यार्थी, माझे प्राध्यापक, माझे सहकारी, प्रत्येक नव्या शहरात मिळालेले स्नेही.. अशा सर्वांनी आमच्या जीवनाचे सार्थक केले.आम्हाला घडवले.समृद्ध,श्रीमंत केले.म्हणूनच रक्ताच्या नात्यापेक्षा ही या नाव नसलेल्या नात्यांची किंमत माझ्या आयुष्यात सर्वाधिक आहे.न मोजता येण्या इतकी प्रचंड आहे.माझ्या हृदयाचे कपाट या नाव नसलेल्या नात्याच्या अमूल्य दागिन्यांनी अक्षरशा भरले आहे.. उतू जाईपर्यंत!!

– ©️ प्रा. विजय पांढरीपांडे

७६५९०८४५५५
709, SMR Vinay Technopilis, Adjecent Google, Kothaguda, Kondapur,

Hyderabad 500084

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

एका पर्वाचा अस्त!

व्यक्ती विशेष

अनेक कर्णबधिरांचे जीवन उजळून टाकणा-या जानकीबाई शिक्षण संस्थेच्या व विकास विद्यालयाच्या जननी माननीय रोहिणीताई लिमये यांचे देहावसान झाले, ही बातमी मिळाली आणि  स्मृती पटलावर  अनेक आठवणी जाग्या झाल्या.

१९८६ साल! मी अली यावर जंग मधून बी एड (डेफ) करत होते. पाठ निरिक्षण व प्रात्यक्षिकाकरता विकास विद्यालय कर्णबधिरांसाठी ,दादर येथे माझी पाठवणी आमच्या कॉलेजने केली.

मेहता अपार्टमेंट, तळमजल्यावर एका छोट्याशा केबीनमध्ये रोहिणीताई लिमये बसल्या होत्या.ओळख झाली तेंव्हाच त्यांच्या करारी आवाजाने मनात धडधड वाढली होती.अली यावर जंग मधील एज्युकेशन डिपार्टमेंटमधील डॉ प्रभा घाटे यांनी सांगितले होते की चाळीस पाठांपैकी वीस पाठ विकास व वीस प्रगतीत होतील. बापरे! वीस पाठ आपले कसे होणार याची चिंता लागली होती.

पाठ लिहून दिले की अनेकदा रोहिणीताई स्वतः तपासत. पुन्हा पुन्हा लिहून आणायला सांगत. वेळापत्रकाप्रमाणेच लेसन होत असत. आम्ही ट्रेनी सगळेच त्यांना घाबरत असू.कॉरीडोअरमध्ये जरी त्या नुसत्या दिसल्या तरी धडधडत असे.

जसजसे वीस लेसन होत आले तसे आता विकास विद्यालयातून प्रगतीत मी जाणार होते. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. मला  तब्बल चाळीस लेसन विकास मध्येच घ्यावे लागणार होते हे निश्चित झाले. मला आठवतं कि, शाळा बदलणार नाही म्हणून मी अक्षरशः रडले होते. आता आठवून ही हसू येते.
रोहिणीताई व विकासच्या शिक्षकांच्या कडक शिस्तीत मी तावूनसुलाखून निघाले हे मात्र खरं!
बी एड डेफचे शिक्षक पूर्ण केल्यानंतर मी नोकरी करता जिथे जिथे गेले तिथे तिथे मला रोहिणी ताईंच्या हाताखाली शिकल्यामुळे विशेष महत्त्व दिले जाई.

पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी प्रगतीत १९८७ साली विशेष शिक्षक म्हणून रूजू झाले. मी प्रगतीत छान रमले होते.

माझ्या आठवणीप्रमाणे मला कर्णबधिरांच्या शिक्षण क्षेत्रात फक्त दोनच वर्ष पूर्ण झाली असतील एक दिवस रोहिणीताईंचा मला फोन आला.विकासच्या मुख्याध्यापक पदाकरीता एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कडून एक यादी जाहीर केली होती.त्यात माझे नाव होते. आधी त्यांच्याशी बोलताना दडपण आले होते त्यात मुख्याध्यापक पद म्हणजे मोठी जबाबदारी ! मी त्यांना माझा नकार कळवला.
मुळातच मुख्याध्यापक पदाकरीता आपण लायक नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते असे. मी विद्यार्थ्यांमध्ये रमणारी, विविध उपक्रम व प्रयोग करणारी होते.

पुढे माझ्या नकाराचा राग मनात न ठेवता रोहिणीताई संपर्कात राहिल्या. स्वतः हून आठवणीने फोन करत. सध्या काय करतेस आवर्जून विचारतं.

कर्णबधिरांच्या शिक्षण क्षेत्रात मी ही ३७ वर्ष सेवा करून निवृत्त झाले. माझ्या या प्रवासात अनेक मार्गदर्शक लाभले .त्यातील प्रशिक्षण घेतानाच्या काळात प्रमुख मार्गदर्शक रोहिणीताई लिमये व त्यांच्या शाळेतील शिक्षक होते.

आज रोहिणीताई हे जग सोडून गेल्या.अनेक कर्णबधिर विद्यार्थ्यांचे  भवितव्य त्यांनी घडवले. आणि माझ्या सारख्या शिक्षकांना योग्य दिशा दाखवली. त्यांचे हे ऋण मी या जन्मात फेडू शकत नाही.ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो! ओम् शांती!

श्रीमती रोहिणी लिमये

– ©️  सौ.शुभदा प्रविण अघोर

shubhadaaghor@gmail.com

विशेष शिक्षक व समुपदेशक
प्रगति विद्यालय कर्णबधिरांसाठी दादर

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

तंबाखू

– शब्द – शब्द [ १०४ ]

 डॉ. उमेश करंबेळकर  

 एकदा सहज ल गो विंझेंचा संस्कृत मराठी सुभाषित कोश चाळत होतो. त्यातील शब्द चमत्कार,अर्थ चमत्कार, प्रहेलिका प्रकरणात मला चक्क तंबाखूवरची दोन सुभाषिते मिळाली. ती पाहून चकीत झालो. याचे कारण तंबाखू ही काही आपल्याकडची वनस्पती नाही. सार्थ वाग्भटात तिचा उल्लेख नाही. एवढेच नव्हे तर आयुर्वेदिय शब्दकोशातही तंबाखूचा उल्लेख नाही. सुभाषितकारांचा कर्ता कोण ते सहजासहजी समजत नाही. बहुतेक सुभाषितकार अज्ञात राहतात. पण कोणत्या काळातील असावे याचा अंदाज करता येतो.

सुभाषित कोशातील पहिले सुभाषित असे :
 प्रहारितोSपि मार्जारस्तमाखुं नैव       मुञ्चति |
तथैव बोधीतो मूर्खस्तमाखुं नैव मुञ्चति||
आखु म्हणजे उंदीर.
याचा अर्थ मार देऊनही बोका तंबाखू सोडत नाही. मूर्ख मनुष्य उपदेश करूनही तंबाखू सोडत नाही.

  तंबाखूला संस्कृत मध्ये तमाखु असा शब्द आहे. या सुभाषितात तमाखुं या शब्दात चमत्कृती आहे. पहिल्या चरणात ‘तम् आखुं’ अशी फोड केली असता त्या उंदराला’ असा अर्थ निघतो तर दुसऱ्या पदात ‘तमाखुं’ म्हणजे तंबाखूला असा अर्थ आहे कोशाच्या सूचीमध्ये या सुभाषिताचा उगम असलेल्या ग्रंथाचा उल्लेख नाही.

दुसरे सुभाषित खालीलप्रमाणे
बिडौजा: पुरा पृष्टवानब्जयोनिं
धरामण्डले सारभूतं किमस्ति |
चतुर्भिमुखैरुत्तरं तेन दत्तं, “तमाखुस्तमाखुस्तमाखुस्तमाखु:” ||
या सुभाषिताचा अर्थ, ‘इंद्राने एकदा ब्रह्मदेवाला विचारले,” सांग पाहू, पृथ्वीतलावर सर्वोत्तम वस्तू कोणती?” ब्रह्मदेवाने चारही तोंडानी त्याला एकदम उत्तर दिले, “तंबाखू तंबाखू तंबाखू तंबाखू.”
हे सुभाषित निर्णय सागरच्या ‘सुभाषित रत्न भांडारम्’ या ग्रंथातून  घेतल्याचे कोशाच्या सूचित दिसले.

 एकंदरीत ही दोन्ही सुभाषिते अलीकडच्या म्हणजे दीडशे दोनशे वर्षांपूर्वीच्या काळातील असावीत. पहिल्या सुभाषितात तंबाखूची निंदा केली आहे. बहुधा तंबाखूच्या आहारी गेलेल्या आपल्या मुलाला उद्देशून त्याच्या संस्कृत पंडित पित्याने त्याची रचना केली असावी.

या उलट दुसरे सुभाषित तंबाखूला पृथ्वीवरील सर्वोत्तम वस्तू मानणारे आहे त्याचा कर्ता अर्थातच तंबाखू शौकीन असणार. कदाचित पहिल्या सुभाषिताला प्रत्युत्तर म्हणूनही ते (मुलाने?) रचले असावे.

वेद कुमार यांच्या ‘संस्कृत सुभाषित सागर’ या पुस्तकात तंबाखू वरचा असाच एक शब्द चमत्कृती असलेला श्लोक वाचनात आला. त्यामध्ये पहिले आणि दुसरे पद एकच आहे ते असे
तमाखुपत्रं राजेंद्र भज माज्ञानदायकम् |
मा म्हणजे लक्ष्मी असा अर्थ घेऊन
‘माज्ञानदायकम्’  हा एकच शब्द घेतला तर त्याचा अर्थ,” हे राजेंद्रा, तमाकु पत्राचे सेवन करत जा. ते धन व ज्ञान देणारे असते. तर ‘मा अज्ञानदायकम्’ अशी फोड केल्यास याच ओळीचा अर्थ, “हे राजेंद्रा, तमाकु पत्राचे सेवन करू नकोस. ते अज्ञान देणारे असते” असा होतो. हे सुभाषित देखील अलीकडील काळातील असावे. याचे कारण पाहू.

तंबाखू ही मूळ अमेरिका खंडातील वनस्पती आहे. तिचा उगम अमेरिकेत झाला. इसवी सन पूर्व चौदाशे ते एक हजार वर्षांपासून तेथील लोक तंबाखूचा औषध म्हणून उपयोग करत. तसेच तंबाखूची वाळलेली पाने बटव्यात ठेवून तो जवळ बाळगत आणि मैत्रीची निशाणी, समझोता म्हणून तंबाखूची देवाणघेवाण करत. पंधराव्या शतकात कोलंबस अमेरिकेत पोहोचला आणि तेथील जमिनीवर उतरणारा तो पहिला युरोपियन ठरला. त्यानंतर अनेक दर्यावर्दी अमेरिकेला गेले. त्यांनी तेथील अनेक वनस्पती युरोपमध्ये आणल्या. ह्या वनस्पती युरोपला सर्वस्वी नवीन होत्या. त्यात मिरची, पेरू, तंबाखू इत्यादींचा समावेश होता.

 फ्रान्सिको हेर्मंडेज डी टोलेडा या स्पॅनिश बखरकाराने सर्वात प्रथम तंबाखूच्या बिया १५५९ मध्ये युरोपमध्ये आणल्या आणि रुजवल्या. तेथील हवामानात तंबाखू वाढली. फार थोड्या काळात तंबाखूची कीर्ती संपूर्ण युरोपमध्ये पसरली. तंबाखू तोंडात ठेवल्यानंतर नशा चढते आणि वेदना शमतात हे लक्षात आले. तसाच परिणाम वाळलेल्या तंबाखूच्या पानांचा धूर तोंडाने ओढल्यावरही होतो हे लक्षात आल्यावर त्याचा चिरूट म्हणून वापर सुरू झाला. काहींना असा थेट धूर ओढणे सहन झाले नाही. त्यांनी हा धूर पाण्यात सोडून मग ओढण्यास सुरुवात केली. त्यासाठी हुक्का, गुडगुडी यांचा वापर करू लागले.

तंबाखूचा प्रसार वेगाने झाला आणि थोड्याच काळात तंबाखूची नगदी पिकात गणना होऊ लागली. पोर्तुगीजांमुळे तंबाखू सतराव्या शतकात भारतात आली. तंबाखूला इंग्रजी टोबॅको तर स्पॅनिशमध्ये टबाको म्हणतात या उच्चारावरूनच तंबाखू तसेच तमाखु हे मराठी आणि संस्कृत शब्द तयार झाले हे सहजपणे लक्षात येते.

तंबाखू पिकाला भारतातील हवामान आणि जमीन मानवली. आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक या भागात तंबाखूची लागवड वाढली. तंबाखूचा प्रसार फार तीव्र गतीने सर्व भारतभर झाला. तंबाखूतील निकोटीन या द्रव्यामुळे तंबाखूचे व्यसन चटकन लागते आणि त्यातून सुटका होणे खूप अवघड असते. तंबाखू आणि चुना यांचे मिश्रण तोंडात ठेवून शेतकरी काम करू लागला आणि त्याच्या नशेत कष्ट विसरू लागला.

पण केवळ कष्टकरी, मजूर, शेतकरी या वर्गापुरतंच तंबाखूचे व्यसन मर्यादित राहिले नाही तर पांढरपेशा वर्गातही ते तितक्याच वेगाने पसरले. आता तर गुटख्याच्या रूपात तरुण वर्गालाही त्याने सामावून घेतल्याचे दिसते. तंबाखूमुळे कर्करोग होतो हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे सिगरेट, चिरूट, विडी यातून बाहेर पडणारा धूर आजूबाजूच्या लोकांस आणि विशेष करून लहान मुलांस हानिकारक असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई केली जाते. तंबाखूचे इतके घातक दुष्परिणाम दिसत असले तरी माणूस तंबाखू सोडत नाही हे विशेष.

  तंबाखूचा प्रसार ग्रामीण भागात किती खोलवर झाला हे द. मा. मिरासदारांच्या ‘व्यंकूची शिकवणी’ या कथेतून दिसते व्यंकू त्याच्या मास्तराला तंबाखूचे महत्त्व पटवून देताना सांगतो,” तंबाखू ही फार उत्तम वनस्पती आहे आणि माणसाने ती हमेशा तोंडात टाकावी असा प्रत्यक्ष देवाचाच हुकूम आहे. ती कमरे एवढी उंच असते हे विठोबाने कमरेवर हात ठेवून दाखवले आहे. गणपतीने डावा हात पसरून उजव्या हाताने बोटाची चिमूट सदैव धरून तंबाखूचे पान हातभर रुंद असते आणि ती चिमूटभरच तोंडात टाकावी असे सुचवले आहे . तंबाखू खाल्ली नाही तर मारुतरायाचा कोप होतो आणि म्हणूनच न खाणाऱ्या माणसाच्या मुस्कटात लगावण्यासाठी त्याने एक हात उभारलेला असतो.” इतके पद्धतशीरपणे पटवल्यानंतर व्यंकोच्या मास्तराने देखील तंबाखू खायला सुरुवात केली.

   तंबाखूचे व्यसन सर्वच देवांना लागल्याचे दिसते. त्यातून भगवान कृष्ण सुटले नाहीत. पुलंचा पानवालाच सांगतो,
“कृष्ण चालले वैकुंठाला, राधा विनवी पकडून बाही |
इथे तमाखु खाऊनि घे रे तिथे कन्हैया तमाखु नाही ||”

-– ©️ डॉ. उमेश करंबेळकर

umeshkarambelkar@yahoo.co.in

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

राशीस्वभावानुसार उखाणे

मी ज्योतिष शिकत असताना प्रत्येक वर्षी हिवाळ्यात आमच्या ज्योतिष क्लासची “नक्षत्र दर्शन अभ्यास सहल” मुरबाड जवळील “मामणोली” येथे जात असे. मामणोली येथे वनवासी  कल्याण शाळा होती आणि त्याच्या विस्तीर्ण पटांगणात नक्षत्रे बघण्यासाठी दुर्बीण लावली जात असे. आम्ही आधीच राखीव केलेली बस संध्याकाळी साधारण ५.०० च्या सुमारास कल्याण डेपोतून सुटत असे. मामणोलीला जाण्यास साधारण तासभर लागत असे. तेथे पोहचल्यावर नक्षत्रे पाहण्याची सगळी सुसज्ज तयारी असे. आमच्या ज्योतिष संस्थेचे संस्थापक कै. श्री. श्री. भट सर यांचेकडून ज्योतिषाची माहिती, नक्षत्रांची संपूर्ण माहिती आणि एकीकडे दुर्बिणीतून नक्षत्रांचा आकार जाणून घेणे, हा निव्वळ अद्भुत अनुभव होता. प्रत्यक्ष भट सरांकडून या गोष्टी जाणून, समजून घेता आल्या हे माझे परम भाग्यच. साधारण ९.०० च्या सुमारास पिठलं भाताचे साधेच पण अतिशय रुचकर भोजन. नंतर परत रात्रभर अभ्यास वर्ग सुरु. भट सरांचे न थकता विविध अंगाने माहिती देणे चालूच असायचे. त्या मोकळ्या वातावरणात, थंडीने आम्ही गारठून जायचो. मात्र नक्षत्र दर्शनाचा एक विलक्षण अनुभव होता.

भोवती दाटलेला गडद काळोख. आपुलकीने आणि उत्तम शैलीत भट सर देत असलेले माहिती. रातकिड्यांचा कुठूनसा येणारा किर्र आवाज, अंगावर शहारे आणणारी थंडी, बाजूला पेटविलेली शेकोटी, सरांभोवती कोंडाळे करून बसलेलो आम्ही भावी ज्योतिषी…असा रात्रभर आमचा अभ्यास वर्ग चालायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण सातच्या सुमाराला आम्ही परत बस करून कल्याणला परतायचो.ते  तारांगण पाहाताना मला प्रसिद्ध कवयित्री “शांता शेळके” यांची एक कविता आठवली…

“हे प्रभो विभो अगाध किती तव करणी,
चांदवा नभीचा केला,
रविचंद्र लटकती त्याला,
जणू झुंबर सुबक छताला,
मग अंथरली, अंथरली ही धरणी,
हे प्रभो विभो अगाध  किती तव करणी.

बाहुले मनुष्ये केली,
त्या अनेक रूपे दिधली,
परी सूत्रे त्याची सगळी,
चालविशी हस्ती धरुनी,
हे प्रभो विभो अगाध  किती तव करणी.”  

*चौथी रास कर्क* :-

“राशीतील चौथी रास ही कर्क,  ही असे कुटुंबवत्सल ,
स्वामी चंद्र ,जल तत्व ,शरीर स्थूल परंतु नाजूक फार .
वर्ण फिकट, चेहरा गोल, अशी विचारात घ्यावी ही रास .
कौटुंबिक जीवनाची आवड, तरीही कर्त्यव्यकठोर व राजकारणी फार ..
अशी ही …क्षणात हसणारी व क्षणात रडणारी कर्क “…

*या राशीत ३ नक्षत्रे येतात –

पुनर्वसू – याची आकृती चौकोनी / घरासारखी आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती बुद्धिमान ,व्यवहारी,  ज्ञानी, वस्तुनिष्ठ निर्णय घेणा-या असतात. नक्षत्र स्वामी : गुरु.

पुष्य – याची आकृती बाणासारखी दिसते. या  नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती अस्वस्थ पण कोणतेही  कठीण काम नेटाने शेवटास नेणा-या, स्वभावाने हळव्या,वादविवादपटू असतात. नक्षत्र स्वामी : शनी.

आश्लेषा – याची आकृती चक्राकार दिसते. या  नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती निवांत, सुशेगात असतात. नक्षत्र स्वामी : बुध.

ह्या राशींच्या व्यक्ती घर-संसार यातच मग्न असतात. कुटुंबवत्सल व स्वयंपाकघरात रमणाऱ्या असतात.

*कर्क राशीची स्त्री कशी उखाणा घेईल* :-

१ )वाकून नमस्कार करताना दिसते स्त्रीची शालिनता
सतीशरावांच्या हास्यात माझ्या जीवनाची सफलता.

२ )गोकुळच्या वनात कृष्ण वाजवितो बासरी,
विनायकरावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी.

*या राशीचा पुरुष कसा उखाणा घेईल* :-

१ )रंगामध्ये जावे रंगून ,सुरामध्ये व्हावे दंग,
आशाला सुखी ठेवण्याचा बांधला आहे मी चंग.

२ )जीवनाच्या वळणावर लागतात कठीण घाट,
 मीराच्या सहाय्याने शोधीन सुखाची वाट.

*कर्क  राशीचा एक किस्सा *…

१)कर्क राशीची  बायको :- अहो ऐकलंत का ? बापटांच्या मुलीला गणितात १०० पैकी ९८ मार्क्स मिळाले आहेत .

नवरा :- अरे वा ,मग दोन मार्क कुठे गेले ?

बायको :- दोन मार्क आपले चिरंजीव घेऊन आलेत .

२)कर्क राशीचा कुटुंबवत्सल पुरुष भाजीवाल्याला विचारते, ‘बटाटे कसे किलो ?’

भाजीवाला म्हणतो. ‘४० रु. किलो’

‘अरे पण तो समोरचा भाजीवाला ३० रु. किलोने देतोय’

भाजीवाला .. ‘मग त्याच्याकडूनच घ्या’.

पण त्याच्याकडचे संपले आहेत, म्हणून तुझ्याकडे आलो.

भाजीवाला म्हणतो ‘माझ्याकडचे संपले की या, मी  ५ रु. किलोने देईन

 *माफी मागण्याची पद्धत* :-

या राशीच्या व्यक्तीकडून चूक झाली आणि त्यांनी माफी मागावी अशी जे अपेक्षा करतील त्याच्यावरच पश्चातापाची वेळ येईल. कारण या राशीच्या हळव्या व्यक्ती स्वत:लाच दोष देत रडत बसतील. त्यामुळे  माफीची अपेक्षा करणाऱ्या व्यक्तीलाच यांची समजूत काढावी लागेल.

*कर्क राशीची व्यक्ती  हळुवार आणि भावनाप्रधान  असते. त्यांचा एक शेर पाहू*:

“मैने तुम्हे चाहा, ये बेसब्री की हद थी,
दिल दिया तुम्हे ये चाहत की हद थी,
मरने के बाद भी मेरी आंखे खुली रही,
ये मेरे इंतजार की हद थी.”

पाचवी रास “सिंह “:—

“राशीतील पाचवी रास ही सिंह,  ही स्तुतीप्रिय असे फार,
स्वामी रवी, अग्नीतत्व, भक्कम रुबाबदार उंच बांधा, आवाज मोठा ,
भव्य चेहरा ,दमदार असे चाल, अशी विचारात घ्यावी ही रास,
औदार्य, दिलदारपणा, परंतु डौल,अहंपणा अन दिखाऊपणा फार,
अशी ही, अधिकार गाजविणारी थोडी पुरुषी रुक्ष ‘सिंह’…”

*या राशीत ३ नक्षत्रे येतात … मघा,पूर्वाफाल्गुनी आणि उत्तराफाल्गुनी*

 मघा – याची आकृती कोयत्यासारखी किंवा थोडीशी घरासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती.महत्वाकांक्षी ,स्वयंभू ,स्वातंत्र्यप्रिय, आर्थिकदृष्ट्या संपन्न, समाजात मानमरातब मिळतो. नक्षत्र स्वामी : केतू.  

पूर्वाफाल्गुनी – याची आकृती मंचकासारखी दिसते. या  नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती उदार ,हळव्या, कविमनाच्या, हौशी असतात. नक्षत्र स्वामी : शुक्र.  

उत्तराफाल्गुनी – याची आकृतीही साधारण मंचका/पलंगासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती, उत्तम स्मरणशक्ती, आक्रमक असतात. नक्षत्र स्वामी : रवी.

सिंह राशींच्या व्यक्ती फार अहंकारी असतात. सारखं आपलं “मी हे केलं” “मी ते केलं” असं सांगत असतात. अर्थात  ह्या कर्तृत्ववान असतातच. पण इतरांनी मान दिला नाही तर ह्यांना प्रचंड राग येतो. या राशीच्या व्यक्तींच्या चालीवरून त्यांची सिंह रास आहे हे सहज ओळखता येते.

*सिंह राशीची स्त्री कशी उखाणा घेईल* :—
१ )“झाशीच्या राणीचा गिरविन म्हणते कित्ता,
अनुपचे नाव घेते पण नेहमी चालते माझीच सत्ता”

२ ) सरीवर सरी, श्रावण सरी
     महेशराव दिसतात तसे भारी
     पण मीच आहे खरी सौंदर्यपरी.

*या राशीचा पुरुष कसा उखाणा घेईल*…

१) मीच वाढविलेल्या संसाराला मीच बांधीन तोरण
वैशालीला माझ्या कसलेच नाही धोरण.

२ ) सन्मार्ग, न्याय, नीती, आहे माझ्या  घराण्याची शान,
मितालीने राखावे कायमच याचे भान.

*सिंह  राशीचा एक किस्सा *…यामुळे या राशीचा स्वभाव समजायला मदत होईल …

१ )“एका बस मध्ये सिंह राशीची मध्यमवयीन बाई चढते. बसमध्ये गर्दी असते. बसायला जागा नसते. ती बाई उभी असते. तिच्या शेजारचा एक कर्क राशीचा मुलगा उठतो. त्या सिंह राशीच्या बाईचा अहंकार उफाळून येतो. ती त्याच्या खांद्याला धरून त्याला बसवते आणि म्हणते “स्त्री दाक्षिण्य दाखवायची गरज नाही, मी तुला म्हातारी वाटले काय? मी उभी राहू शकते”. तो मुलगा निमूट बसतो. जरा वेळाने तो पुन्हा उठतो ती बाई पुन्हा त्याला बसवते.

 तिस-यांदा असेच बसविल्यावर तो काकुळतीने म्हणतो:

अहो बाई मला दोन स्टॉप अगोदर उतरायचं होत. आता तरी उतरु द्या.”

*माफी मागण्याची पद्धत:*
ह्या राशीच्या व्यक्ती आपली चूक कबूल करताना किंवा माफी मागतानाही स्वतःचा आब राखत माफी मागतील. माफी मागण्याचा देखील बडेजाव करतील.

*ह्या राशीच्या व्यक्तीना आपण खूप great आहोत असे वाटते. त्यांचा शेर पाहू*

“हमको मिटा सके, ये जमानेमे दम नही.
जमाना खुद हमसे है, हम जमानेसे नही”.

 *सहावी रास कन्या* …
“राशीतील सहावी रास ही कन्या, ही गोंधळलेली असे फार,
स्वामी बुध, पृथ्वी तत्त्व, मध्यम बांधा, गौर वर्ण, भुवया दाट,
पण आवाज बारीक, हसत हसत  बोलण्याची सवय,
अशी  ही विचारात घ्यावी ही  रास.

अशी ही सतत गोंधळलेली “कन्या”.

*या राशीत तीन नक्षत्रे येतात.*

उत्तराफाल्गुनी, हस्त आणि चित्रा.

उत्तराफाल्गुनी – याची आकृती मंचका/पलंगासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती उदारमतवादी असतात उत्तम स्मरणशक्ती, थोडी गर्विष्ठ व आक्रमक असते. पण अगदी मेष राशीसारखी आक्रमक नाही. नक्षत्र स्वामी : रवी.

हस्त – याची आकृती हाताच्या पंजासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती प्रगल्भ बुद्धीची, बोलण्यात चतुर पण, ह्या व्यक्ती कुणावर उपकार करायच्या भानगडीत पडत नाहीत. नक्षत्र स्वामी : चंद्र

चित्रा – याची आकृती मोत्यासारखी ठळक दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती भाग्यवान असतात. दिसायला चित्रासारख्या सुंदर, शांत, सुस्वभावी, विचारी व कार्यकुशल असतात. नक्षत्र स्वामी : मंगळ

सर्वसधारणपणे ह्या राशीच्या व्यक्ती घरी शूर वीर असतात. पण बाहेर घाबरट असतात. फार चिकित्सक आणि कायम गोंधळलेल्या असतात. दुस-यावर जाऊ द्या ह्यांचा अनेकदा स्वत:वर देखील विश्वास नसतो.

*कन्या राशीची स्त्री कशी उखाणा घेईल* :—

  १ ) जाते फिरते गरा गरा, पीठ तर दळले गेलेच नाही,
     संदीप बरोबर लग्न झाले मला बाई कळलेच नाही.

२ )मनात काय साठवले, काल काय बोलले आठवत नाही.
रमेश तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना ? विचारल्याशिवाय राहवत नाही.

 *या राशीचा पुरुष कसा उखाणा घेईल*

 १ )  मंडपामध्ये लग्नकार्यासाठी जमलीत नातेवाईक मंडळी सारी,
     स्मिता स्वभावाने आत्ता तरी वाटते बरी, पण नंतर नीट वागेल तेव्हा खरी.

२ ) एकदा वाटलं थेट सांगावे, मग वाटलं कागदावर लिहावं
नंतर म्हटलं जाऊ दे, माझं लीनावर प्रेम आहे हे उखाण्यातूनच सांगावे. (स्वरचित)

 *कन्या  राशीचा एक किस्सा *…यामुळे या राशीचा स्वभाव समजायला मदत होईल …

१) एका कन्या राशीच्या माणसाच्या घरी पोलीस येतात. ते दार ठोठावतात. हा विचारतो कोण आहे? आम्ही पोलीस आहोत. तुमच्याशी जरा बोलायचं आहे.

हा मनुष्य आतूनच विचारतो कि तुम्ही किती जण आहात? पोलीस म्हणतात आम्ही तीन जण आहोत. हा दार न उघडता आतूनच म्हणतो.

“मग बोलायला मी कशाला हवा. तुम्ही आपसातच बोला ना” ?

२) कन्या राशीच्या एका शब्दजुळव्या कवीने “भुंगा” या टोपण नावाने पाच हजार ओळींचे एक लांबलचक काव्य लिहिले. त्याचे शीर्षक होते “ मी जिवंत कसा राहिलो”

ते काव्य त्याने एका नामांकित मासिकाच्या संपादकाला पाठविले. संपादकाला ते वाचायला वेळच  मिळाला नाही.  कन्या राशीची माणसे फार अधीर देखील असतात. एक महिना वाट पाहून  ह्या कवी महाशयांनी त्या संपादकाला पत्रावर पत्र पाठवून भंडावून सोडले.
संपादक मेष राशीचे होते. संपादकांनी कंटाळून ते काव्य वाचायला घेतले. एक-दोन  पाने  वाचून    झाल्यावर त्यांनी कवी महाशयांना पत्र लिहिले.

“आपण जिवंत कसे राहिलात या प्रश्नाचे उत्तर एवढेच आहे कि तुम्ही हे भयंकर  काव्य प्रत्यक्ष आणून दिले नाहीत”

*माफी मागण्याची पद्धत* :

ज्याची माफी मागायची आहे त्याची रीतसर appointment घेतील. माफिनाम्याचे एक पत्र लिहितील. पण समोरचा वाचेल की नाही याची खात्री नसल्याने त्याच्या हातात न देता स्वत:च वाचून दाखवतील.

*शेर कसा घेतील*
“सोचता हूं दोराहे पर खड़े होकर
तुझसे बिछडू, या जमानेसे जुदा हो जाऊँ”

(क्रमश:)
© अ‍ॅड. क्रांती आठवले पाटणकर
*डोंबिवली.*

*9969087559*
०६.१०.२०२५.
*(सदर लेख माझ्या नावासह अग्रेषित करायला हरकत नाही.)*

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

उत्तरे द्या आणि ज्ञानात भर घाला

प्रश्नसमूह  ४

१६) चीनमध्ये गूगल, यू ट्यूब, आणि व्हॉट्सॅप जवळपास १४ वर्षांपासून प्रतिबंधित आहे. तर ते यांच्या जागी काय वापरतात ?                                                                                  

१७) सर्वात जास्ती काळ थिएटरमध्ये प्रदर्शित राहिलेले ५ हिंदी चित्रपट कोणते ?                                                

१८)  मावळातील आंबेमोहोर तांदूळ त्याच्या सुवासाकरिता प्रसिद्ध आहे. त्याचा भात शिजतांना घरभर वास पसरतो आणि भूक जागृत होते. अजून असे कोणते सुवास असणारे तांदूळ आहेत आणि सर्वात सुवासिक तांदूळ कोणता ?                                                                                
१९) खालील द्रव्यांचे १ लिटर मापाचे/ आकारमानाचे वजन किती किलो भरेल ?  
     पाणी
     खाद्य तेल
     पेट्रोल
     वितळलेले द्रव लोखंड
     हवा – ( हो, हवेलाही वजन असते ! )
     हायड्रोजन वायू

२०) “ देशप्रेम म्हणजे तुमची ही खात्री की तुमचा देश इतर देशांपेक्षा श्रेष्ठ आहे कारण त्यात तुम्ही जन्माला आला “  हे मिष्कील विधान कोणी केले आहे . 

– ©️ विलास सातपुते 

vilas.satput54@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन

 

– ©️  रामचंद्र देशमुख

संपर्क : ९९३०२४६९८९

  प्रेषक मेघना घाटे 

meghanaghate25@gmail.com

@@@@@

– मिलिंद महाबळ 

milind.mahabal65@gmail.com 

@@@

 –  युती प्रवीण अघोर  

प्रेषक शुभदा प्रवीण अघोर     

shubhadaaghor@gmail.com

@@@

  • भक्ती ठाकुरद्वारकर, पुणे १

प्रेषक सौ. स्वाती वर्तक 

@@@@@@@@@@@@@@@@@

महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. 

@@@@@@@@@@@

महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.

@@@@@@@@@@@@@@